कायाकल्प --पूर्वार्ध

(17)
  • 9.4k
  • 2.4k

आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं. कौसल्याबाई वय वर्ष पंच्चावन. सुखवस्तू घरातील. नवरा लवकर गेला. शरयूच -मुलीचं-करियर घडवलं. हाल अपेष्टा सोसल्या. आता त्या तश्या सुखात होत्या. शरयू न्यूयार्कला होती. तिची काळजी नव्हती. तरी त्यांना एक खन्त होतीच. फक्त पंच्चावनीत त्यांच्या चेहऱ्यावर, सुरकुत्यांनी जाळे विणायला सुरवात केली होती! कंबरदुखी, गुडघेदुखी, थकवा, चालतानाची लागणारी धाप या व्यथा त्यांनी स्वीकारल्या होत्या. पण अकाली झालेला म्हातारा चेहरा! तो त्यांना नको होता! त्यांच्याच वयाच्या