अंधारछाया - 5

  • 6.7k
  • 2.6k

अंधारछाया पाच मंगला सदासुखला तीनचा शो पाहिला. तिथेच कॅफे रॉयलमधे आंबोळ्या, टॉमॅटो आम्लेट खाल्ले. परत टांग्यातून येता येता साडे आठ झाले. काकू वाट पहातच होत्या आमची. अंथरुणे घालून पडलो. मुलं झोपल्यावर हे दारांना कड्या कुलुपं लावून आले. उशी खाली किल्ल्या ठेवून झोपलो. पण कालचा प्रकार आठवून झोप थोडीच येत्येय? रात्र अस्वस्थेतच गेली. हे ऑफिसातून संध्याकाळीच एकदम येणार असा निरोप तातोबा घेऊन आला. मग आम्ही तिघींनी जेवणं उरकून घेतली. पडलो मधल्या खोलीत मासिकं वाचत. इतक्यात दारावरची बेल वाजली. जरा त्रासातच दार उघडले, तर दोन अनोळखी बायका दारात. म्हणाल्या, ‘आम्ही सांगलीहून आलोय. आपण महिला मंडळाच्या अध्यक्ष आहात, म्हणून भेटायला आलोय.’ दारातून कटवणार