लॉकडाउन - मी अभिमन्यु - भाग १

  • 8.6k
  • 3.8k

मला असं एकाएकी हलकं- हलकं का वाटू लागलं ? एकदम हलकं….. अगदी कापससारखं, शांत आणि शुभ्र, सर्व बंधंनातून मुक्त झाल्यासारखं... मला काही झालेले तर नाही ना? म्हणजे मला आठवतय की, मला साधारणतः एका आठवड्यापूर्वी थकवा जाणवू लागला होता. आई म्हणाली होती, “अरे, दिवसभर हॉस्पिटलमध्ये असतो ना, काय तो तुमचा नवीन आजार आला आहे, कोरोना की काय त्यासाठी, मग काम करून थकून जात असशील.” मी पण विचार केला, खरच तेव्हा हॉस्पिटलमध्ये खूप काम असायचे, डॉक्टर घोलप सरांनी त्या दिवशी मेन मीटिंग हॉल मध्ये तातडीची मीटिंग बोलावली होती. सर्व स्टाफ झाडून हजार होता. सर्वांच्या चेहर्‍यावर एक अनामिक चिंता स्पष्ट दिसत होती.