पेरजागढ- एक रहस्य.... - ६

  • 8.2k
  • 3.8k

मला जाग आली तेव्हा मी जंगलात नव्हतो.बदामाच्या झाडाखाली एका चारपायी वर लेटलेलं स्वतःला बघितलं. आजूबाजूला बघितलं तर दोन-तीन झोपळ्या होत्या. मोहक फुलांचे बाग सजल्याप्रमाणे जिकडेतिकडे फुलांची झाडे होती.समोर काही अंतरावर पटांगणात कबुतरे दाणे टिपत होती.आणि त्या कबुतरासोबतच इतर पक्षी पण प्रेमाने बागडत होते. किती सुंदर वातावरण होतं तिथलं.इथे भेदभाव नव्हता, गर्दी नव्हती, अहंकार नव्हता आणि मुख्य म्हणजे तिथली वस्तुस्थिती अगम्य होती, प्रेक्षणीय होती. सूर्य जरा बराच डोक्यावर आला होता. मी किती वेळ झोपून होतो याचे मला भान नव्हते, आणि मघापासून झोपूनच मी इकडे तिकडे बघत होतो.किती वेळ झाला? असे म्हणत मी उठायचा प्रयत्न केला, आणि सहज हात डोक्यावर गेला.