माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 2

(12)
  • 8.6k
  • 4.8k

२ योगायोगाची सुरुवात योगायोगाने! देव आपल्याला नातेवाईक का देतो? कुणी काहीबाही उत्तरे देईल याची. पण माझे उत्तर मात्र ठरले आहे. त्या लग्नगाठी विधात्याने ठरवल्याप्रमाणे बांधल्या जायला हव्या असतील तर अशा नातेवाईकांना पर्याय नसावा! अर्थात हे माझे फक्त स्वानुभवातून आलेले बोल आहेत. नातेवाईक, मग त्यांची मुलं, तुमचे भाऊ नि बहिण, त्यांची लग्नं, नि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी .. म्हणजे माझ्या बाबतीत तरी झाले ते असे झाले. नाहीतर मी एकुलता. ना सख्खा भाऊ ना बहीण मला. पण चुलत नि मामे दोन्ही प्रकारच्या बहिणी मात्र आहेत मला. आणि माझ्याच या स्टोरीसाठी त्यांची योजना आहे की काय असा संशय तुम्हाला ही येईल माझी गोष्ट