हाकामारी !

  • 12.2k
  • 2.9k

किर्रर्र अंधारात, भक्क उजेड मारत शंकर मास्तरची मोटरसायकल गावात घुसली तेव्हा, दोन्ही हात हलवत, गाडी समोर कोणीतरी त्याला थांबण्याचा इशारा करत होत. गप्पकन ब्रेक दाबून त्याने आपली फटफटी थांबवली. "मायला, लाईट गेली जणू! या खेड्यात एकदा का लाईट गेली की, माहेराला गेलेल्या बायकु सारकी लवकर येत नाही! " तो स्वतःशीच पुटपुटला. हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडा वेताळ हातवारे करत उभा होता. गावात हा वेडा कसा आला कोणास ठाऊक? पण त्याच्या वेडाचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता, आणि भूत दयेपोटी कोणी त्याला हुसकावून लावले नव्हते. म्हणून तो येथेच स्थिरावला. याचे वास्तव्य कायम मसणवट्या जवळच्या पिंपळाखाली, म्हणून लोक याला 'वेताळ' म्हणून हाक मारत."काय रे