कार्तिक हजारे लिखित कादंबरी पेरजागढ- एक रहस्य.... | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी पेरजागढ- एक रहस्य.... - कादंबरी कादंबरी पेरजागढ- एक रहस्य.... - कादंबरी कार्तिक हजारे द्वारा मराठी कादंबरी भाग (43) 9.7k 18.9k 5 पेरजागढ- एक रहस्य....भाग...१...१) पवनचे सोनापुरात आगमन...मनात कितीतरी प्रश्नांचा विचार चालु होता, तीचं काय झालं असेल ...? तीने आत्महत्या तर केली नसेल ....? माझे मित्र ज्यांनी मला शोधण्यासाठी किती कष्ट घेतले असतील ....?आज दिवस कोणता आहे? कोणता वार आहे? काहीच ...अजून वाचानव्हते. सगळ्या मनाची घालमेल झाली होती. पण स्वतःची घृणा मात्र होऊ लागली होती.मी तुच्छ आहे आणि असणारच. कारण सत्व म्हणजे परब्रम्ह आहे. त्याची उपासना, त्याचे अस्तित्व असे शब्दात सांगायचे नाही. त्याचे आवाहन म्हणजे माझे फक्त कुतुहुल होते पण त्यापोटी मी काय करून बसलो होतो? स्वतः चे अस्तित्व विसरुन गेलो होतो.विसरून गेलो होतो की ज्याने आम्हाला घडवले आहे,त्याच्या समोर आपण एक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नवीन एपिसोड्स : Every Friday पेरजागढ- एक रहस्य.... - 1 2.4k 3.7k पेरजागढ- एक रहस्य....भाग...१...१) पवनचे सोनापुरात आगमन...मनात कितीतरी प्रश्नांचा विचार चालु होता, तीचं काय झालं असेल ...? तीने आत्महत्या तर केली नसेल ....? माझे मित्र ज्यांनी मला शोधण्यासाठी किती कष्ट घेतले असतील ....?आज दिवस कोणता आहे? कोणता वार आहे? काहीच ...अजून वाचानव्हते. सगळ्या मनाची घालमेल झाली होती. पण स्वतःची घृणा मात्र होऊ लागली होती.मी तुच्छ आहे आणि असणारच. कारण सत्व म्हणजे परब्रम्ह आहे. त्याची उपासना, त्याचे अस्तित्व असे शब्दात सांगायचे नाही. त्याचे आवाहन म्हणजे माझे फक्त कुतुहुल होते पण त् आता वाचा पेरजागढ...एक रहस्य...भाग 2 1.5k 2.3k २) पवनचे सोनापुरात आगमन आणि शुरुवात... तितक्यात समोर गणेशाची मुर्ती दिसली, तिला ही नमन करून मी सुखरूप घरी पोचवण्याची विनंती करु लागलो. माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याचं असचं होत. आता माझंच बघा ना!!! किती देवांच्या पायी ...अजून वाचाआलो. कित्येकांना स्मरलं मी माझं जीव वाचवण्यासाठी. इतरांसारखी माझी अवस्था होवु नये म्हणुन .... आता नेमकं एखाद किलोमीटर अंतर उरलं असेल. मला जगण्यासाठी पुरेसे काही क्षण.पुरेशी काही वाट. अख्खं जीव एकवटुन मी धावत होतो. नाकातून,तोंडातून श्वास जोरा जोरात घेतला जात होता. त्याचा आवाज दुर दूर पर्यंत घुमत होता.... आणि आता माझं एकवटलेल शरीर साथ आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - 3 1k 1.9k ३) मृत्यूचे आगमन...पेरजागडची छवी मनात ठेवून मी त्या दुसऱ्या दिवशी सकाळीच परत आलो. आज कितीतरी दिवसांनी मनामध्ये परत एकदा असमर्थता जाणवत होती. खरं तर ती माझं प्रेम होती. आणि आजही मी तिच्यावर तितकंच प्रेम करत होतो जितकं आधी करत ...अजून वाचामी कित्येक वेळा तिला विसरण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं ... जेव्हां आज इतक्या दिवसांनी ती मला भेटली तर साहजिकच ती माझ्या मागावर असणार.आणि शेवटी ती माझ्या मित्राला घेवुन ती माझ्या घरी आलीच.काय झालं काय आहे?काय चाललंय तुझं?मी तुला कालच सांगितलं गडावर.ते माझं उत्तर नाही पवन.. आज खरं खरं सांग ... चार वर्ष झाली आज... मी पण निश्चय केला आहे... आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - ४ 822 1.5k ४) पवनला हॉस्पिटलला नेणे...गडाच्या पायथ्याशी एक मंदिर बसलं आहे.कालांतराने गड जेव्हा फॉरेस्टच्या हद्दीमध्ये गेलं, तेव्हा खाली असलेली दोन ते तीन एकर तेवढीच जागा फक्त देवस्थानच्या नावे राहिली.आणि तिथे रखवालदार फक्त एक माणूस राहतो.सकाळी रोजच्यासारखा तो जेव्हा झोपून उठला, तेव्हा ...अजून वाचात्याने फेरफटका मारण्यास सुरुवात केली. अचानक गडाच्या प्रवेशद्वारापाशी, त्याला मी निपचित पडलेला आढळून आलो.तो घाबरत घाबरत माझ्यापाशी आला. डोक्यातून आणि गुडघ्यातून घरंगळत आल्यामुळे थोडेफार रक्तसंचार होऊ लागले होते. आधी त्याने मला पालथ्या पडलेल्या स्थितीतून सरळ केले. आणि मी जिवंत आहे की मेलो आहे याची जाणीव केली.अत्यंत कमी प्रमाणात माझा श्वासोच्छवास चालू होता. त्यामुळे त्याला जरा हायसे वाटले. आणि आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - ५ 621 1.3k ५)मृत्यूचे रहस्य....जेव्हा पेरजागडच्या ट्रीपवर मला नमन मिळाला नाही.त्याची शोधमोहीम मी चालूच ठेवली होती. कारण त्यानंतर या त्याचं किंवा माझं मृत्यू होणे हे अटळ होतं. कुणाला फोन लावावा? काय करावं? काहीच कळत नव्हते. जर कुणाला घरी वगैरे बोलवून त्याला सविस्तर ...अजून वाचासांगितलं तर तो मला खुळा समजेल असं मला वाटत होतं. एखाद्या ढोंगी बाबा ने तुम्हाला काहीतरी सांगावं, आणि तुम्ही त्यावर विश्वास करावा. काय खेळ चाललाय काय? असे लोक म्हणायचे आम्हाला. खरंच ज्याचं जळतं त्यालाच कळतं. दिवसेंदिवस माझ्यातला उत्साह कमी होत जात होता. घरच्यांना माझ्याबाबत काळजी वाटू लागली होती. रोजच्या दिनचर्येचा सूर्य जसा पश्चिमेला जात होता. तसतसं आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - ६ 426 813 मला जाग आली तेव्हा मी जंगलात नव्हतो.बदामाच्या झाडाखाली एका चारपायी वर लेटलेलं स्वतःला बघितलं. आजूबाजूला बघितलं तर दोन-तीन झोपळ्या होत्या. मोहक फुलांचे बाग सजल्याप्रमाणे जिकडेतिकडे फुलांची झाडे होती.समोर काही अंतरावर पटांगणात कबुतरे दाणे टिपत होती.आणि त्या कबुतरासोबतच इतर पक्षी ...अजून वाचाप्रेमाने बागडत होते. किती सुंदर वातावरण होतं तिथलं.इथे भेदभाव नव्हता, गर्दी नव्हती, अहंकार नव्हता आणि मुख्य म्हणजे तिथली वस्तुस्थिती अगम्य होती, प्रेक्षणीय होती. सूर्य जरा बराच डोक्यावर आला होता. मी किती वेळ झोपून होतो याचे मला भान नव्हते, आणि मघापासून झोपूनच मी इकडे तिकडे बघत होतो.किती वेळ झाला? असे म्हणत मी उठायचा प्रयत्न केला, आणि सहज हात डोक्यावर गेला. आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - ७ 348 831 ७)पवन...एक कुतूहल...हॉस्पिटलमध्ये होत असलेली धावपळ सगळ्यांच्या निदर्शनास येत होती. रितूला एक प्रकारे मानसिक धक्का बसल्यासारखा होता. कदाचित ऐकताना तिला जे काही वाटले नव्हते, पण आज प्रत्यक्षात बघतांना ती अनुभवत होती. रात्रीची ती जी काही परिस्थिती होती.तिला समोरही काय करावं? ...अजून वाचानाही ?हा विचार गुंतत चालला होता.भिंतीवरच्या येशूला डोळ्यातले अश्रू देऊन ती सारखी मला मागत होती.तिच्या जीवनाची मनीषा अशी विझु नको देऊस, सतत हीच प्रार्थना तिच्या अंतर्गत गाजत होती. रात्री झालेल्या धावपळीमुळे बिचारी ती माझ्या बाजूलाच निशब्द होऊन बसली होती.जिवाचं पण लावायला सुद्धा ती मागेपुढे बघणार नव्हती.तिच्या मनाची ती कठोर निष्ठा,खरंच दगडाला सुद्धा पाझर आणणारी होती. सकाळी आई आली.आल्या आल्या तिने आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - ८ 402 984 ८)नमनची भेट.... साधु महाराजांशी बोलून झाल्यावर, माझ्या मनाची पूर्तता झाली होती.नकळत त्यांनी मला खूप काही सांगितले होते.अस्तित्वाचा पुरावा हा मला त्यांनी डोळ्यादेखत दिला होता. ज्यामुळे सत्य आणि सत्व यामध्ये काय अंतर आहे हे मी जाणू शकलो.गावाकडे परतल्यावर माझ्यावर ...अजून वाचाझालेला बदल सगळ्यांनी अचूक हेरला होता.पण नेमकं काय झालं?अशी विचारणारी फक्त रितू होती. त्यादिवशी कुठेतरी जायला निघालो होतो, की दरवाज्यात तिचे पाऊल पडले.काय मालक कुठे चालले? तिचा पहिलाच प्रश्न.अगं कुठे नाही.... मला नमनचा शोध घ्यायचा आहे ना... त्याच्यासाठी सोशल मीडियावर काहीतरी प्रयत्न करतो. अच्छा..... प्रवास कसा झाला? काही मनासारखे घडले ना!!! की काही अजून विपरीतच होणार.भेटला काय तो माणूस? आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - ९ 333 789 ९)मृत्यूची आणि नमनची गाठ....(पूर्ववत...)घरी जाताना आटो पकडली.आणि थैली विसरली की काय?म्हणून सतत त्यावर माझी लक्ष जात होती. कितीतरी दिवसानंतर आज माझ्या चेहऱ्यावर असणारा उदय खरच चित्रफिता मध्ये टिपण्यासारखा होता. असं वाटत होतं की ही वेळ केव्हा जाते? आणि केव्हा ...अजून वाचाजाऊन मी ती थैली उघडून बघतो?उत्सुकता माझी शिगेला पोहोचली होती. पण इकडे मात्र काही वेगळेच वारे वाहू लागले होते. नमनला त्या गोष्टीचा पूर्वाभास केव्हाच झाला होता. पण जसं घरच्यांपासून त्याने लपवलं होतं. तसंच ती गोष्ट त्याने माझ्यापासून देखील लपवली होती.दोन दिवस त्याने ते चाबकाचे फटके स्वीकारले होते.पण मी त्याला सामोरी भेटलो असून सुद्धा त्याने मला त्या गोष्टी आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - १० 291 747 १०) पवनची आणि इन्स्पेक्टर राठोडची गाठ... मला या गोष्टीची पूर्वकल्पना आलीच नाही.ऑटोतून उतरल्यावर मी सगळ्यात आधी घरी आलो आणि ति थैली व्यवस्थित कपाटात ठेवून आधी आंघोळीला गेलो.मठात विभूतीचा कसला ना कसला अंगारा अंगास येऊन चिकटलेला होता.ज्यामुळे मला कसंतरी ...अजून वाचालागले होते. माझी रूम म्हणजे स्पेशल अशी बाजूला होती.मला विचारल्याशिवाय घरचे सुद्धा त्यात प्रवेश करत नव्हते. आणि माझं अस्तित्व म्हणजे ती माझी खोली असायची.माझं अभ्यास करण्यापासून माझं मनन, चिंतन, शोकसभा त्या रूममध्ये व्हायची.त्यामुळे एकाच घरात दोन तुकडे या प्रमाणे माझं होतं. शिवाय मला बहीण अशी नव्हती ज्यामुळे कोणी मला भावनांची देवाणघेवाण केलं असतं. आई वडील होते पण ते सुद्धा स्वतःच्या आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - ११ 246 783 ११)इन्स्पेक्टर राठोडची आणि रितुची पूर्वतयारी...सततच्या होत असणाऱ्या शारीरिक यातना, मला होत्या की नाही हे मला माहिती नाही, पण रितूला माझा प्रत्येक दिवस हा एक चॅलेंज होता.इतक्या भयानक वेळीसुद्धा तिने क्षणभरही अंतर मला दिला नव्हता. आणि मी मात्र नेहमी तिला ...अजून वाचाठेवलं होतं. या दोन ते तीन दिवसात माझ्यात काहीच बदल पडलेला नव्हता.याउलट माझ्यावर नको त्या वळांचे जखम मात्र झाले होते.स्वतः डॉक्टरच्या मागे एकच नवे आव्हान उभे राहायचे. आणि माझी आई एका मुलाच्या मायेने त्यांच्या पाया पडत होती. परत एकदा तो व्हिडिओ सगळेच बघू लागले. जे राठोड ने रात्री बघितले होते. ज्या वेळेस रात्री हे घडत होते आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - १२ 258 672 १२) पेरजागढ संशोधन... नमनच्या मृत्यूनंतर मी फार प्रमाणात एकटा पडलो होतो.त्यामुळे सतत कुठे जावे? काय करावे? याचा विचार नेहमीप्रमाणे येतच होता. अशात एक विचित्र घटना माझ्यासोबत घडली होती. शेतात जाताना मी एका शेपटी गळलेल्या नागाचा वध केलेला होता. ...अजून वाचामला सतत नाग दिसत असायचे. कधी स्वप्नात तर कधी सत्य रूपात.कित्येकदा कुठे बाहेर जरी फिरायला पडलो तरी दर्शन व्हायचे. या दोन-तीन दिवसाच्या सहवासात "बदला नागिन का" हा सिन चांगलाच अनुभवला. त्यामुळे घरी सगळे ओरडू लागले होते, की नको तसले उपद्रव कशाला करतो हा मुलगा. आता जीव घेतलं त्या बीचाऱ्याचा. कोप झालाय त्या नागमातेचा. आता मागे तर लागणारच आहे. उपासना आता वाचा पेरजागढ- एक रहस्य... - १३ 273 750 १३) रहस्याचा थोडाफार खुलासा आणि पवनचे सोनापुरात आगमन...काही दिवसांपूर्वीच मला आपले नातेवाईक सोनापूरला असतात मला असे कळले.आधीपासूनच मी रिलेशनमध्ये कुठे गेलो नसल्यामुळे माझी कित्येकांची ओळखी अशी अर्धवटच होती. त्यामुळे तिथले नाते माझ्यासाठीतरी अपरिचितच होते. काही दिवसांपूर्वी ते गावाकडे आले ...अजून वाचात्यावेळी माझा आणि त्यांचा परिचय झाला. मला त्यांनी आवर्जून आपल्या गावाकडे यायला सांगितलं आणि यावेळी तशी संधी पण चांगली होती. त्यांचा नंबर बघत मी त्यांना कॉल केला आणि मी येत असल्याचा खुलासा केला. मी येत असल्यामुळे त्यांनी पण आनंदाने मला, अगदी आवर्जून ये म्हणून म्हटलं. कारण त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी तरी मी पहिल्यांदाच तिथे चाललो होतो. त्यामुळे जितका आनंद मला तिथे आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - १४ 201 462 १४)स्वारी पेरजागढाची... तिरीपीचा सूर्य केव्हाच वर निघून गेला. तरी माझी झोपेतून उठायची वेळ होईना.चुलीवरचा चहा कधीचं थंड पडून गेला होता, आणि सकाळचे आठ वाजले तरी उठायचं नाव नाही.म्हणून काकूने अंगावरील चादर ओढली, इतकं कुणी झोपतोय का... जा तोंड ...अजून वाचाघे आधी... चहा थंड पडून गेल कवाचं. माझ्यासाठी गावाकडची मजा म्हणजे पहिल्यांदाच झाली होती. त्यामुळे पहिल्यांदा मला फार नवल वाटलं होतं. कारण आपल्याकडची सकाळ म्हणजे फक्त माझी रूम, त्या पलीकडे असलेला सूर्यनारायण बघणे कधी आयुष्यात जमलेच नाही. सगळे काही आवरता आवरता 10 केव्हा वाजून जायचे कळायचेच नाही. जेवण करून कुठे बाहेर निघावं म्हटलं तर अर्धा दिवस घरीच निघालेला असायचा. आणि आता वाचा पेरजागढ- एक रहस्य... - १५ 228 543 १५) रितुला ताईत मिळणे... इन्स्पेक्टर राठोड... जेव्हापासून त्यांनी माझ्या केस वर लक्ष द्यायची वेळा चालू केली होती. तेव्हापासून एक त्यांच्या जीवनात एक वेगळाच प्रवास चालू झाला होता. कधी त्यांनाही वाटले नव्हते की जगात अस्तित्वाच्या बाहेरही विशाल जग आहे म्हणून. ...अजून वाचादंतकथा पेक्षा तंतोतंत उदाहरण त्यांना फार अधिक प्रमाणात आवडायचे. तसं राठोडला म्हणजे पोलिसांना बघण्याचा प्रत्येक गावकऱ्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामुळे साधा माणूस जेवढा जनसामान्यात मिसळून हवी ती माहिती काढून घेतो तसा ह्या पोलिसाला जमले नसते. पण प्रयत्न आधी त्याचे चालू होते. मी कोणाची भेट घेतली? कुठे वगैरे जायचो? वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी नोंदी केल्या होत्या. आता वाचा पेरजागढ- एक रहस्य.... - १६ 309 870 १६)शेवटी रितूचा विश्वास जिंकला...इकडे इन्स्पेक्टर राठोड आज जरा सुट्टीवर होता.सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज परत त्याने चिकन बनवली होती.त्यामुळे त्यालाच पोलीस चौकीवर पोचायला वेळ झाला होता.अन्यथा सगळेजण केव्हाच पोचले होते. मागाहून जाऊन सुद्धा इतरांवर जरा राठोड खेकसला.माझ्या अगोदर येऊन जमा ...अजून वाचाचांगली गोष्ट आहे. पण इथे तोंड काय पाहता माझं.काढा ती जीप. आपण येथे कशासाठी आलो हे ठाऊक नाही काय तुम्हाला? चला लवकर.. तोंड बघताय नुसती... आणि पोलीस चौकीतून गाडी निघाली पेरजागडाच्या दिशेने. काही तासात सोनापूर ओलांडून गाडी पेरजागडाच्या खालच्या आवारात जमा झाली. रोजच्या सारखं तसं गडावर कोणी नव्हतं.मंदिरात असणारा गृहस्थ पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे गेला असल्यामुळे मंदिरात असं कुणीच नव्हतं.त्यामुळे आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही कार्तिक हजारे फॉलो करा