perjagadh - 7 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - ७

७)पवन...एक कुतूहल...हॉस्पिटलमध्ये होत असलेली धावपळ सगळ्यांच्या निदर्शनास येत होती. रितूला एक प्रकारे मानसिक धक्का बसल्यासारखा होता. कदाचित ऐकताना तिला जे काही वाटले नव्हते, पण आज प्रत्यक्षात बघतांना ती अनुभवत होती. रात्रीची ती जी काही परिस्थिती होती.तिला समोरही काय करावं? काय नाही ?हा विचार गुंतत चालला होता.भिंतीवरच्या येशूला डोळ्यातले अश्रू देऊन ती सारखी मला मागत होती.तिच्या जीवनाची मनीषा अशी विझु नको देऊस, सतत हीच प्रार्थना तिच्या अंतर्गत गाजत होती.

रात्री झालेल्या धावपळीमुळे बिचारी ती माझ्या बाजूलाच निशब्द होऊन बसली होती.जिवाचं पण लावायला सुद्धा ती मागेपुढे बघणार नव्हती.तिच्या मनाची ती कठोर निष्ठा,खरंच दगडाला सुद्धा पाझर आणणारी होती. सकाळी आई आली.आल्या आल्या तिने नर्स कडून चौकशी करून घेतली.तिच्या डोळ्यातल्या अश्रू ह्या कोसळतच होत्या. आणि नेमक्या त्याच वेळेला तिचे मातृत्व असं घरी पहुडलेलं होतं याची तिला राहून राहून खंत वाटत होती.पण रात्रभर जागलेल्या रीतुकडे तिची नजर जाताच, एक समाधान तिच्या चेहर्‍यावर आलं होतं.कि तीचा मातृत्वाच्या नाळपेक्षा एक सप्तशृंगीची मजबूत गाठ तिथे बांधलेली होती. यामुळे घाबरण्याचा काही प्रश्न नव्हता. ती रीतू जवळ आली आणि म्हणाली....

बाळ रितू... रात्रभर जागीच होतीस ना.... जा झोप बघू थोडा वेळ.... मी आहे ना आता आले ....मी बघते आता.. तू जरा विश्रांती घे बघू...

तो केव्हा उठणार ग आई ....मी तर झोपेलच ना... पण त्याला उठायला सांग ना .... गेली चार-पाच वर्षे नुसता मला टाळतोय...आणि आत्तापण तेच करतोय.... कावळा असेल नेमका... मागच्या जन्मात ... नेमक्या जखमा टोचणारा... आवडतं ना त्याला ....माझी मजा घ्यायला...

तू एकच तर आशा आहे माझ्यासाठी... कधी नव्हे ते आज मला त्याची कमतरता भासते आहे. धन्य आहेस ग पोरी, तुझ्यासारखी पोरगी सून म्हणून होशील.पण बघ ना काळाने कसे दिवस काढलेत.

त्यात दोन्ही जीवांचे ते माझ्याबद्दलचे प्रेम फार अपार होते.एकीकडे आई होती, जिच्यासाठी मी तिचा आधार होतो आणि एकीकडे ती होती, जीचा मी पूर्ण विश्व होतो. आणि आता तीच माझा आधार झाली होती. नशिबाने पण काय वेळ काढली होती. जिला भेटण्यासाठी मी इतके दिवस भीत होतो. तिची भेट आणि तिचा स्वीकार सुद्धा अशा वेळी केला. जेव्हा मरण यात्रेच्या पार्श्वभागावर मी स्वतः अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत होतो.

नुकताच काका आणि काकू पण हॉस्पिटलला आले होते. आणि सोबतच माझा एक ट्रॅकर मित्र पण आला होता. त्याने मला कितीतरी वेळा बजावलं होतं की वास्तव्य म्हणजे असणेच नाही तर प्रतीत होणेसुद्धा असते.असं कधीच नको समजू, दोन्हीचा अर्थ एक असला तरी त्याचे उच्चारण आणि आचरण वेगवेगळे आहे.तो नात्याने माझा मामा लागायचा.ट्रेकिंगचा खरा अर्थ त्यांनीच मला समजावून सांगितला होता. जंगलात काय महत्वाचं आहे, त्यानेच मला प्रात्यक्षिक करून दाखवले होते. ज्याला माझ्या आयुष्यात मी जंगलाचा दुसरा राजा अशी पदवी दिली होती.

सोबतच गावचा सरपंच पण आला होता. ज्याने अव्हेरून सुद्धा सतत माझे पाय माघारीच्या विरुद्धच होते. प्रत्येकाने स्वतःचे हक्क मर्यादित रुपाने चांगले बजावले होते.आणि मी मात्र जिकडे तिकडे हिंडत बसलो होतो. सगळ्यांना काळजीत ठेवून.एकीकडे मृत्यू माझ्या पाठीशी होता.आणि मी आत जातच होतो, ज्या वाटेला जायला शरीराची रचना मला अशी बाजूला ठेवायला लागली होती.

न्यूज घडामोडीवर आज माझ्या भागात मी पेपरचा एक ठळक हिस्सा होतो.प्रत्येक जण माझ्यात आणि इतक्यात घेतलेल्या कार्याबद्दल रूची ठेवत होता.दोन फॉरेनर पण नुकतेच येऊन गेले होते.ज्यांच्याजवळ मी सगळी कल्पना शेअर केली होती.

ऐकलं होतं जर वृत्तपत्रावर यायचं असेल तर, काहीतरी फार चांगले करा किंवा काहीतरी फारच वाईट करा.पण माझ्या आयुष्यात जे घडत होतं, ते कोणत्या पाप किंवा पुण्याचं वर्गीकरण होतं ते मला कळत नव्हतं.कारण नियतीच्या समोर माझं खेळणं झालं होतं.सतत होत असलेल्या जाणिवेमुळे मला अजून तरी हवं ते कारण मिळालं नव्हतं.ज्यामुळे इतकं सगळं असताना देखील मला निरर्थक असल्यासारखे वाटत होते.कारण मृत्यूचे खरे कारण अद्यापही मला मिळाले नव्हते. आणि जिथे मी त्याच्या जवळ जवळ जात होतो, इतक्या अथक प्रयत्नानंतरही मृत्यू माझ्या मागे लागला होता.

बातम्या वाचून कित्येकांच्या हृदयाचा आवाज, रितु आणि माझी आई अश्रूंच्या पावसासोबत ऐकत होती.प्रत्येक वेळी तिच्या मनात एकच आर्त स्वर गुंजत होता. तिला चांगलं माहीत होतं की हे सगळं लवकरच मिटणार आहे.चाबकाचे फटके बसणे, म्हणजे माझ्यावर आता मृत्यूची शेवटची वेळ आली आहे, हे तिला चांगल्या प्रकारे माहीत झालं होतं.

इकडे डॉक्टरांची मीटिंग बसली होती.सगळ्यांसाठी माझ्यावर हे चाबकाचे फटके, एक प्रकारचे कधीही न बघितलेले प्रसंग होते. आणि ज्या नर्स बहिणींनी मला बेडवर धडपडताना बघितलं होतं.त्यांची तर माझ्याजवळ उभा राहण्याची पण हिंमत होत नव्हती.त्यांना तर सगळे उच्च अधिकारी दरडावल्याप्रमाणे विचारत होते.आणि त्या भीतीने तेच सांगत होत्या जे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं.डॉक्टरांच्यासाठी खरंच हा एक पेचात पाडणारा प्रसंग होता.

मुंबईहून डॉक्टर बोलावल्या जात होते.एव्हाना सोशल मीडिया तर्फे जिकडेतिकडे माझ्या या आजारपणाची वार्ता चालली होतीच.तर कित्येकांनी माझ्या शरीरात, काही दैवी शक्ती येत असल्याचा तर्कवितर्क केला होता. कित्येकांनी माझ्यावर काही प्रयोग करता येईल का अशी मागणी पण केली होती.

आपल्या जगाची अशी एक आगळीवेगळी गंमत आहे. सतत प्रत्येकाला काहीतरी नवीन पाहिजे असतं, आता माझ्याबाबत ठीक आहे.पण जरा काही वेगळे आढळून आले, की लोक धाव घेतील तिकडे. स्वतःचे पैसे नाश करतील किंवा ऑफिसला कामाला सुट्ट्या मारतील.स्त्रिया घरचे काम थांबवतील, पण बघायला जाणारच. पण या दोन दिवसात हॉस्पिटल कमी आणि म्युझियम जास्त झालं होतं.एक छोटीशी गोष्ट महाभारत घडू शकते याचे उदाहरण होतो मी.

माहिती सांगायला एक गंमत वाटेल.पण मी हॉस्पिटलला असताना एक हवालदार दरवाज्यात पहारेकरी ठेवला होता.काय नाव त्याचं सखाराम.खरंतर इतक्यात जायची गरज मला किंवा माझ्या घरच्यांना कधीच वाटली नाही.पण अलीकडे राठोड नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेली ही निर्देशिका होती. त्याच्या समोर अख्या अख्ख्या ची घामाने अंघोळ व्हायची. दारू विकणार्‍यांची तर तो हवा कैद करून टाकायचा.

ज्यावेळेस नमन ची केस पोलीस स्टेशन मधून उचलण्यात आली होती.त्यावेळेस त्या पोलीस स्टेशनचा सीनियर इन्स्पेक्टर हाच होता.आणि खरं सांगायचं म्हणजे, नमनचा खुलासा त्यानेच केला होता. मी सांगून बघितलं होतं त्याला, आमच्या मृत्यूयोगाबद्दल, पण त्याला डोळ्याला दिसत नसलेल्या आभासावर काहीच विश्वास नव्हता.

कुणीतरी प्लॅन करून आमची मर्डर करतोय, अशी त्यांची सुनावणी होती.आणि मला ही गोष्ट पुढ्यात वाढवायची नव्हती. त्यामुळे मी हो ला हो केलं होतं.आणि चालू लागलो होतो. पोलीस स्टेशन मधून.त्याच्यासाठी मर्डर करणारा आतातरी भेटावा म्हणून त्याने फार प्रमाणात आटापिटा केला होता.

सगळ्यात आधी त्याने माझ्याविषयी कुतुहूल वाटणाऱ्या कित्येकांचा, दारावर हवालदार ठेवून बंदोबस्त केला होता. आईची किंवा रितूची मुलाखत घेणाऱ्या कित्येकांना कठोर सुनावणी दिली. आणि दैवयोग, मृत्यू मागे लागणे अशा प्रकारची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही.अशी त्यांनी सोशल मीडियावर अस्खलित भाषणावली दिली.माझ्यामुळे थोडक्यात प्रदूषित झालेले वातावरण साफ केले. इतकच नव्हे तर पर्सनल रूम मध्ये मी असतानादेखील, माझी रवानगी सीसीटीव्ही असलेल्या निगराणीत असलेल्या खोलीत ठेवली.जिथून एखादा फुलपाखरू सुद्धा यायला त्यांची परवानगी मागावी लागेल.

रोज वेळोवेळी बदलणारे डॉक्टर पाहून रितू स्वतः एका मृत्यू देहात साकार होत होती.कारण दिवसागणिक होणारा बदल सातत्याने तिच्या मनात मृत्यूचा न्यूनगंड भरत होता.ज्यामुळे तिला तिच्या जीवनापेक्षा माझ्या मृत्यूची फार जास्त चिंता वाटत होती.आता तिचं शेवटचं एकच मागणं उरलं होतं.कि जाताना मी एकटा न जाता तिलाही सोबत घेऊन जावं.जिवंतपणी साथ मिळाली नाही, कदाचित दोघांच्या मृत्यूनंतर तरी साथ मिळणार.

सगळ्यांच्या बाबतीत ठीक होतं, फक्त मीच एक झोपलेला होतो. काका आणि काकूंनी आईला थोडं सांत्वन दिलं. आणि रितुला काळजी घे असं म्हणत निघून गेले.नेहमी सारखी आई माझ्याकडे एक मायाळू कटाक्ष टाकत निघून गेली.खरंतर तिला जायचं नव्हतंच.पण रितूचा डबा वगैरे तीच आणून द्यायची.त्यामुळे जावं लागायचं.आणि कदाचित हॉस्पिटलचं वातावरण वगैरे सुद्धा तिला भावत नव्हते.सतत तिला आजारी असल्याचा भास व्हायचा.पोटचं पोर म्हणून ती जीवाची दैना करत यायची.रितू हे सगळं समजून घ्यायची, त्यामुळे शक्यतो आईला पाहिजे तेवढा त्रास नाही द्यायची.

आई गेल्यानंतर मी आणि रितू दोघेच तेवढे रूममध्ये उरले होतो.आणि वर कॅमेरा आमच्यावर पाळत ठेवून उभा ठाकला होता.तिच्या मनाची करुणा आणि भावना माझ्याशी नेहमी रुंजी घालत होती.त्यामुळे शेवटपर्यंत तरी तिच्या श्वासाला मीच सक्षम आहे असे तिला वाटायचे.नेहमी सारखं माझ्या बेडला खुर्ची लावून, माझा हात स्वतःच्या हातात घेतला. आणि डोकं टेकवून ती माझ्याशी ओल्या नजरेने हितगूज करू लागली.

मनातून... उठ....ना...रे... एकदा मला रितू नावाने तरी हाक मारणारे..... एकदा मला हाक मारणारे.... सारखे मंत्र जपत होती, न जाने कितीवेळ....आणि त्याच सहवासात झोपून गेली.

रात्री कसल्यातरी धकक्याने ती पडता पडता सावरली, हे जाग आल्यावर तिला कळलं. माझं शरीर हवेत बेडवरून चार-पाच फुटावर गेलं होतं.आणि चट चट चाबकाचे फटके पडू लागले होते.परत एकदा तिची घाबरगुंडी उडाली होती. आणि धावत घाबरतच स्टॉपची तिने दारे ठोठावली.रात्री बाराच्या दरम्यानची वेळ होती.सगळे निपचित निद्रेच्या आहारी नुकतेच गेले होते.पण परत रितूचा हल्ला आहे, पेशंट विषयी, हे ओळखून सगळ्यांनी मग धाव घेतली.एव्हाना सगळे पोहोचले होते.तरी माझा देह हवेवर तरंगून होता.मला पाहून डॉक्टर पण शॉक झाले होते.आणि चाबकाचा वार त्यांच्या कानाशी गुंजत होता.

ताबडतोब हिम्मत करून काही वार्डबायने मला खाली आणले. परत ऑक्सिजन आणि सलाईनवर लावले. सगळ्यांना माझ्याविषयी एक प्रकारचं कुतुहूल आता पुन्हा एकदा जागृत झाला होता.त्यांना भीती वाटू लागली होती. माझ्याबद्दल काय घडत आहे?कसे घडत आहे?शेवटी काय प्रकरणआहे? सगळ्याना चिंता वाटू लागली.मला लवकरात लवकर रेफर करावं असं सर्वांचं मत झालं.

झालेल्या खळबळीमुळे कित्येकांची झोप मोड झाली होती.सीसीटीव्ही मध्ये सगळं काही रेकॉर्ड झालं होतं. राठोडचा फोन केव्हाच खणानला होता. त्यामुळे त्याची गाडी आवाज करत हॉस्पिटलच्या आवारात नुकतीच पोहोचली होती. बुटांच्या टप टप आवाजाने त्याने शिड्या चढल्या आणि माझ्या रूम मध्ये आला.

मला बघताच त्याला फार वाईट वाटून गेले.रक्ताने माखलेले शर्ट रितुने काढताना अंगावर असलेले जखम दिसून आले होते.परत एकदा रक्ताने माखलेले शरीर डॉक्टरने कापसाने साफ केले.पण राठोडची शोधक नजर माझ्या जखमांवर नव्हती. माझ्याकडे एक उपकारात्मक नजर टाकून तो पडदे उचलून बघू लागला.खिडक्या उघडून बघू लागला. चाबुक कुठे तरी मिळते का? याची शोधाशोध करू लागला.येताना जाताना कुणी कुणाला बघितले काय? त्याने चौकशी चालू केली होती.पण प्रत्यक्षात काय घडलं होतं. हे माहीतच कुणाला होतं.शेवटी त्याची शोधक नजर कॅमेऱ्यावर गेली, आणि तर्कवितर्क करून तो टप टप करत निघून गेला ऑपरेटर रूम कडे.

ऑपरेटर रूम मध्ये आल्यावर जरा कडक आवाजामध्ये... शिंदे काय चालू आहे?आता जे झालं ते कॅमेरात नोंद झालं आहे का?

सर मी तर बघितलंय, पण माझी हिम्मत होत नाही आहे. सर हे तुम्हीच बघा. शिंदेने राठोडला कॅमेरा फुटेज ओपन करून दिला, आणि तो बाजूला उभा राहिला.

इतका भिता तर मग कशाला पोलिसात भरती होता.घरीच बसायचं ना.. असे गरजत मग राठोड फुटेज बघायला लागले.आणि जे काही त्यांनी बघितलं, खरंतर ते पाहिल्यानंतर स्वतःच घामाघुम झाले.बघून झाल्यावर मागच्या खिशातून रुमाल काढली आणि शिंदेना पाणी आणायला आदेश दिला.

खरं काय असतं, शेवटी डोळ्यांना दिसतं तेच ना.माझ्यासमोर राठोडने हेच वाक्य म्हटले होते.पण आज डोळ्यांनी बघितलं ते काय होतं?काय विचार घ्यावा? आणि काय करावं? राठोडना हा गुंता फार प्रमाणात पडला होता. रात्रभर ती फुटेज ते वरचेवर बघत होते. पण त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, की खरंच असं होऊ शकते.

आणि जर काही खरं असेल तर चुकलं माझं.आपण ऐकायला होतो पवनचं. जर त्यावेळेस मी त्याची मदत केली असती, तर आज पवन वर ही पाळी नसती आली. कीती चुकलं माझं, नियमांच्या बाहेर पडू नये म्हणून आज माणुसकीच्या कर्तुत्वाला मुकलो मी.पण नाही... हा जो कोणी आहे याचा शोध आता लावलाच पाहिजे. पण कोण असेल हा ?ज्याला इतकं अक्राविक्राळ रूप आहे, त्याच्या नुसत्या प्रतिमेने वार होतात. आज राठोड विवंचनात बुडून गेले होते. त्यांचं काय चुकलं आता ते ठरवत होते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED