तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १८

(40)
  • 13.4k
  • 3
  • 6.5k

आणि तो स्वतः ....स्वतः.. गंगेच्या काठावर पोचला होता... भगवान शंकरांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे त्याच्या हातात काही चमकदार दगड होते... त्यातील एका दगडाचे मंत्रोच्चार करताच आपोआप सात खड्यांत रूपांतर झाले... त्यात खुद्द भगवान शंकरांनी दैवी ऊर्जेचे स्त्रोत निद्रिस्त अवस्थेत बांधून ठेवले होते... भगवान शंकरांच्या वरदानानुसार जेव्हा ह्या सृष्टीला मदतीची गरज असेल तेव्हा हे सातही खडे एकत्र येऊन त्यातील सुप्त ऊर्जा जागवल्यावर येणाऱ्या संकटापासून वाचविण्यासाठी सहकार्य करतील... सहा खडे तर होते.. मात्र त्यातील एक कुठेतरी हरवला होता... एक खडा तर तिला दिला होता... त्या झाडाखाली... आपली योजना समजावून सांगताना.. आणि त्यावर तिने केलेलं उदासवाण फिकट हास्य... ह्या जन्मातही त्याला जसच्या तस आठवत होत..