लोच्या प्रेमातला!

  • 7k
  • 2.1k

वाट पहाणं किती त्रासदायक असत, हे समीरला आज पुन्हा जाणवलं. 'साल, या पोरींना वेळच महत्वच नसत!' त्याने सातव्या वेळेला आपल्या मनगटावरील घड्याळातवर नजर टाकली. आख्खे वीस मिनिट, तो या प्रेमदान हॉटेलच्या लॉन वर अंजलीची वाट पाहत होता! धिस इज टू मच! वेटर दोनदा ऑर्डरसाठी घुटमळून गेला होता. आता तर आसपासचे लोक पण त्याच्याकडे विचित्र नजरेने पहात होते. विशेषतः शेजारच्या टेबलवरील त्या दोन 'झिरो ' फिगरवाल्या. अंजलीच हे नेहमीचंच आहे. वेळ द्यायची अन उशिरा यायचं. मग कारण द्यायची! गोड खळीदार हसायचं! झालं.! तीच ते 'खळीदार' स्माईल पाहिलं कि, कसलं तिच्यावर रागावता येतंय? पण आज नेहमी सारखं ढेपाळायचं नाही, खडसावून विचारायचं!