तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १२

(24)
  • 12.4k
  • 2
  • 6.1k

भुयार गुहेप्रमाणे बरच काळोखात व्यापल होत. हातात मशाल होती म्हणून ठीक.. परंतु ती छोटी मिणमिणती मशाल फक्त पावलाखालचा चिंचोळा रस्ता दाखवत होती. पायाखालचे खाचखळगे चाचपडत व एका हाताने दगडी भिंतीना पकडत, धडपडत तो बाहेर निघाला. भुयार काही फारस मोठं नसावं... कारण भुयाराच्या तोंडाशी थोडीफार झुळुझुळू करणारी हवा सहज आत शिरत होती. त्या थंडगार स्पर्शाने त्याच्या डोळ्यावरची झोप उडाली. दोन पावलात भुयार संपूनही गेले. त्याने भुयाराच्या बाहेर पाऊल टाकले व जागीच स्तब्ध झाला. इतका सुंदर नजारा शहरात कधी कधीच नजरेस पडतो. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी अख्खा आसमंत व्यापून निघाला होतं. कोवळ्या पिवळट केशरी किरणांच्या प्रकाशात निळसर ढगानाही रंगीत झालर मिळाली होती. चारीबाजूने