९)मृत्यूची आणि नमनची गाठ....
(पूर्ववत...)
घरी जाताना आटो पकडली.आणि थैली विसरली की काय?म्हणून सतत त्यावर माझी लक्ष जात होती. कितीतरी दिवसानंतर आज माझ्या चेहऱ्यावर असणारा उदय खरच चित्रफिता मध्ये टिपण्यासारखा होता. असं वाटत होतं की ही वेळ केव्हा जाते? आणि केव्हा घरी जाऊन मी ती थैली उघडून बघतो?उत्सुकता माझी शिगेला पोहोचली होती.
पण इकडे मात्र काही वेगळेच वारे वाहू लागले होते. नमनला त्या गोष्टीचा पूर्वाभास केव्हाच झाला होता. पण जसं घरच्यांपासून त्याने लपवलं होतं. तसंच ती गोष्ट त्याने माझ्यापासून देखील लपवली होती.दोन दिवस त्याने ते चाबकाचे फटके स्वीकारले होते.पण मी त्याला सामोरी भेटलो असून सुद्धा त्याने मला त्या गोष्टी शब्दानेही मला सांगितल्या नव्हत्या.
त्याच्याबद्दल मी जितके आदर करावे तीतकेच मला कमी वाटत होते.त्याने स्वतःच्या प्रत्येक गोष्टीत हळवेपणा केला होता.की कुणालाच त्याची जाणीव सुद्धा होऊ दिली नाही.स्वतःला आईवडिलांपासून लपवलं ,स्वतःच्या प्रेमाला स्वतःच्या अस्तित्वामागे दडवलं, आणि आज मृत्यूची इतकी मोठी लहर त्याच्या अंगावर येऊन ठेपली होती, तरी त्याने हसतमुख करून स्वतःच्या मैत्री मागे लपवलं.आता खरंच सांगा... त्या मित्राला काय म्हणू मी? कृतघ्न की कृतज्ञ?त्याला रागाने बोलू की प्रेमाने समजावून जवळ घेऊ.
त्या दिवशी त्याला फार प्रमाणात उष्ण वाटू लागले होते.जसं कुणी लाल गडद असलेल्या निखाऱ्यावर त्याला लटकवलं असून त्याची कातडी कुणीतरी सोलु बघत आहे.तो घाबरला होता, इतका की फार प्रमाणात. त्याला सुचत नव्हते की काय करावं?खोलीतल्या खोलीत इकडे तिकडे चकरा मारू लागला होता.उष्णतेमुळे त्याचे पाय बाथरूमच्या टपाकडे वळले.त्यातले पाणी हाताची बोटे पण सुकडून जावी इतके थंड होते. तो त्या टपात जाऊन बसला.
पण हे काय? हातापायाची बोटे गोठून बर्फ व्हावी असा तो थंडगार पाणी क्षणातच गरम होऊ लागला. त्याच्या वाफा निघू लागल्या होत्या. काही वेळातच ते इतकं कळतं झालं की त्याचे चटके नमनला परत त्रास देऊ लागले होते.काय घडतय माझ्याशी? असं म्हणून त्याने जवळ असलेल्या मोबाईलला हातात पकडण्यासाठी हात समोर केले, तर मोबाईल चालू होईना. हे काय घडत आहे?हे त्याच्या लक्षात आले होते. मला वाचव .....पवन..... पवन ...त्याच्या मुखातून हाका निघू लागल्या. त्याला सहन होऊ शकत नाही असे गरम गरम वारे त्या खोलीत वाहू लागले होते.
कसंतरी विव्हळत तो हॉलमध्ये आला. जमिनीवर इकडे तिकडे घरंगळू लागला होता.आत मधल्या दारातून एक पुसटशी काळी सावली त्याला त्याच्याकडे येतांना दिसत होती. चट चट असा चाबकाचा आवाज त्याच्या कानाशी गुंजत होता. आता नमनला कळून चुकलं होतं.आतापर्यंत आपण ज्याची चर्चा फक्त चालू केली होती आज तो मृत्यूदेव त्याच्या दारात उभा होता.अचानक एक भयानक हसण्याचा आवाज त्याच्या कानाशी आला. अंगात वाढत असलेल्या उष्णतेमुळे घाम सुद्धा येत नव्हता.पण त्या सावलीला बघून नमनला मात्र वाटत होते, की आता त्याचा मृत्यू फार काही लांब नाही.
मुखातून त्याला वाचविण्याचे ध्वनि आता त्याला साथ देणार नाही, हे त्याला कळले होते. चट चट दोन वार त्याच्या पाठीवर पडली. चाबका सरशी त्याच्या पाठीवर असणारे कपडे फाटून गेले होते.त्याची पाठ अशी उघडपणे सामोरी आली होती.रक्ताचे थेंब वळातून ओघळू लागले होते. नमन आता वेदनेने जोरजोरात विव्हळू लागला होता.त्याचे कर्कश आवाज कानठळ्या बसवणारे होते. चट चट असे चाबकाचे वार वारंवार होऊ लागले होते.रक्ताचे असे ओघळ वाहू लागले होते.
नमनला त्याचा जीव वाचवण्यासाठी समोर कोणताच पर्याय दिसत नव्हता.मला वाचवा ...असं करुण स्वर नरम आवाजात ऐकायला येत होती.पण एक गोष्ट नमनला दिसली आणि थोडाफार हर्ष त्याला दाटून आला. कारण समोर बाहेरचा दरवाजा उघडा पडलेला त्याला दिसला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता दरवाज्यावर धाव घेतली.मागून क्रूर भयानक हास्य ऐकायला येत होते नमनला. पण आता चिंता नव्हती.तो सुसाट वाट मिळेल तिकडे पळू लागला होता.पळता पळता तो हायवेवर निघून आला होता.
पण शेवटी मृत्यूच तो! आजपर्यंत त्यापासून कोणी वाचू शकला नाही. आणि आपण तर त्याच्यासमोर काही शूद्र जीव होतो. नमनला काही क्षणासाठी वाटले की आता त्याचे प्राण वाचले असतील. पण रेड्याचं हंबरनं त्याला स्पष्ट ऐकू आलं आणि त्याने मागे वळून बघितलं.
काही वेळापूर्वी असलेली ती पुसटशी आकृती एका रेड्यावर बसून येत होती. आणि भयानक ते क्रूर हास्य जीवाची धमकी देत होते.पण एक होतं हायवे म्हटल्यावर कितीतरी भरधाव गाड्या रस्त्याने चालत होत्या.एव्हाना नमनचं रक्ताने लाल झालेल शरीर बघून हायवेवरुन कितीतरी लोक थांबून जात होती. कारण मृत्यूदेव तो कुणालाच दिसत नव्हता. आणि कोणतीही गाडीपण त्याला अडवू शकत नव्हती. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, तो नमन शिवाय कुणाला दिसू शकत पण नव्हता.
कसं असतं माणूस हा असा प्राणी आहे, की जीव वाचवण्यासाठी तो अगदी कुठल्याही थराला जाऊ शकतो. हे आपल्याला ठाऊकच आहे. आणि फक्त माणसाच्या बाबतीत नाही तर इतर कोणत्याही सजीवात ते साम्य आढळते.ती धडपड कधीही माणसाला नवीन मार्ग दाखवते.पण ही धडपड त्याची शेवटची झाली होती.
धावता-धावता शेवटी तो धावणार तरी किती? समोर चौरस्ता आला आणि दमलेला नमन तिथे येऊन थांबला.आता त्याला जाणीव झाली होती की तो कितीही धावेल तरी काळाच्या समोर तो धावु शकत नव्हता.आणि एक विचार करून त्याने आपली प्रतिमा मागे केली.कदाचित प्राणाची भीक मागावी असा त्याचा हेतू असावा. पण ती भिक तरी तो कुणाला मागत होता. ज्याला फक्त प्राण घेण्याचे काम होते. तो तिथेच धापा टाकत उभा राहिला.मघाशी असलेली ती काळी आकृती भयावह असा आवाज करून रेड्यावर किंकाळत त्याच्या जवळ येऊन ठेपली.
चौराह्यावर लोकांची गर्दी उमटू लागली होती. पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर दिसत होता.येणारा प्रत्येक जण त्याही वेळेस अचंभित होऊन हे सगळं बघत होता.कुणालाच कळत नव्हते की शेवटी हे काय घडत आहे?आणि नमन छिन्न विच्छिन्न अवस्थेत तिथे उभा होता.त्याला भय तरी कुणाचं होतं?कुणाला बघून तो इतका पळत होता.चेहर्यावर असलेले भाव एवढे चित्तथरारक होते, की तिथे असणारा प्रत्येक जण प्रतिद्वंदाला आडवा गेला असता.पण कोण आहे?जो कुणालाच दिसत पण नव्हता.
परत एकदा भयानक अशी किंकाळी त्या नमनच्या कानावर आली.पण या वेळेस त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. कारण इतक्यात त्याने मृत्यूला जाणून घेतलं होतं. मृत्यूदेव त्याच्या भोवताल त्याला न्याहाळू लागला होता.आणि चाबकाचे फटकार त्याच्या शरीरावर बसू लागले. शरीरावर जागोजागी वळ येऊ लागले. रक्ताच्या धारा ओघळू लागल्या होत्या. आणि हे सगळं भरचौकात शहराच्या मुख्य रस्त्यावर घडत होते.
कित्येक लोक घाबरून बेशुद्ध पडून जात होते. आपल्यासमोर कोणाचा जीव जात आहे हे कित्येकांसाठी हृदय हेलावणारे प्रसंग होते.त्याची ती आर्त हाक कित्येकांचे डोळे पाणावणारी होती.कित्येक लोक उत्साहाने ते सगळं स्वतःच्या मोबाईल मध्ये शूट करत होते. भरल्या चौकात हा विचित्र व भयानक असा प्रसंग कितीतरी वेळ चालत होता. जिकडेतिकडे लाल रंगाचे ठिपके सड्याप्रमाणे ओघळू लागले होते.
शेवटी काही वेळाने होतं नव्हतं ते सगळे त्राण नमनच्या देहातून संपलं होतं. आणि तो वसुधेच्या पाठीवर धारातीर्थी कोसळला.अंतिम प्रसंगी त्या भयानक मृत्युने त्याच्या प्राणावर विळखा घातला होता.हळु हळू त्याची पापणी झुकली होती. उजेडाचा साम्राज्य मिटवून त्याने काळोखात प्रवेश केला होता. तो आवाज, तो करुण ध्वनि केव्हाच बंद झाला होता. उरला होता तिथे फक्त एक देह,हाडामासाचा देह.रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक निर्जीव देह. काय झालं?माहिती नाही.कुणी मारलं? तर माहिती नाही.आणि कसं मारलं?तर तेही माहिती नाही. इतक्या लोकांच्या उपस्थितीत त्याचा असा तडफडत जीव गेला पण कुणाला काही कळलं काय?तर काहीच नाही.
इतकं सगळं झालं,तरी तो मरूनही त्याचं ते प्रेत त्या उघड्या रस्त्यावर पडलं होतं.पण बघणार्यांची गर्दी वाढतच होती.एखादा जीव तोडून कसरत करतो आहे त्याची कला दाखवतो आहे.त्या सारखं लोक घोळक्याने तिथे उभे राहात होते.ट्राफिक केव्हापासून जाम होऊन गेलं होतं.आतापर्यंत घडत असलेल्या कृत्याचं ते व्हिडिओ, केव्हाच वायरल झालं होतं.
किती वेळ ही गर्दी होणार होती?शेवटी जिकडेतिकडे ही गोष्ट वायरल झाली.आणि येत्या एक तासात जिकडून तिकडून गाड्या जमा झाल्या.आणि घटनास्थळी दाखल झालेल्या ॲम्बुलन्स मधून दोन माणसे उतरली. त्यांनी नमनला उचललं आणि गाडीत टाकून निघून गेली.पोलिसांनी त्या जागेवर सील लावली, आणि तेवढ्या जागेची रहदारी बंद करून ते आपल्या पुढील कामास लागले.