प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 2

  • 8.7k
  • 3.1k

क्रमशः-२.विठ्ठल- " आमच्या गावाकडं एक म्हातारी वारली, तर तिचा मुलगा,सुन नातवांडं यांना डायरेक्ट तिला अग्नी द्यायला जाऊन दिलं नाही. पहिलं त्यांना गावातल्या सरकारी दवाखान्यात चेक करायलं नेलं आणि नंतर अग्नी द्यायला जाऊन दिलं. तेही सगळ्यांनी तोंडावर रुमाल बांधले तेव्हा."मी- " तुझं गाव कुठलं ?"विठ्ठल- " सातारा जिल्ह्यात पाटण तालुका."मी- " खेड्यातल्या लोकांच्यात अगोदरच अडाणीपणा असतो म्हणा ! व्हायरस चेक कसा करणार ? खेड्यात टेस्टींगच्या सुविधा उपलब्ध असतात का ?"विठ्ठल- " सर, व्हायरस चेक करायच्या सुविधा नसतील, पण प्राथमिक तपासणी केली जाते. जसं, घरात कुणी आजारी आहे का? , मागच्या पंधरा दिवसांत परदेश दौरा केला आहे का? , घरातील कुणी आजारी