perjagadh - 8 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - ८

८)नमनची भेट....साधु महाराजांशी बोलून झाल्यावर, माझ्या मनाची पूर्तता झाली होती.नकळत त्यांनी मला खूप काही सांगितले होते.अस्तित्वाचा पुरावा हा मला त्यांनी डोळ्यादेखत दिला होता. ज्यामुळे सत्य आणि सत्व यामध्ये काय अंतर आहे हे मी जाणू शकलो.गावाकडे परतल्यावर माझ्यावर थोडाफार झालेला बदल सगळ्यांनी अचूक हेरला होता.पण नेमकं काय झालं?अशी विचारणारी फक्त रितू होती.

त्यादिवशी कुठेतरी जायला निघालो होतो, की दरवाज्यात तिचे पाऊल पडले.

काय मालक कुठे चालले? तिचा पहिलाच प्रश्न.

अगं कुठे नाही.... मला नमनचा शोध घ्यायचा आहे ना... त्याच्यासाठी सोशल मीडियावर काहीतरी प्रयत्न करतो.

अच्छा..... प्रवास कसा झाला? काही मनासारखे घडले ना!!! की काही अजून विपरीतच होणार.भेटला काय तो माणूस? ज्याने तुला ती थैली दिली होती.

नाही तो तर भेटला नाही, पण त्यापेक्षाही असा व्यक्ती मिळाला. ज्याने मला त्यापासून एक समाधान दिलं. चिंतामुक्त केलं...त्यांनी मला अगदी कसलाही त्रास न देता सांगितलं. मला आता काय करायचं म्हणून? मग मी तिला अतपासून इतीपर्यंत सगळं कथन केलं.

आधी ती घाबरली, मग रडायला लागली.केव्हा संपणार रे हे सगळं... तुझ्या सोबत जगण्याचे एक स्वप्न बघत आहे मी.केव्हा ते पूर्ण होणार.तू नसतोस ना तर श्वास कोंडल्यासारखा होतो माझा. पण कळत नाही मला नेमकं काय करावं? तू नेहमी असा डोळ्यासमोर राहावं असं मला वाटतं.

शेवटी मी पण म्हणालो... असेन ना ग.. शेवट नसेल तर मी तुझाच असेन, या एकाच वाक्यात तिने मिठी सैल पाडली.आणि मी तिला काहीच न म्हणता उंबरठा ओलांडला.ती मात्र माझी सावली सुद्धा पुसटशी होत पर्यंत माझ्याकडे बघत राहिली. खरं तर मला तिचं मन दुखवायचं नव्हतं.पण घडलेल्या गोष्टीशी समरस होऊन मी तिच्याशी काढलेली सलगी असं म्हणू शकतो.आणि खरंतर मला येऊन तीन दिवस झाली होती, पण मी तिला शब्दाचाही निरोप दिला नव्हता. उलट खोटे बोललो होतो. नमन बद्दल सोशल मीडियावर काही तरी पोस्ट टाकायची आहे म्हणून.

नमन बद्दल फार आधीच चौकशी पत्र चालू केलं होतं.त्याच्या नंबरचं लोकेशन घेऊन त्याच्या घरून मिळालेला नाव, पत्ता आणि त्याच्या मैत्रिणीच्या भेटायच्या वेळा हे सगळं मी केव्हाच केलं होतं.पण आज कुणीतरी मला फोन केला होता की एक वेड्या सारखा मुलगा रोज या मठात येताना दिसतो.मठात काय तो बाबा असतो म्हणे, थोडाफार यंत्र तंत्रांच्या गोष्टी करतो त्यामुळे जातात त्याच्याकडे काही भित्री माणसं.आणि त्यात आमच्यात असलेला नमन, आम्हा सगळ्यापेक्षा भित्रा होता, हे सगळे जाणून होतो.त्यामुळे तो कुठे जाणार हे सुद्धा माहिती होतं.

नमन अतिशय कोवळ्या मनाचा होता.आणि एकदम कोऱ्या मनाचा.ग्रामीण भागात चण्याच्या झाडावर चढवणे म्हणतात त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीबद्दल त्याला वरचढ करून सांगावे तर हा माणूस ते करणारच. आणि भित्रा तर इतका की हॉरर बघितल्यावर रात्री झोपायला सुद्धा, सतत त्याच्या मागावर असायला पाहिजे असतं. पण हा इतका भित्रा सगळ्यांच्या नकळत एकटं कसं काय राहायला शिकलाय?हा एक प्रश्नचिन्ह होता.आणि वर असल्या भोंदू बाबावर त्याचा केव्हापासून विश्वास बसायला लागला.या सगळ्याची उत्तर फक्त तोच देऊ शकत होता.

आज ज्याने मला फोन करून नमन बद्दल सांगितले होते. तो माझा क्लासमेट आदित्य होता. तो मठासमोर इलेक्ट्रिक दुकान चालवतो, आणि त्या दिवशी त्याची आणि माझी भेट झाली होती.नमनचा शोध करतोय हे त्याला माहिती झालं आणि त्याने तसा मला फोन लावला.

मी त्याला सगळ्यात आधी पूर्वसूचना दिली होती.तसा त्याने नमन आता एवढ्यात येणार या टाईमला त्याने मला बोलावले.सहज गप्पा गोष्टी आमच्या चालू असतानाच अचानक आदित्य खेकसला. मी तेव्हाच ओळखून घेतलं,आणि मागे वळून बघितलं ,तर घाईघाईत नमन जाताना दिसला. चालताना त्याने इकडे तिकडे बघावे असे कदाचित त्याला वाटले नसावे. शेवटी जाताना मागे आपला कोणी पाठलाग तर करत नाही ना, अशी त्यांनी नोंद केली. आणि तो मठाच्या प्रवेशद्वारातून आत गेला.

शेवटी मठातला बाबा सांगतोय तरी काय?मलाही त्याची उत्सुकता लागलेली होती.आणि नेमकं गेल्यावर त्याचं समाधान तरी कशाप्रकारे होतं. हे सुद्धा मला ऐकायचं होतं.म्हणुन नमन मागोमाग मी सुद्धा गेलो.

प्रवेशद्वारापासून मोठ्या दालना पर्यंत स्वागताला रंगीत गालिचा पसरलेला होता. जिथे तिथे त्या बाबाचे काही मान्यवरांना आशीर्वाद देतानाचे पोस्टर अडकवले होते.मला त्यात इंटरेस्ट नव्हता, म्हणून मग मी परत नजर अव्हेरली आणि पावले उचलत दालनात आलो.

दालनात हजारो लोक बसतील अशी सोय होती.जागोजागी गाद्या अंथरल्या होत्या.एका बाजूला पुरुष आणि एका बाजूला स्त्रिया यांची भली मोठी रांग मला दिसली.कुणाच्या अंगात शिरलं,होतं कुणाला कुणीतरी लावलं होतं,कुणाचीतरी स्मृती गेली होती, असे अनेक आजार आणि उपाय फक्त एकच "योगी बाबा".नुकतच कुणीतरी "योगी बाबा की जय" म्हणून उच्चारलं म्हणून त्यांचं नाव तरी माहीत झालं. इतरांसारखं मीसुद्धा पुरुष जातीच्या रांगेत जाऊन बसलो.

समोर दुसऱ्या तिसऱ्या नंबर वर नमन होता.अचानक एक गृहस्थ आला आमच्याकडे आणि म्हणाला ज्यांना कोणाला लवकरात लवकर योगी बाबांचे मार्गदर्शन हवे त्यांनी माझ्याबरोबर या.पण त्यांचे वेगळे पैसे होतील.नमनने त्याला हाक मारली. पैशांची पुंड करून त्याच्या हातात दिली आणि त्याच्या मागोमाग जाऊ लागला,तो नजरे आड होऊ नये म्हणून मी पण त्याच्या मागोमाग जाऊ लागलो.

त्या गृहस्थाने त्याच बाजूला थांबण्यास सांगितले, आणि तो त्याच्या बाबाकडे चालू लागला.मी हलकेच नमनला हाक मारली, त्याने माझ्याकडे वळून बघितले, आणि त्याच्या चेहर्‍यावर परत निराशेचे भाव पसरले.असं वाटत होतं, मला बघून तो आनंदित नाही, तर माझ्यामुळे त्याला त्रास होतो आहे.मी त्याच्या जवळ गेलो. पण काहीशा अंतरावर जातो तर तो निघून जाण्यासाठी बघत होता.

थांब नमन..... त्याला हाक मारली मी...

त्याच्या जवळ आलो. बघितलं तर तो मान खाली घालून उभा होता.माझ्याशी बोलण्याची त्याला आता भीती वाटत होती.इतक्या दिवसानंतर तो मला भेटतो आहे पण कसा आहेस? ईकडे कुठे आलास?असे साधे प्रश्न सुद्धा त्याने मला विचारले नव्हते.एरवी असं कधी झालंच नव्हतं.तो बोलणार हे अपेक्षित होतं, पण मग मीच सुरुवात केली.

नमन माझ्यापासून पळ काढून जर तुला मुक्ती मिळत असेल, तर निष्कारण काढ.पण ज्याअर्थी हे सगळं तुला चांगल्याप्रकारे माहिती आहे. तू असं वागु तरी कसं शकतोस.ना मृत्यू तुझं चुकणार आहे, ना माझं. आणि मग इतकी लपाछपी... या असल्या भोंदू बाबाकडे येऊन काही होणार नाही.त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. आपल्यालाच काहीतरी मार्ग शोधावे लागेल.

एव्हाना हे सगळे ऐकुन केव्हाच नमनचं हृदय पिळवटलं आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्याच्या पाण्याने माझ्या खांद्यावर ओलसर असा स्पर्श जाणवला.सर्व करून पहावे पवन, आयुष्यात काहीच अपुरं राहु नये.चल मित्रा तुझी इच्छा आहे, तर मग येऊया बघून.बाबा जवळ गेलेला गृहस्थ आम्हाला हातवारे करून बोलवत होता.समोर फार मोठा असा स्टेज होता.ज्यात एका बाजूला हवंन पेटत होतं.एका बाजूला विचित्र अशा काळ्या रंगाच्या बावल्या होत्या. त्यावर निंबू ,कुंकू ,टाचणी अशी काही विचित्र वस्तू होती.आसनावर पद्मासन ग्रहण केलेला तो विचित्र बाबा कूंकुवाची आडवी रेघ त्याने आपल्या कपाळाला माखलेली होती.तोंडानी सतत कसल्यातरी मंत्रांचा उच्चारण करत,कमरेतून डोलत होता. दोन स्त्रिया त्याच्या सेवेशी होत्या.डोक्यावर बांधलेल्या फडक्यावर त्याने उजवा हात मांडला आणि नमनला असे पुढ्यात बसवले.मी बाजुलाच बसून तो काय विचारतो? किंवा काय करतो ?बघत होतो.

काल सांगितलेली पूर्ण विधी केली काय?

हो महाराज केली.

तुझ्या अंगावरून सात वेळा तो नींबू घेऊन, त्याचा उतारा काढायचा होता. आणि गुपचूप कुणाला न सांगता निर्जन जागेवर फेकायचा होता.

होय महाराज मी अगदी तसेच केलं.

मूर्ख मला शिकवतोय...तुझं मंगळ अजुन गेलं नाही आहे, त्याची परिमा दिवसेंदिवस वाढतच आहे. नक्कीच तू काहीतरी चुकी केली आहेस.

मी काही चुकी केली नाही महाराज, तुम्ही जसं सांगितलं मी तसंच केलं...

मूर्ख मला शिकवू नको,तुझा मंगळ जागेवर नाही,दिवसेंदिवस तो लुप्त होत चाललाय... तुला आता परत नवीन पूजा करावी लागणार आहे. त्याशिवाय तुला आनंदी जीवन कधीच मिळणार नाही. आणि लवकरात लवकर ती पूजा उरकून घे... मग आनंद आहे.

होय महाराज.

त्या पेटीत पूजेला लागणाऱ्या सामग्रीचे पैसे जमा कर. आणि ही विभुती घे. रोज सकाळ दुपार संध्याकाळ सेवन करत जा....निघ आता...

मठाच्या बाहेर आल्यावर मला नमनचा फार राग आला होता.

काय चाललंय नमन... या असल्या फालतू लोकांमुळेच ना, आपण स्वतःचे सामर्थ्य घालून देतो.पण आता तू तरी याला बळी नको पडू.

मग काय करू?माहित आहे आपले तीन जिवाभावाचे मित्र आपल्याला सोडून गेलेत. आणि आता आपण दोघेच उरलो आहोत. मला असं नाही मरायचं. मला जगायचं आहे.आयुष्यात अजून खूप काही बघायचं बाकी आहे.आणि यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे.बाबाचं काय? मी आता अमेरिकेला सुद्धा जायला तयार आहे. जर मला समाधान मिळत असेल तर.

मग काय तुला इथे समाधान मिळालं.
( तो इकडे तिकडे बघत मान खाली टाकली त्यांनी)

अरे जगायचं कुणाला नाही आहे.काय त्या तिघांना जगायचं नव्हतं? काय मला जगायचं नाही?म्हणून काय अशा भोंदू बाबांचे पोट भरायचे.त्यांच्यावर असा पैसा उधळायचा.अरे ज्याला स्वतःचे भविष्य माहीत नाही, तो काय तुला सुख मिळवून देणार.

म्हणजे म्हणायचं काय तुला?

बघ.... जे आपल्या नशिबात आहे ना, ते घडणारच आहे. त्यात कुणीच बदल करू शकत नाही.या सगळ्यात एक फार मोठा रहस्य दडलंय, ज्याची तुला यत्किंचितही माहिती नाही.आपण ती गोष्ट घालवली, त्यामुळे आपण आपले मित्र गमावून बसलो.पण आता मला कुणालाच गमवायचं नाही. गेल्या काही दिवसात मी काय काय बघितलं, काय काय विचार केलं, हे तुला काहीच माहिती नाही.आणि मी परत एकदा नमनला भुजंगाची भेट आणि साधू महाराजांचं महत्त्व त्याला सांगितलं.

इतकं सगळं पाठिशी लागलाय तरी तुला त्याची काही चिंता नाही.इतका साधा कसा राहू शकतोस यार.

परिस्थिती याची सवय करून देते. जसं की तू करून घेतलीस.कधीही घाबरणारा, आज असतो ना एकटाच. कुणाच्या आधारात नाही , कुणाच्या वास्तव्यात नाही,स्वतःला बदलतांना कधी बघितलंस स्वतःला.

मी भरकटलो होतो रे जीवनाला.सद्या मरण पावला तेव्हा ते एक मरणयोग असेल म्हणून मी गप्प राहिलो.खरं सांगायचं म्हणजे त्यावेळी तरी तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नव्हताच मुळी. पण अमर तर माझ्या सगळ्यात जवळचा यार होता.त्यादिवशी सद्याच्या मरणानंतर मी मग पुण्याला स्थायिक झालो.पाच आठ महिने गावाकडे परतलोच नव्हतो.आणि कामाचा एवढं डिप्रेशन होतं की कुणाला फोनही करावेसे वाटत नव्हते.

तसं पण आम्ही सगळे तुला वेड्यातच काढले होतो.त्यामुळे अमर ने आणि प्रदीप ने तुला डिस्टर्ब न करण्याचा विचार केला होता.त्यामुळे आम्ही फारसे तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो.पण त्यादिवशी रात्री अचानक साडेबारा एकच्या दरम्यान अमरचा फोन आला. वेदना आणि भय असलेला त्याचा आवाज मी कधीही विसरू शकणार नाही.या कानांनी ऐकलेले चाबकाचे वार मोबाईलच्या स्पीकरवर स्पष्टपणे ऐकायला येत होते.आणि पाठोपाठ अमरच्या वेदनेच्या भरलेल्या हाका किती वेळ माहीत नाही.मी फक्त फोनवर हॅलो हॅलो करत राहिलो होतो.त्याही दिवशी तुम्ही माझ्याशी गंमत केली असेल, या विचाराने मी नंबर चेंज करून टाकला होता.आणि इकडे अमरच्या मृत्यूची वार्ता तुमच्या सगळ्यांच्या कानावर आली.


याचा अर्थ तुला वाटलेल्या गमती मुळे, तु अमरच्या मरणाला आला नाहीस. पण मग प्रदीपच्या मरणाला का आला नाहीस?

त्यानंतर मी वर्षभर अजून मेहनत घेतली.मित्रांना काय तोंड दाखवणार म्हणून.शेवटी मेहनतीचं फळ मिळालं.माझं प्रोजेक्ट पास झालं.बॉसला तो प्रोजेक्ट खूप आवडला,बॉसने त्याला विकत घेण्याचे ठरवले.त्यासाठी त्या प्रोजेक्टचा डेमो द्यायचा होता.त्यावेळी सहज घाईघाईत मी ऑफिसला निघालो होतो.अचानक प्रदीप मला रस्त्याच्या कडेला ट्रॅफिक वर भेटला.मी घाईत असल्यामुळे फारसा बोलू शकलो नाही.म्हणून माझं नवीन नंबरचे कार्ड मी त्याला दिला. आणि आठवणीने सायंकाळी फोन कर म्हणून त्याला सांगितले.पण त्याने काही फोन केला नाही.आणि प्रोजेक्टच्या भानगडीत असताना मीसुद्धा त्याकडे पाहिले नाही. ज्या दिवशी ऑफिसमधून घरी आल्यावर मला फोन आला त्यादिवशी प्रोजेक्टच्या अप्रतिम यशानंतर बॉसने खास पार्टी ठेवली होती.त्या पार्टीत जरा जास्त प्रमाणात अल्कोहोलचे प्रमाण घेतल्यामुळे मला फार नशा चढली होती.पण जसं अमरचा चित्रविचित्र फोन आला होता.त्याचप्रमाणे प्रदीपचा फोन आला होता.शेवटची त्याची एकच हाक कानात गुंजत होती.नमन वाचव ....मला वाचव मला ... आणि ते चाबकाचे फटके स्पीकरवर स्पष्ट ऐकू येत होते.नशेमुळे त्याही वेळेस मला काहीच कळले नाही, आणि मी झोपून गेलो.

सकाळी जाग आल्यावर मी प्रदीपला रिटर्न फोन लावायचा खूप खूप प्रयत्न केला, पण फोन लागतच नव्हता. त्यानंतर एक-दोन महिन्यांनी मी आपल्या गावाकडे परतलो. घरी आल्यावर कळलं की अमरचा आणि प्रदीपचा मृत्यू झाला आहे.आणि दोन्ही वेळेस त्या विचित्र कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे हे माझ्या लक्षात आलं.

पण सगळ्यात वाईट मला तेव्हा वाटले की मी एक मित्र असून सुद्धा त्यांची कशाप्रकारे मदत करू शकलो नाही.माहित आहे पवन, शेवटची हाक त्यालाच मारली जाते ज्याच्याकडून काही अपेक्षा असते.आणि ते तर माझे जिवाभावाचे मित्र होते.मी गंमत समजून त्यांचे फोन कापत राहिलो आणि ते तिकडे श्वास सोडत राहिले.पण मी त्यांची काहीच मदत करू शकलो नाही.मी त्यांची काहीच मदत करु शकलो नाही.लाज वाटू लागली मला, त्यांनी मला मित्र मानल्याची.

त्या दिवसानंतर मी विचार केला.तू त्या दिवशी बोललेलं खरं आहे.मी अख्खा महिना घराच्या बाहेर निघालो नव्हतो.आणि त्या दिवशी निघालो तर विचार करूनच.मृत्यू तिघांना घेऊन गेलाय, उरले आपण दोघे फक्त. पण आता या दोघांपैकी पहिला कोण आहे? हे माहिती नाही.जर माझा मृत्यू पाहिला असेल तर आधीच मला त्याची पूर्वतयारी केलेली बरी.

घरून निघताना एकच विचार केला. कुणालाच याबाबतीत काही सांगायचं नाही.काही चूक नसताना आपण जी शिक्षा भोगतोय त्याचे दुःख आपल्या घरच्यांना कशाला,त्यामुळे त्या दिवसापासून येथे लपून असतो.जीवन जगण्याचा, जगविण्याचा प्रयत्न करत, सतत कुणा तांत्रिकाच्या शोधात तर कुणा मांत्रिकाच्या शोधात.जेणेकरून माझ्या जगण्याचे दिवस वाढतील या आशेवर.

मग इतक्या दिवसात काय मिळवलास?आणि हो तु अशा बाबांवर विश्वास ठेवायला लागलास,तू तर एक नंबरचा नास्तिक होतास. मग या नादात कसं काय पडलास?

अरे पवन... असे कित्येक प्रसंग आहेत.ज्यांना आपण योगायोग म्हणू शकत नाही.आणि जे योगायोग नसते ते दैवयोग असते.असं कुठेतरी वाचलेलं आहे मी. ज्या अर्थी तुझं नाव घेऊन त्या इसमाने तुला बोलावलं, नक्कीच त्याला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे होतं. त्याला अपेक्षित होतं पण दिला तर काय मृत्यू.

अरे हो पण सांगितले ना, त्याने आपल्या मृत्यूविषयी कल्पना दिली होती. तो महाराज एक शिष्य होता. खुद्द साधू महाराजांनीच मला तसं सांगितलं होतं. आणि समोर जाऊन तोच आपल्याला मदतही करेल, असं त्यांनी मला सांगितलं होतं.

मग तुला काय वाटतं? आता काय करायला हवं?कारण फार त्रासलो रे मी या अशा जीवनाला.मी असं बोलून सांगू शकत नाही.अशा पद्धतीने माझ्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे.तुला माहित आहे, माझी मैत्रीण रीना. जाताना तिच्या डोळ्यातले अश्रू बघणे अवघड झाले होते.

ज्या दिवसापासून मला हे सगळं माहिती झालं.त्या दिवसापासून मी सगळ्यांचा नादच सोडून दिलं होतं.कधी कुणाच्या नजरेस पडु नये. मी कुठे आहे त्याचा थांगपत्ताही लागू दिला नाही.पण आज तू शोधलंस.खरं तर माझा असल्या गोष्टींवर विश्वास बसत नाही रे. कारण जगासमोर आपण काही दाखवतो म्हटलं, तरी त्यांना प्रत्येक गोष्टीचं प्रुफ पाहिजे असतं.आणि इतक्यात अशा गोष्टी घडत आहे की त्याचं काही प्रुफ जमा होत नाही.विचार केला की याच्यावर मार्ग काय काढायचा, पण सुचतच नव्हते.घरी नुकताच एका वृत्तपत्रावर योगी बाबा का चमत्कार म्हणून एक पोस्ट पाहिली.त्यावर काही जणांचा अनुभव वाचून पाहिले,तेव्हा न राहवून मनात एक अपेक्षा जागृत झाली. की हो ना हो याच्याकडे काही उपाय असेल, तर करून बघायला काय हरकत आहे.

गेल्या महिनाभरात माझं पाचव्यांदा तरी इथे येणं झालं आहे.पण काय? प्रश्न तेच आहेत कायमचे. हे बघ असली करामती अंगुठी सुद्धा बोलावली.(हातातली अंगठी दाखवत.)पंडित लाइव्ह बोलता-बोलता माझा डोकं दुखून जाते.यात काय नको ते प्रयत्न केले. पण शेवटी निराशाच हाती लागली. मनातून कितीतरी वेळा वाटलं. तुझी भेट घ्यावी, पण घाबरत होतो.

अरे घाबरण्यासारखं काय? जशी तू तुझ्या परिस्थितीशी उचल खाल्ली. तसेच मी पण खाल्ली.फक्त तूच नाहीतर मी पण सोसले आहे.आज आपण दोघे मृत्यूच्या एकाच वाटेवर आहोत.आणि दोघांनाही आता आपला जीवन जगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. फक्त एकच गोष्ट मनाशी , तू कधी धीर नको सोडू.

नाही सोडणार मित्रा.... आता तुझ्यासोबत मी एका नव्या उमेदिने जगायचं ठरवले आहे.पण माझी एक अट आहे. जोपर्यंत मृत्यूप्रकरण समाप्त होत नाही.तोपर्यंत प्लीज मला कुणाच्या नजरेत आणू नकोस.माझे आई-वडील विचारतील, तरी मला काहीच माहिती नाही असं सांग.

पण असं कसं बोलतोस तू.ते आपले आई-वडील आहेत. त्यांना आपली काळजी नसेल तर कुणाची असेल.जर आपल्या आयुष्यात अगदी थोडे दिवस असतील, तर ते पूर्ण आपण त्यांच्या सहवासात घालावे.

मी सगळ्या गोष्टींना राजी होतो.पण आई-वडिलांच्या बाबतीत मी त्यांना रडताना नाही बघू शकत.त्यापेक्षा मी कुठेतरी आहे याचे समाधान त्यांना शेवटपर्यंत असू दे.आणि कधी वेळ मिळालाच तर रीनाला भेटून, माझ्याविषयी असं काही वेगळं बोल, की ती सुद्धा मला विसरून, कुणाशी तरी लग्न करायला मोकळी होईल.मला हे सगळे आत्तापासूनच करावे लागणार आहे.कारण माझं सगळ्यांच्या नकळत निघून जाणे चांगलं आहे. पण त्यांना असं रडवत ठेवणं चांगलं नाही.करशील ना मित्रा माझ्यासाठी एवढं.

तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे.पण मला वाटतं की तू चुकतोयस. तुझं हे असं वागणं, मला पटत नाही आहे.तू विचार कर यावर. कारण जे सुख इतरांसोबत वाटलं, आता त्याच दुःखाच्या प्रसंगी तो सगळ्यांपासून लपवावे.अरे कोणीतरी म्हटलंय की माणसे कांद्या सारखी भोवताल जमा करावी. खांदा कधीच कमी होता कामा नये आणि तू हे चक्क टाळतोयस.

तुला नाही कळणार पवन. पण ते दुःख मला कधीच सहन होणार नाही. भलेही मग मी ह्या जगात असेल किंवा नसेल, पण तुला मात्र माझ्या मैत्रीची शपथ आहे की तू ते करणार.

माझ्याकडे तसा पर्याय नव्हताच. म्हणून मी एक निराशाचा उसासा टाकला, आणि होकार दिला. पण नंतर माझी बोलायची काहीच हिम्मत नव्हती.आणि तोही इकडे तिकडे बघू लागला.शेवटी नाते कसे टिकवायचे या नमनने मला शिकवले.सुखाचे बोट धरून दुःखाचे डोंगर चढताना मी कित्येकदा बघितले.पण दुःखाचा डोंगर बाजूला घेतलं होतं त्याने, आणि सुखाची क्षण सुखातच ठेवली. त्याची भावना हृदयाला चिरून जाणारी होती. त्यामुळे मी त्याचे कौतुक करावे तितके मला कमी वाटत होते. कुठे राहतो मी येतो तुझ्याबरोबर.?मी हलकेच त्याला विचारले...

नाही पवन मृत्यूच्या मार्गावर आपण जरी का एकत्र असलो, तरी इथून माझी वाट मात्र वेगळी आहे.तुला जर कधी मला भेटावयाचे असेल, तर या नंबर वर कॉन्टॅक्ट करत जा. एक कार्ड हातात देत तो म्हणाला.

हल्ली मला तुझं काहीच कळत नाहीये नमन. नात्यांशी इतकं नास्तिकपणा बरं नाही.

प्लीज पवन.

ओके ओके जशी तुझी मर्जी.

आम्ही निघायला लागलो पाठमोरा. त्याला जाताना बघून न राहवून मला असं वाटत होतं. की तो मला सोडून चाललाय. त्याच्याबद्दल मला भीतीचं सावट उभारायला लागलं होतं.

अरेच्या... नमन एक मिनिट थांब.. मी जरा जोरानेच ओरडलो.अरे जे महत्त्वाचं होतं. ते तर मी विसरलोच बघ, बोलण्याच्या नादात.

होतं असं कधी कधी. पण काय विसरलास ते तर सांग आधी?

पंढरपूरला आपण जेव्हा गेलो होतो. त्या इसमाने मला बोलावलं आणि मृत्यूबद्दल मला सांगितलं.

हे मला माहित आहे. तू काय विसरलास ते सांग?

अरे जाताना त्याने एक थैली मला दिली होती.मी तुझ्या बॅगमध्ये टाकली होती ती.देशील का जरा... कारण ती एकमेव वाट आहे त्याच्या आधाराने आपण मृत्यूच्या वाटचालीतून बाहेर निघू शकतो.
हा ती थैली मी बघितली आहे. बॅग दोनदा वावरतांना माझ्या हातात आली होती ती.

उघडून पाहिलीस का तिला कधी?

नाही मी उघडून तर पाहिले नाही.पण मला वाटते ती आता पण बॅगमध्येच असणार. कारण घरून निघताना मी बॅगमध्ये ठेवण्याचं आठवत आहे.

तू ती थैली आणून देतोस का? वाटल्यास मी इथेच थांबून तुझी वाट बघतो.

बरं थांबून राह...मी लगेच येतो.

काही वेळाने तो ती थैली घेऊन आला.आणि मला काहीतरी काम आहे, असं म्हणत घाईघाईने निघून गेला. खरंतर माझी आणि नमनची भेट म्हणजे या थैलीसाठीच होती. कारण मला आणि त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी, एकमेव गोष्ट म्हणजे ती थैली. आज इतक्या परिश्रमानंतर माझ्या हातात होती.चेहर्‍यावर एक प्रसन्न हास्य उमटले होते.नक्कीच आशेचे किरण माझ्या हातात असल्याचा मला आभास येत होता.


तर मित्रांनो असं काय असतं या थैली मध्ये? जे मृत्युच्या तावडीतून पवनला बाहेर काढू शकत होतं? हॉस्पिटलमध्ये असलेला पवन काय सुधारू शकणार? मृत्यूच्या जाळ्यात अडकलेला पवन सुटणार काय? पेरजागढशी अजून पर्यंत कोणतेच नाते आले नाहीत ना!!! कळेल पुढे....वाचत रहा...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED