झुंज!

  • 14.4k
  • 1
  • 2.8k

त्या लोकांनी त्यांचे सगळंच काढून घेतले. दोन्ही हातातल्या अंगठ्या, मनगटावरले घड्याळ, गळ्यातली सोन्याची साखळी, अंगावरचे कपडे सुद्धा सोडले नाहीत! इतकेच काय? पायातले बूट आणि पायमोजे सुद्धा काढून घेतले, आणि एक कफनी सारखा हिरवा झोळणा अंगावर घालायला दिला. तो झोळणा घालून त्यांनी, वॉशरूम मधल्या आरशात आपले प्रतिबिंब न्याहाळून पहिले. 'वा! भास्करराव, काय झकास दिसताय! विरळ तरी, पांढरे शुभ्र कुरळे केस, तशीच पंढरी हनुवटीपुरती दाढी, अंगावरचा हा हिरवा झोळणा, कमरेला एक कातडी पट्टा आणि त्याला लटकती तलवारच काय ती कमी! पायात गुढग्यापर्यन्त पट्ट्याने बांधलेले पायताण घातले कि, थेट ग्रीक योध्या सारखेच दिसाल! भारदस्त! काय करता? आलीय भोगासी --' भास्कररावं स्वतःशीच म्हणत,