तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १९

(42)
  • 10.7k
  • 2
  • 5.1k

आयसीयू वॉर्डमध्ये ती निपचित पडून होती. तीच्या निस्तेज पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यावर तिने काय काय भोगलं असेल हे समजून येत होत. बाजूलाच लटकवलेली वेगवेगळ्या प्रकारची बरीच सलाईन तिला जागवण्यासाठी निमुटपणे तिच्या शिरांतून वाहत होती. बाजूच्या मशीनवर वरखाली होत जाणारी रेषा तिच्या जिवंत असण्याचा दिलासा देत होती. कित्येक तासांपासून अजुनही तिला शुद्ध आली नव्हती. बाहेर गुरुजी, बाबा आणि ओम मलमपट्टी केलेल्या अवस्थेत तिच्या रूमच्या दिशेने पाहत होते. " अनयचे नातेवाईक...?" ऑपरेशन वॉर्डमधून बाहेर येत डॉक्टरांनी विचारणा केली." आम्ही..." गुरुजी, बाबा व ओम एकसाथ ओरडले. " घाबरु नका.... छोटंसं ऑपरेशन होत... तासाभरात शुद्धीवर येईल पेशंट...आणि दोन दिवसांत बरा पण होईल... " बाकीची प्राथमिक चर्चा करून