अंधारछाया - 1

  • 11.7k
  • 1
  • 5.4k

अंधारछाया एक मंगला खर तर सगळं आठवलं की अंगावर शहारे येतात. आणि मन सुन्न होऊन जातं! आता चांगले सहा महिने झाले त्या सगळ्याला, तरीही झोप चाळवतेच! आज ते पत्र येऊन पडले आणि जीव भांड्यात पडला. बेबीचं लग्न आहे म्हणे. मुलगा नागपूरकडचा. पुण्यात आई-वडील आहेत. नोकरीला नागपुरात आहे म्हणे. पण ही पसंत पडली पाहिजे ना. हं जाऊ देत. उद्या हेच ठरवतील पुढं काय करायचं ते. आता इतकं त्यांच्यामुळं निस्तरलयं! साहजिकच काका-काकूला, ह्यांना बोलावल्याशिवाय लग्नाचं पुढचं ठरवणं कसं प्रशस्त वाटणार? जाऊ दे. उद्या पाहू. मी हळूच लताला मधून ह्यांच्या पलिकडे सरकवली. सरळ ह्याच्या कुशीत गेले. ह्यांचा हात अंगावर घेतला. इतकं निर्धास्त वाटलं!