माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 6

  • 6.3k
  • 1
  • 2.6k

६ 'ती'चे मराथी! रात्री खूप विचार करता करता डोळा लागला असणार माझा. कालचा पहिलाच दिवस इकडचा. तसा तो संमिश्र गेला. खरेतर संध्याकाळपर्यंत वायाच गेलेला तो. संध्याकाळ नंतर मात्र अचानक जीव आला जणू त्यात.. 'वो कौन थी?' चा विचार करत डोळा लागलेला माझा. आणि सकाळी उठलो तर माझ्या अंगावर कुणी शाल पांघरून टाकलेली. मी शाल बाजूला सारली.. नि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. चक्क एक मुलगी माझ्या समोर बसली होती. माझ्या आजूबाजूला अजून कुणी नव्हते. माझ्या छातीत धडधडू लागले.. ही कोण? ही ती नक्षत्रा नव्हती. मग ही कोण असेल? वैदेही की कृत्तिका? त्यापैकीच असणार कुणी. कारण अजून कुणी पाहुणे