माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 14

  • 5.6k
  • 2
  • 2.2k

१४ मेंदीच्या पानावर! एकूणच चित्र जुन्या जमान्यातल्या कुठल्याशा कृष्णधवल सिनेमासारखे धूसर होते. मी उदास झालो. आणि कंटाळून शेजारच्या घरात येऊन बसलो. तरी लग्नघरात कुणी साधे उदास पण बसू देत नाहीत.. डॉक्टरला तर नाहीच नाही. माझ्या मागोमाग कालचे ते हाय नि लो बीपी आणि स्पांडिलायटीस नि डायबिटीस वाले वरती आले. कालचे अर्धवट राहिलेले संभाषण ते पुढे चालवू इच्छुक होते. आणि आता या सकाळच्या वेळी झोपेची सबब सांगणे पण शक्य नव्हते. आता आज मोबाईलच्या युगात हे किती सोपे झालेय.. रस्त्यात कुणी येताना दिसतोय.. लावा मोबाईल आपल्या कानास आणि टाळा त्याला पद्धतशीर. ते तेव्हा मात्र शक्य नव्हते. मग नाईलाजाने मला बसावेच