पेरजागढ- एक रहस्य.... - ५ कार्तिक हजारे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पेरजागढ- एक रहस्य.... - ५

५)मृत्यूचे रहस्य....


जेव्हा पेरजागडच्या ट्रीपवर मला नमन मिळाला नाही.त्याची शोधमोहीम मी चालूच ठेवली होती. कारण त्यानंतर या त्याचं किंवा माझं मृत्यू होणे हे अटळ होतं. कुणाला फोन लावावा? काय करावं? काहीच कळत नव्हते. जर कुणाला घरी वगैरे बोलवून त्याला सविस्तर काही सांगितलं तर तो मला खुळा समजेल असं मला वाटत होतं.

एखाद्या ढोंगी बाबा ने तुम्हाला काहीतरी सांगावं, आणि तुम्ही त्यावर विश्वास करावा. काय खेळ चाललाय काय? असे लोक म्हणायचे आम्हाला. खरंच ज्याचं जळतं त्यालाच कळतं. दिवसेंदिवस माझ्यातला उत्साह कमी होत जात होता. घरच्यांना माझ्याबाबत काळजी वाटू लागली होती.

रोजच्या दिनचर्येचा सूर्य जसा पश्चिमेला जात होता. तसतसं माझ्यातही मृत्यूचे भय उत्पन्न होऊन जाऊ लागलं होतं. पण मला त्याचं भय नव्हतं, सगळ्यात आधी चिंता दाटली होती ती नमनची.

त्यादिवशी इकडेतिकडे फिरल्यावर मी असाच ताणतणावाने बसून होतो. तेव्हा रितु अचानक आत आली.क्षणभर माझं तिच्याकडे लक्ष गेलं, पण मन अजूनच बेचैन झालं. ती वेडी माझ्यासाठी जीव जुगारते आहे, आणि मी मृत्यूला भितो आहे.एक वेळ अशी होती की जिच्या साठी जीव द्यायची सुद्धा तयारी होती माझी, आणि आज तिच्यापासून स्वतःला लपवत होतो.

पण जेव्हापासून मृत्यू आमच्या मागे लागला होता. तेव्हापासून माझ्या सगळ्या इच्छा नसल्यासारख्या झाल्या होत्या.केलेली नवीन वाटचालीची प्लॅनिंग सगळी विस्कटून गेली होती.एखाद्याच्या मागे दुर्दैव असे हात लावून मागे पडावे, आणि त्याचं नामशेष व्हावा अशी परिस्थिती माझी झाली होती.त्यामुळे कुठे जावे आणि काय करावे हाच प्रश्न सतत माझ्या डोक्यात चालत होता?

सगळ्या गरजा आता निरर्थक झाल्या होत्या. फक्त मृत्यूशी झुंज कशी द्यायची की त्यापासून कसं वाचायचं हाच माझा प्रयत्न चालू होता.एकेकरून जगण्याचा एक आटोकाट प्रयत्न चालू होता.रितू आली आणि अशी सामोरी येऊन बसली, तरी सुद्धा मला तिची जाणीव झाली नाही.कारण आता जाणीव मला फक्त मृत्यूची येत होती. शून्यात नजर गेली होती.वास्तविकतेचा तिळमात्रही माझ्या डोळ्यात दिसत नव्हता. जणु काही कपाळावर आठ्या आणून मी एक विनवणी करत आहे, अशातला भाग चालू होता.

गेले कितीतरी क्षण दोघांमधली ही निरव शांतता एक अस्तित्वाची जाण होती.पण मी त्या अस्तित्वात फक्त एक निर्जीव पुतळा होऊन बसलो होतो.त्यामुळे तिने मारलेल्या कितीतरी हाका अशा निष्फळ झाल्या होत्या.शेवटी मला गदागदा हलवलं तेव्हा कुठे भानावर आल्यासारखा मी तिच्याकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकला.

हां...बोल रितू, कसं येणं केलंस?

जिथे आयुष्य माझं अडकलं आहे,त्याला सोडून तरी जाणार कुठे. बरं ते जाऊ दे... नमनचा शोध लागला का?

जर नमन चा शोध लागला असता तर मी इथे कशाला असतो ग.

मग पुढे काय ठरवलं आहे.

ठरवलंय आता.. जिथून याची सुरुवात झाली आता तिथेच जाणार.आता मला पंढरपूरला जायला हवं. कारण त्या इसमाला शोधणं आता आवश्यक आहे. या सगळ्याची सुरुवात त्यानेच केली होती. आणि त्यांनाच माहिती आहे हे सगळं. कारण ज्या वेळेस ते आम्हाला सगळं काही सांगत होते, त्यावेळेस आमची ते ऐकण्याची तयारी नव्हती.पण त्या इसमाला सगळं माहिती आहे. मला परत एकदा जाऊन त्यांना भेटलेच पाहिजे.

अरे हा... त्या दिवशी तूच म्हणालास ना की जाताना त्याने तुला काहीतरी दिलं होतं म्हणून ...त्यात का नाही बघत. होऊ शकते त्या मृत्यू प्रकरणातून काही मुक्तीचा मार्ग असेल.

अरे हो.... माझ्या तर लक्षातच नाही आलं.ती थैली ..बरोबर आहे जाताना त्या इसमाने ती थैली विनवणी केल्यागत मला दिली होती. पण ती थैली (थोडा सखोल विचार करत)हा...ती थैली तर मी नमनच्या बॅग मध्ये टाकली होती.कारण जाताना आम्ही काही वस्तू घेतल्या होत्या. आणि गर्दीत त्रास होऊ नये म्हणून मी ठेव म्हटलं त्याच्याच बॅगमध्ये.पण घरी येताना मला त्याची आठवण राहिली नाही. आणि आता नमन पण कुठे आहे त्याचा पण काही पत्ता नाही.मी परत निराशेचे आव आणून दोन्ही हात डोक्यावर धरले आणि भिंतीजवळ नेऊन हलकसं आपटत म्हणालो.

हे बघ पवन ...निराश नको होऊ. हे बघ निराश होऊन यातून काही ही निष्पन्न होणार नाही आहे. तू जाऊन बघ, त्या इसमाला भेटून नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल.

घरी सगळ्यांना माहिती झालं होतं की मित्रांच्या अशा लागोपाठ मृत्यू झाल्यामुळे माझ्यावर नको तो न्यूनगंड आतुरलेला आहे. पण खरं कारण अजून पर्यंत मी कुणालाच सांगितलेलं नव्हतं. शिवाय रितूच्या सहज सांत्वनांचे शब्द घरी मिळायचे, पण समाधान अजून पर्यंत मिळालं नव्हतं.

थोडं फार सांत्वन होऊन रितू तिथून चालली गेली.तिला माहिती होतं माझं जेवण झालं नाही ते, म्हणून ती डबा घेऊन आली होती.आठवणीने जेवून घे हा.... अशी हमी देत ती निघून गेली.थोडेफार चाललेले संभाषण परत एकदा शांततेत परिवर्तित झाले.अचानक मनात परत एकदा प्रश्नांचे काहूर माजयला लागले.

काय असेल त्या थैलीत?जे आम्हाला वाचवू शकते. पण कसं काय असेल त्या थैलीत? चूक केली मी! मला ति थैली माझ्या बॅगमध्ये ठेवायला पाहिजे होती.किंवा एकदा तरी तिला उघडून पहायला पाहिजे होतं. ज्यामुळे मला माहिती तरी झालं असतं की त्यात असं काय महत्वाचं आहे?का त्या इसमाने मला विनवणीच्या स्वरूपात मला ती थैली दिली होती?काय असेल त्याचे रहस्य काय असेल त्याचे महत्त्व.?

नमनच्या शोधा अंती एक विसरून गेलो होतो.रहस्य कधीच असं दडलं नसते.त्याचं काहीतरी मार्ग कुठे नाही कुठे नक्कीच असते.पण आपल्याला कधीच त्याची जाणीव नसते.त्या मार्गाचा शोध करण्यासाठी मी भ्रमंती करायचं ठरवलं.ज्या रहस्याशी माझं मृत्यू जोडलं होतं. असे रहस्य सृष्टीत तुडुंब भरले आहेत.पण याची कुणाला कल्पना नाहीत. निदान जाताना आपण त्याचा खुलासा करावा असं वाटायला लागलं. त्यासाठी दुसऱ्या दिवशी मी पंढरपूरला रवाना झालो.तिथे कितीतरी वेळा मी त्या इसमाला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो कुठेच मला मिळाला नाही. कित्येकाना विचारायचं सुद्धा प्रयत्न केला पण कुणीही त्यांना बघितल्याचे सांगत नव्हते.

शेवटी निराशेच्या आठ्या पकडून मी एक बस पकडली, आणि परत गावाच्या दिशेने चालू लागलो. कारण मृत्यूचे सावट आता माझ्यावर विस्तारले होते आणि क्षणाक्षणाला मला त्याची चाहूल येत होती.खिडकीवजा येणाऱ्या झुळझुळ वाऱ्यामुळे मला केव्हा झोप आली काही कळलंच नाही?

पण जेव्हा जाग आली,अधांतरी बस कुठेतरी थांबलेली होती. सायंकाळचे सात वाजले असावे.आणि जंगलात ती बस हायवे रोडवर थांबली होती. आजूबाजूच्या शीट वरचे लोक केव्हाच कंटाळून निघाले होते. काहींना तर वेळे अभावी लिफ्ट मागून मागून कायापालट केला होता स्वतःचा.आणि आम्ही फक्त आठ ते दहा प्रवासी उरलो होतो. शेवटी कंडक्टर आणि चालक बस मध्ये आले आणि म्हणाले, झालेल्या असुविधा बद्दल खरंच आम्ही दिलगीर आहोत परंतु अथक प्रयत्न करूनही काही तांत्रिक अडचणीमुळे बस काही चालू होणार नाही. आमची दुसरी बस यायला पण बराच वेळ होईल. त्यापेक्षा तुम्ही काही वाहने पकडून समोर जाऊ शकता.अन्यथा इथे थांबून वाट पाहू शकता.

नशिबाने तर दांडी मारलीच होती, मग हे प्रसंग माझ्यासाठी काही फार मोठे नव्हते. इतरांसारखे मला त्यांच्यासोबत वाद घालण्यात पण काही इंटरेस्ट नव्हता.उरलेल्या तिकिटाचे पैसे परत घेत बॅग खांद्यावर टांगली आणि निघालो मी पायदळी चालायला.कुणीतरी मला हाका मारण्याचा प्रयत्न करत होते पण मी एकदाही मागे वळून बघितले नाही.

कुठे जायचं?कुठे थांबायचं?काहीच उत्तर नव्हतं.फक्त वाट दिसेल तिकडे चालत राहायचं.नव्हती त्या जंगलातल्या दाट दुट कारकिर्र दाट झुडपांची भीती.आणि नव्हती कुणा वाहनाने अंधारात अपघात होण्याची भीती.फक्त वाट होती, आणि मी होतो. आणि चालणारे पाय होते. कुणाला फोन करावे तर मोबाईल मधली चार्जिंग पण केव्हाच संपली होती.

असंच किती वेळ चालत राहिलो कुणास ठाऊक. पण रात्र आता बरीच झाली आहे याची प्रचिती तो जंगल मला देत होता.रात किड्यांचा किर्र किर्र आवाज कानात घुमत होता. मध्येच कुणा घुबडाचे चित्कारने ऐकायला येत होते. इतक्यात वाहनांची ये-जा पण कमी झाली होती. ज्यामुळे समोरचं फार प्रमाणात दिसेनासं झालं होतं.चालताना अलगद काट्यांची किंवा दगडांची ठोकर लागत होती.

रात्र किती झाली होती हे मला इतकं माहिती नव्हतं.पण बराच वेळ झाल्यामुळे पाय पण आता दुखायला लागले होते. भर रात्री सुद्धा चेहऱ्यावर ओथंबून घाम फुटलेला होता. थोडंसं थांबावं म्हणून रस्त्याच्या कडेला मी बसण्यासाठी जागा बघू लागलो.

थोडावेळ शांततेचं प्रतीक असं जंगलात खुलत होतं. शहरातल्या वरदळीपेक्षा जंगलातच राहणे म्हणजे किती एकांतवास आहे.मला तर नेहमीच जंगलात राहिलेलं आवडत असे.आणि आयुष्यात जंगलातच घर बांधून राहायचे होते.दूर एकांतात वर्दळ नसलेली ती नितळ शांतता बघून मला फार बरे वाटायला लागले होते.पण आयुष्याची दुःख लक्षात येताच चेहऱ्यावरचे हसू विलक्षण रूपात पालटले आणि परत चेहऱ्यावर गंभीर रूप आले. मृत्यूचे सावट सांगू लागले होते, आता आयुष्य नाही तुझ्याकडे...

मी जरा विसावून बसलोच होतो की, अचानक खण खण असा आवाज तीव्र गतीने येऊ लागला. मी इकडे तिकडे बघू लागलो. आकाशाकडे बघितलं तर, पूर्ण आकाश काळकुट्ट दिसत होतं.आज अमावस्येची रात्र आहे हि मला ओळखली. अमावस्येला तर भूतप्रेताचे राज्य असतं आणि निर्जन स्थळी जाऊन ते कसले कसले विद्रोह करतात हे फार आधीच मी गावाकडच्या लोकांकडून ऐकलं होतं.

आणि त्या दाट अंधारामुळे मला जंगलातलं काहीच दिसत नव्हतं. फक्त तो आवाज मात्र तीव्र गतीने स्पष्ट असा येत होता.एखाद्याने नाण्याची थैली बांधावी आणि ती जमिनीवर आपटावी,आणि त्यातुन जो नाण्यांचा आवाज उद्गार उद्भवतो तसा आवाज तो कानाशी गुंजत होता.पण आवाजाच्या दिशेने बघावं तर फक्त काळोख दिसत होता.मात्र असा आवाज हा माझ्यासाठी फार अपरिचित होता.ज्याची उस्तुकता मला न राहवून त्या आवाजाकडे जाण्याची इच्छा प्रकट करत होता. शिवाय जगण्यातला माझा सगळा इंटरेस्ट संपून गेला होता. त्यामुळे जर मृत्यूच आहे नशिबात, तर ते कुठेही येईल? त्यात हा आवाज कशाचा आहे हे बघणे बरे नव्हे का?

मी हायवेवरुन खाली उतरलो.झुडुपातून कुठे जायचे आहे काहीच कळत नव्हते.आणि जंगलात असलेल्या शांततेमुळे तो आवाज जवळपासचा नव्हताच हे केव्हाच गृहीत धरलं होतं.हाताने चाचपडत झावळ्यापासून वाकत मी जंगलाच्या आत प्रवेश केला.कितीतरी अंतर पार केल्यावर मला एक पायवाटे सारखा रस्ता मिळाला. ज्याच्या आधारे मी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो.आता तो आवाज स्पष्ट असा कानाशी येऊ लागला होता. कोणीतरी गाडीत भरलेलं नाण ओढून राहिलं त्याप्रमाणे मला आवाज येऊ लागला होता.आणि मी पुन्हा पुन्हा उत्सुकतेने त्यावरच्या दिशेने जाऊ लागलो.

इतक्यात मी आधाराने, ज्या झाडाला टेकून बसलो होतो.त्या झाडावर एक घुबड येऊन बसला.त्याचे ते भयानक चित्कार मला घाबरवत होते.पण मी त्याला अव्हेरून समोर समोर जातच होतो.ज्यामुळे मी कुठून आलोय?कुठे निघत आहे?काहीच कळत नव्हते. चारी बाजूला अंधाराने मेळ घातला होता. जंगल दाट होता आणि उत्सुकतेने त्यात घुसलेला एक मी.

आपण आता आवाजाच्या दिशेने जवळच आलो असं वाटत होतं.कारण समोरून कोणीतरी लाल रंगाचं कंदील घेऊन,त्याला बंद चालू करीत येत होतं. कंदिलाचा प्रकाशझोत, विद्युत बटण बंद चालू केल्यासारखी बंद चालू व्हायची. ज्यामुळे लालसर अंधुकसा प्रकाश आजूबाजूला पसरायचा.पण आवाजावरून असं वाटत होतं की तो बंद चालू असणारा कंदील कोणीतरी तोंडात धरून सरपटत येत होता.आणि मागे नाणी भरलेली गाडी ती खण खण आवाज करीत होती.

ते सगळं माझ्यापासून फक्त काही अंतरावर होतं, मी दिसू नये म्हणून एका डेरेदार वृक्षाच्या मागून ते बघत होतो. पण मघाचा तो घुबड त्या झाडावर आला, आणि नको ते भयानक चित्कार करू लागला. त्यामुळे मी तिथून बाजूला असलेल्या, दाट झाडीत जाण्याचा प्रयत्न करीत होतो. आणि तितक्यात कंदील धरून सरपटणारे ते जे काही होतं, अगदी माझ्या सामोरे आलं होतं.

अचानक पायाखाली एक कुजलेली काटकी आली. ज्यामुळे कट्ट...असा आवाज माझ्यासमोर असलेल्या त्या विचित्र प्राण्याला ऐकू गेला.तत्क्षणी डोळ्यात लाल निखारे पेटत असलेला एक साप फुस्स करून माझ्यासमोर उभा झाला. त्या उजेडात मी जे काही बघितलं, खरंतर ते आवाक्याच्या बाहेर होतं.जगात असलेला किंग कोब्रा त्याच्यासमोर किती तरी छोटा असेल, तेव्हा हे माझ्या लक्षात आलं.

त्याचं ते फुत्करणे अगदी कानात गुंजत होतं माझ्या.अजगरापेक्षा विचित्र त्याचे रूप आणि त्याने जो फणा उगारला होता, तोच फणाच माझ्या दुप्पट होता.आणि त्याचं ते फुस्स करून माझ्या पुढ्यात उभं राहणं हृदयात एक धस्स करून गेलं होतं. आणि केव्हा मी बेशुद्ध पडलो मला काही समजलंच नाही.

माझ्या बघण्यातली ती एक विचित्र बाब होती. जी कल्पना नव्हती. उघड्या डोळ्याने बघितलेले एक प्रात्यक्षिक होतं.त्याची पूर्ती माझ्या जीवनात काय स्थान देते हे मलाही माहीत नव्हते.पण माझ्या रस्त्यांची सुरुवात इथूनच झाली होती, आणि वास्तविक हा नाग म्हणजे माझी पहिली पायरी होती.

अस्तित्वाचे खरे रूप काय? तर हे त्याच्या दिसण्यावर असते.तसेच सत्वासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला दिसत नाही.त्याचे कारण तर अनेक आहे.पण न दिसणाऱ्या अस्तित्वावर विश्वास तरी कोण ठेवणार?हा प्रश्न उद्भवत असतो. आणि त्यामुळेच जर-तर चा संदर्भ होऊन वाद-विवाद चालतात.