पेरजागढ- एक रहस्य.... - १० कार्तिक हजारे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पेरजागढ- एक रहस्य.... - १०

१०) पवनची आणि इन्स्पेक्टर राठोडची गाठ...



मला या गोष्टीची पूर्वकल्पना आलीच नाही.ऑटोतून उतरल्यावर मी सगळ्यात आधी घरी आलो आणि ति थैली व्यवस्थित कपाटात ठेवून आधी आंघोळीला गेलो.मठात विभूतीचा कसला ना कसला अंगारा अंगास येऊन चिकटलेला होता.ज्यामुळे मला कसंतरी वाटायला लागले होते. माझी रूम म्हणजे स्पेशल अशी बाजूला होती.मला विचारल्याशिवाय घरचे सुद्धा त्यात प्रवेश करत नव्हते. आणि माझं अस्तित्व म्हणजे ती माझी खोली असायची.माझं अभ्यास करण्यापासून माझं मनन, चिंतन, शोकसभा त्या रूममध्ये व्हायची.त्यामुळे एकाच घरात दोन तुकडे या प्रमाणे माझं होतं. शिवाय मला बहीण अशी नव्हती ज्यामुळे कोणी मला भावनांची देवाणघेवाण केलं असतं. आई वडील होते पण ते सुद्धा स्वतःच्या कामात असत.

वडील कॉलेजात प्राध्यापक होते. त्यामुळे ते गेले की संध्याकाळीच परत यायचे. आणि आई असायची ती सतत शेजारच्या काकूंकडे गप्पा मारत किंवा घरच्या टीव्हीवर सिरीयल बघत राहायची. त्यामुळे माझ्या बाबतीत निर्णय घ्यायचा हक्क तर दोघांनाही होता पण वेळ मात्र कुणालाच नव्हती. एखादी गोष्ट लागली तर सादर करायचं आणि निर्णय घ्यायचा. ज्यामुळे मला कधी घरच्यांना काही सांगावसं वाटलंच नाही. आणि इतक्यात मी फारसा काही बोलत पण नव्हतो. पण त्यांनी तेवढ्यापुरती मला विचारलं होतं आणि तेवढ्यापुरतेच मी पण त्यांना सांगितलं होतं. म्हणून घरच्यांशी आता काही बोलण्याचा प्रश्नही नव्हता.

आंघोळ करून आल्यावर मी सगळ्यात आधी ती थैली कपाटातून बाहेर काढली आणि तिला खोलण्याचा प्रयत्न करू लागलो. बाजूच्या इवल्याशा दोऱ्या उघडल्या आणि आत मधल्या एकेक वस्तू बाहेर काढू लागलो.आत मध्ये ताम्रपत्राचे काही अवशेष पडलेले होते, आणि एक पुस्तक होते.ज्यात मृत्यू बद्दल बरेच काही लिहिलं होतं. अजून काही बरेच होते जे मला समजण्यासारखे नव्हते.पण मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. रात्रभर मी ते वाचून संपवलं.आणि ते वाचलं तेव्हा मला कळलं की मृत्यु आमच्या मागे लागण्याचा कारण काय होतं. कारण त्या ताम्रपत्रावर खूप आधीपासूनची रचना केली होती.ती कुठेतरी हरवली होती ते सगळं बघून मी इतका भांबावून गेलो होतो की माझं मलाच कळत नव्हतं.

ते वाचताना मला कित्येकदा मृत्यू माझ्या दारात उभा आहे याची चाहूल लागून गेली होती. नेहमी मृत्यूचे कारण आजतागायत मी पाप-पुण्याच्या वर्गीकरणात बघितलं.पण इथे जे बघितलं ते खरंच विलक्षण होतं. खरं काय असतं हे उघड्या डोळ्याने आज पुस्तकात वाचलं पण होतं आणि वास्तवात बघत पण होतो.

जग सामोर चाललंय ,विज्ञान प्रगती करतोय हे संशोधन फार प्रमाणात पुढे गेलंय.पण जे आभास आहेत ,सहवास आहेत, जे निराकार आहे त्यांचं काय? ते आपण सोडून देऊ शकत नाही.पुरातन काळातील सत्व आजच्या युगात दिसणार नाही.कारण एका वाटेचे जेव्हा दोन तुकडे होतात तेव्हा त्या सारख्या असत नाहीत.सत्व ही साधारण गोष्ट नाही किंवा तिला मिळवणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही.शास्त्रज्ञांच्या मते सांगायला गेलं तर ती अशी एनर्जी आहे जी साधारण नाही. आणि जी गोष्ट अगम्य असते ती कधीच साधारणपणे मिळत नाही.

शेवटची पाने चाळत जाऊन केलेला विचार मनात घोळत होता.अक्खी रात्र केव्हा घोळून गेली याचा मात्र एकदाही विचार आला नाही. खिडकीचे दारे सताड उघडी असूनही बाहेर लक्ष गेले नाही. हरवून जाणे कशाला म्हणतात हे आज मला उमगलं होतं.

नेहमीसारखं दरवाजावर ठक् ठक आली.समजून गेलो की चहाचा टाईम झाला आहे, आणि सगळं काही आवरून मी चहा प्यायला आलो.नुकताच फ्रेश होऊन दाराबाहेर येणार तोच खिशात असलेला फोन खणाणला. बाहेर काढून बघितलं तर एक अपरिचित नंबरचा कॉल होता.कदाचित कोणी ओळखीचा असेल असं समजून मी तो रिसिव्ह केला.

हॅलो....

समोरील व्यक्ती= हॅलो पवन बोलतोय का?..

हो तुम्ही कोण...

समोरील व्यक्ती= मी पोलीस स्टेशन मधून सीनियर इन्स्पेक्टर राठोड बोलतोय. नमनला ओळखता का?

कोण नमन?

पोलीस= नमन देसाई... त्याच्या मोबाईल मधल्या कॉलिंगवरून सगळ्यात पहिला नंबर तुमचाच होता.

नमनला काय झाले?(घाबरतच.)

पोलीस= सगळं माहित होईल तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या.

नमन बद्दल ऐकताच माझ्या अंगावर काटे उभे राहिले होते.एका रात्रीचा फक्त अंतर झाला होता. कालच मी त्याला भेटून आलो होतो, आणि या मार्गावर काहीतरी उपाय करणार होतो.आणि इतक्यातच हे असं माझ्यासाठी फार भयंकर होतं.त्याचा परत जाणारा चेहरा माझ्या पुढ्यात साकारला आणि डोळ्यातून पुन्हा अश्रू ओघळू लागले.

मी इकडे तिकडे न बघता डायरेक्ट धावतच पोलीस स्टेशनचा पल्ला गाठला. कुणालाच काही न विचारता मी एखाद्या वेड्यासारखा आत शिरलो. बाहेरून दोन हवालदार माझ्या मागे धावत धावत आले, तर आणि त्यातील एक म्हणाला,

काय रे काय काम आहे? असं वेड्यासारखं का चालत आला.चल हो बाहेर.

सगळा स्टाफ हे सगळं बघत होता. आणि काय झालं असा कडक आवाज कानावर आला. सगळ्यांची लक्ष आतमधून येणाऱ्या इसमावर खिळली.दरवाजाचा किर्र किर्र आवाज कानात घुमला. आणि कॅप डोक्यावर ठेवत, खाकेत अडकवलेली लाठी उजव्या हातात घेत इन्स्पेक्टर राठोडचे आगमन झाले.राठोड येथे तीन चार महिन्याचा कालावधी झाला आला असेल. वयाच्या तीस ते पस्तिशितला असल्यासारखा भरदार बांधा,चेहऱ्यावर असलेली एक शोधक नजर, किंचित विचार करून कपाळाला पडलेल्या आठ्या आणि रुबाबदार पोशाखावर असलेले स्टार आणि रुबाबदार छातीवर असलेले मेडल.

शहरात असलेली दारूबंदी,टवाळखोरांच्या टोळ्या,चोरी करणारे वगैरे सगळ्यांच्या मनात भीती उत्पन्न करणारा हा पहिला इन्स्पेक्टर.ज्याने तीन ते चार महिन्यात पूर्ण शहराचा कायापालट केला होता. त्याची आणि माझी आज पहिल्यांदाच ओळख झाली होती.पण त्याबद्दल मी बरेच काही ऐकलं होतं.त्याचा तो आवाज बघून गुन्हेगारांची वाचा बसून जायची.जरा जवळ आल्यावर रुबाबात तो म्हणाला,

"काय रे कोण तू?आणि काय काम आहे?

सर मीच पवन... आता काही मिनिटांपूर्वी तुमचा कॉल मला आला होता.

अरे हा...ये इकडे...आणि तुम्ही जा रे आपापल्या कामावर.(बाकीच्यांना ओरडत.)

राठोड च्या मागे मागे मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो.आधी त्याने मला बसायला सांगितले, आणि नमनबद्दल झालेला वृत्तांत तो मला कथन करू लागला.काल तीन ते चार वाजताची ही घटना आहे. भर रस्त्यात कोणीतरी त्याला इतक्या वाईट पद्धतीने मारले आहे. की कुणाला कळले सुद्धा नाही. कारण प्रत्येकाने मोबाईलवर शूट घेताना त्याला मारणारा असा कुणीच कुणाला दिसला नाही. काल जेव्हा फोनवर मला हे सगळं माहीत झालं, तेव्हा घटनेचे गांभीर्य धरून मी त्वरित कारवाई केली. या पद्धतीने कोण मारू शकतो?त्याचा कोण वैरी असेल?काल मी त्याला हॉस्पिटलला नेले पण त्याचं पोस्टमार्टम रिपोर्ट पण विचित्र होता.त्याच्या शरीरात उष्णता फार प्रमाणात होती. एक पद्धतीचा द्रव्य शरीरात त्याच्या संचारत होतं आणि ज्या चाबकाचे फटके त्याला बसले होते, त्या पद्धतीचं चाबूक आयुष्यात मी सुद्धा कधी बघितला नाही आहे.

त्याच्या ओळखीचा मला कुणी भेटला नाही. एक तर त्याचा चेहरा पण इतका विद्रूप झाला आहे की ओळखायला येत नाही.त्यामुळे जाहिरातीला मी काही फोटोज पाठवण्यास मान्यता दिली नाही.आणि ऑल रेडी त्याचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर येऊन आहेत.हे बघा आणि त्याने मला काही व्हिडिओज दाखविले. ते बघताच मी जे काही समजायचे ते समजून गेलो आणि नमनची डेड बॉडी कुठे आहे साहेब? जरा अडखळतच विचारलं...

कोणी त्याच्या ओळखीचा नसल्यामुळे डेड बॉडी येथेच आहे.पण त्याच्या सामानात हा मोबाईल सापडला, आणि पहिला नंबर तुमचा दिसला. म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला.चला मी तुम्हाला बॉडी दाखवतो.

खरंतर नमन म्हणजे तो एकच असा माणूस होता माझ्यासाठी, जो पुरेपूर माझी मदत करणार होता.माझ्या प्रत्येक वाटेवर त्याची किंमत पण होती. पण मृत्यूने घेतलेला हा एक बळी खरंच मला खूप महागात पडला होता.ज्यामुळे परत एकदा माझ्या वाटेवर मी एकटा पडला होतो. मृत्यूच्या सामोरी.

इन्स्पेक्टर राठोड खाडखाड बूट वाजवत बाजूच्या खोलीत गेला आणि मी त्याच्या मागोमाग गेलो.समोर पांढऱ्या कापड्यात असलेला एक मृतदेह माझ्यासमोर पडलेला होता. कितीतरी साहसानंतर डोळ्यांच्या अश्रूंना टिपत मी त्या मृतदेहाच्या जवळ आलो. त्याने घेतलेल्या मैत्रीचे शब्द लक्षात घेऊन मी त्याच्या चेहऱ्यावरून पडदा सरकवला. आणि नमनची ती चित्र विचित्र आकृती माझ्या नजरेत तरारली.

क्षणभर स्वतःला असह्य यातना झाल्या, आणि मी बाजूला सरकलो. हे काय झाले मित्रा?नको ते भावनाप्रधान बोल माझ्या मुखातुन निघू लागले. शिवाय त्याने घरच्यांना न सांगण्याचे मला आश्वासन दिले होते. त्यामुळे मी त्याच्या घरी पण काही सांगू शकत नव्हतो. शेवटी त्याच्या मृत्यू सरणाचा खांदा मीच बनलो होतो. त्याच्या चितेची ती धगधगती ज्वाळा मला असह्य यातना देत होती.

शेवटचा एक साथीदार सुद्धा मी गमावून बसला होता. त्यामुळे मला एकटा असण्याची खंत आणि हुरहूर क्षणोक्षणी इथे जाणवत होती. त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यादिवशी रीनाला भेटायला गेलो. आधी तर ती ऐकायला तयारच नव्हती पण हातात असलेली अस्थी दाखवत म्हणालो,

रीना शेवटपर्यंत अगदी नमन तुझाच होता. त्याचं प्रेम खरं होतं.तुझ्या स्पर्शाने बघ कळेल तुला, कारण गेल्या काही दिवसांपासून बरंच अपरिचित घडत होतं. त्यामुळे त्याने तुला अव्हेरले होते. पण तुला सोडलं नव्हतं.जातेवेळेस त्याने मला वचन मागितले होते. त्यामुळे आजपर्यंत मी तुला काही सांगू शकलो नाही. पण त्याच्या सरणाच्या ज्वाळा देताना मी घेतलेल्या पूर्ण शपथा तिथे जळून खाक केल्या. पण चुकून त्याच्या घरी असं कधीच सांगू नकोस की तो मृत्यू पावला आहे म्हणून. हे त्याची शेवटची इच्छा आता आपल्यालाच पूर्ण करावी लागणार.

जरा वेळाने खरं काय कळलं की हृदयातला पराग काढून घ्यावा इतकी अंतकरणातली धडधड, बाहेर कुणाच्या कानापर्यंत येत असते. शेवटी काय असतं!!! प्रेम एकदा परत नव्याने उमलून येतं,परत एकदा त्याच्याबद्दल नवी उमेद, नवी भावना तयार होते.नवा आदर त्याच्याबद्दल जागृत होतो.आणि हे मला तिच्या डोळ्यात स्पष्टपणे जाणवत होतं.पण गेलेली वेळ ही काही परत येणार नव्हती.

कारण नमन बोलून गेल्यावर रीनाला त्याच्याबद्दल परस्पर घृणा तयार झाली होती.ज्यामुळे त्याचं नाव घेताच नको त्या शंका तिच्या मनात घुसमटत असायची. पण त्याही वेळेस आणि याही वेळेस अश्रुंनी तिची साथ सोडली नव्हती.ज्यामुळे सतत बिचारीच्या मागे विरहाचं दुःख लागलं होतं. क्षणभर असं सांगितल्यावर मी तिची अवस्था चांगल्या प्रमाणे समजू शकत होतो. नमनला तिच्या हवाली केलं, आणि ती काहीच न बोलता पाठमोरी होऊन निघून चालली गेली. परतीला जाताना मला स्वतःची इतकी लाज वाटू लागली होती की जाऊन कुठेतरी आत्महत्या करावी.आणि तेही मृत्यू यायच्या आधीच. असं वाटत होतं.


अपराधी अंतकरणाने मी स्वतःला घरी गेल्यावर बंद करून टाकलं. काही वेळ झालाच असेल की तेवढ्यात परत एकदा राठोडचा फोन आला. त्यांनी मला पोलिस स्टेशनला बोलावले.

तुला काय वाटतं... नमनचा मृत्यू कसा झाला असेल?

सर जे झालं आहे, तुमच्या माझ्या नकळत झालं आहे. आणि जे डोळ्यांनी बघितले आम्हाला याची पूर्व कल्पना होतीच. ज्यामुळे नमन घराच्या बाहेर असं स्वतःचं अस्तित्व लपवून होता.ज्या दिवशी ही घटना घडली मी नुकताच त्याला भेटून आलो होतो.

पूर्वकल्पना म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला...! तुम्हाला माहित आहे का? नमनच्या मृत्यूमागे कोणाचा हात आहे ते?

सर तुमचा विश्वास बसणे योग्य आहे की अयोग्य, माहिती नाही.. आणि मी त्यांना पूर्वीपासूनची सगळी कहाणी इत्यंभूत केली.

ओ आय सी...पण तुम्हाला काय वाटतं? या असल्या भाकड कथांवर लोक विश्वास ठेवतील काय?आम्हाला पोलीस ठाणे बंद करून घरी बसावे लागेल.

मला वाटलंच होतं सर.. म्हणून मी तुम्हाला खरं काय ते सांगण्यास भीत होतो.पण हे सगळं अगदी खरं आहे. आणि माझे तीन मित्र त्यात बळी गेले आहेत. आणि नमन म्हणजे तुमच्या समोरचा ताजातवाना उदाहरण आहे.

तुझं म्हणणं बरोबर आहे, पण हो... कल्पना जोडली म्हणून वास्तविकता बदलत नाही.तुमच्या मते त्यांना मृत्यूने मारलाय. पण माझ्या मते कोणीतरी फार विचार करून केलेला खून आहे.

अहो तुम्ही चारही केसेस बघा... एकच व्यक्ती एक सारखा कधीच मर्डर करणार नाही. आणि जे काही व्हिडिओ बघितले, त्यात तुम्हाला दिसते का काही? मर्डर केल्यासारखे.

हे बघ... मला वाद करायचा नाही आहे. आणि माझं तपास सुद्धा चालू आहे. पण मला असं वाटतं, की हे मर्डर आहे. आणि जगात अशी कितीतरी केस आहेत. मी आता त्यांचा शोध लावणारच आहे.

ठीक आहे सर... तुम्हाला योग्य काय वाटते तो तपास करा?आणि मला काय करायचे ते मी ठरवतो.आणि मी तिथून निघालो.