पेरजागढ- एक रहस्य.... - २३ कार्तिक हजारे द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ

पेरजागढ- एक रहस्य.... - २३

२३)रितूची शोधमोहीम...

इकडे रितूचं एक ठरलेलंच होतं.कारण तिच्याही मनात माझ्या बद्दलचं एक न्यूनगंड साचलं होतं.ज्याची जबाबदारी ती दुसऱ्यावर सोपवू शकत नव्हती.कारण जाणारा माझा जीव,जितका माझा जीव जात होता तितकाच तिचा पण, माझ्यासाठी जीव जात होता. आणि स्वतःचं जीव कुणालाच देवघरून अमरत्वाचा मिळत नसतो.त्यासाठी त्यालाच पाप आणि पुण्यरहित कार्य करावे लागते.

त्या दिवशीच्या प्रसंगामुळे पेरजागडाच्या नावाने एक अनामिक हुरहुर निर्माण झाली होती.आणि ती कुणाला,तर इन्स्पेक्टर राठोडला.कारण मधूमाश्यांचे डंख आजही त्यांच्या अंगावर डिवचत होते.आजपर्यंत केलेली ही सगळ्यात मोठी चूक आहे, असं त्यांना वाटत होतं.पण रितुकडे बघुन त्यांना परत परत त्या घेतलेल्या प्रणाची आठवण व्हायची.आणि या रहस्याचा शोध लावायचाच असं विचार करून, परत नव्या जोमाने ते कामास लागायचे.कारण सत्वाची अनुभूती काय असते? हे त्यांनी ओळखलं होतं.

त्यादिवशी त्यांच्या झालेल्या चुकीला ते स्वतःच कारणीभूत झाले होते.ज्यामुळे त्यांनी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये रितूला म्हटले, की आता आपण त्याचा शोध मिळून करायचा.तुमच्याजवळ असं काही पुरावा नाही का? जे तुम्हाला त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल..

"एक मिनिट..."

त्यावेळेस माझा मोबाईल स्विच ऑफ पद्धतीत रितुकडेच होता.आणि चार्जिंग करून तिने ठेवला होता.आजही त्याच्या मोबाईलची पासवर्डची शब्द आमच्या दोघांच्या नावातली दोन दोन अक्षरे काढून बनवलेली होती.त्यामुळे टीचभर डोळ्यांनी माझ्याकडे बघत दोन टपोरे थेंब काढले आणि मोबाईलचं पासवर्ड ओपन केला.तिथून मग ती मॅपच्या लोकेशनला गेली.आणि त्या महित्यातल्या प्रत्येक स्थळांची ती लोकेशन बघू लागली.

कदाचित तिला काहीतरी आशा मिळेल अशी शंका होती.आणि शेवटचं लोकेशन ती बघू लागली.पण पेरजागडपासूनची सगळी लोकेशन बघितल्यावरही तिला नवलच वाटले.कारण सोनापूरपासून ते  पेरजागडपर्यंत सगळी लोकेशन दिसत होती, पण स्टॉपचा कुठेच निशाण दिसत नव्हता.कारण बहुतेक मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे किंवा नेटवर्कच्या कमतरतेमुळे मॅप लोकेशन बंद दाखवत होते.ते म्हणजे पेरजागडाच्या पायथ्याशी.जिथे पेरजागडावरून कधीच जाता येत नाही.

आणि तसंपण शिवाय तिच्या गडावर कुणाला काहीच मिळालं नव्हतं.त्यामुळे रितुला वाटले की माझ्या मोबाईल वरून तिला काहीतरी मिळेल, पण इथेही तिची निराशा वाढली.कदाचित कॅमेऱ्यात काही फोटोज् असतील म्हणून इमेज बघू लागली.पण त्यातही तिला काहीच मिळाले नाही.उलट गडाच्या बऱ्याचश्या अशा दुर्मिळ फोटोज् दिसल्या ज्या तिने कधी बघितल्या पण नव्हत्या.

बाजूलाच उभे राहून इन्स्पेक्टर राठोडसुद्धा ते सगळे बघत होते.त्यांनी माझ्या मोबाईलचं ते शेवटचं मॅप लक्षात घेतलं आणि स्वतःच्या मॅप मध्ये ते बघू लागले.पण प्रात्यक्षिक करण्यासाठी त्यांना स्वतः तिथे जाणे गरजेचे होते. रितूच्या आणि त्याच्या मनात आता एकच प्रश्न पडला होता.की पवन इथे कुठे गेला असेल?

दुपारची वेळ होती आणि नुकतीच डबा घेऊन आई पण हॉस्पिटल मध्ये आली होती.त्यामुळे रितुला पण तितकीच मुभा मिळाली.आणि शिवाय ते ताबिज माझ्या दंडाला बांधलेले होतेच.आणि त्याचा महिमा पण तिने बघितलं होतं.त्यामुळे सगळं काही त्या ताबिजवर विश्वासाचा महामेरू ठेवून ती राठोड सोबत जाण्याची तयारी करू लागली.जाण्यापूर्वी क्षणभर माझ्यापाशी येऊन निश्चलपणे उभी राहिली आणि हातात हात घेत कपाळाची एक छानशी किसी घेत म्हणाली...

चाललोय रे तुला शोधायला...कदाचित तुला कळणार नाही.पण तुझ्याविना अपूर्ण असलेल्या संसाराला पूर्ण करायला. रक्ताचं थेंब न थेंब संपेपर्यंत मी तुझी वाट बघेन.चल येते मी..काळजी घे तोपर्यंत स्वतःची..आणि माझी सुद्धा...

डोळ्यांचे पारणे उजव्या दंडाने पुसत ती रुमच्या बाहेर आली.आणि तेव्हढ्याच कडक दटावणीने राठोडला म्हणाली...

चला सर..आता वेळ केलेली चालणार नाही.अजून बरंच काही गाठायचे आहे, जे अर्धवट आहे.

गाडीमध्ये काही हवालदार तसे सज्ज होतेच.रितू गाडीत बसताच पेरजागडाच्या प्रवासास शुरुवात झाली.एकदम गाडी थांबली ती पेरजागडाच्या खालील आवारातच.रितुसाठी काही हा आवार नवीन नव्हता, पण या वेळेस ती माझ्या शोधासाठी इथे आली होती.प्रत्येक बाजूला तिची एक शोधक नजर तरळत होती.अलगद माझ्या शोधार्थाने ती भटकत होती.माझ्या पाऊलखुणा स्वतःच्या प्रेमळ डोळ्यात भरवून होती.

शेवटी ज्या शिढ्यांवर लोळून पडलेला मी मिळालो होतो.राठोड तिला ती जागा दाखवत होते.आणि तशी आकृती तिथे बनलीच होती.त्याप्रमाणे रितू मला तिथे बघत होती.आणि तो फलक ज्याची अवहेलना करत राठोडने ते भोगले होते.तिने ती सूचना परत वाचली आणि पाय समोर उंचावून तिच्या प्रवासाला शुरुवात केली.

आज तिच्या नजरेत फक्त एक शोध उफाणून दिसत होता.एकप्रकारची आगतिक तडफड आणि मला शोधण्याची जिज्ञासा तिच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्टपणे जाणवत होती.कारण ती एकटी रितू नव्हती.माझी रितू म्हणून तिने गडावर पाऊल ठेवले होते.अगदी तिचे श्वास सुद्धा माझे नाव गुंजवत होते. स्पंदनांच्या तीव्र गतीचा वेध आज ती पेरजागडाला दाखवत होती.की तिचं जीव अडकलाय इथं.त्याला न्यायला ती स्वतः आलीय.सावित्रीने जसे त्याचे प्राण यमराजाकडून आणले होते.तसेच माझे प्राण घ्यायला ती आली होती.आज एक पवनची पत्नी तिथे उभी होती.

सभोवार नजर टाकून तिने आजूबाजूच्या जंगलातली शांतता डोळ्यात साठवली.मागोमाग राठोड तीच पाठलाग करत होता.पण आज फक्त तिच सामोरी चालत होती.एका विश्वासाने, एका जिद्दीने आणि प्रयत्नाने.आणि परत चालू झाला तीचा दगडांवरचा प्रवास.पण तिचे पाऊल आज थांबत नव्हते.अगदी चालताना राठोड सुद्धा ओलाचिंब होऊन गेला होता.पण रितू मात्र चालतच होती.अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत तिने धीर सोडला नव्हता.अगदी वाटेत असलेल्या गणपतीला सुद्धा तिने वाटेतच श्रद्धापूर्वक हात जोडला होता.

गडाच्या पायथ्याशी जलकुंभावर मग राठोडने मागे झालेली घटना जरा प्रत्यक्षिकपणे रंगवून सांगितली.जरा जिकडे तिकडे सभोवार लक्ष करत ती पुन्हा गडाकडे वळली. टोंगरे महाराज रहात होते त्या खोलीत जाऊन तिने बघितले.कदाचित तिला माझ्या बॅगेची आशंका असावी.मग वाटेत चालताना कधी ती काठावर जाऊन, गडाची खालची बाजू बघायची.तर कधी दगडांच्या कप्प्यात जाऊन बघायची. चालताना प्रत्येक पावलावर तिच्या फक्त तेजी दिसत होती.मग चढताना ती सगळ्यांना बघत बघत हात जोडत अगदी सात बहिणीच्या मंदिरात आली.

आल्या आल्या तिने मंदिरात घंटा नाद केला.आणि सातही बहिणीच्या पाया पडून ती म्हणाली...

बहिणींनो अभागी आहे मी...अगदीच अभागी...माझं श्वास, माझं जीव तिथे हॉस्पिटल मध्ये तडफडत आहे.आणि मी इथे त्याचा शोध करतेय.त्याच्या प्रत्येक श्वासाला कुठेतरी मला चुकल्यासारखे वाटत आहे.त्याच्यावरचे मृत्यूचे सावट अगदी मलाही खेचून नेईल असे वाटत आहे.आणि मी पण जाणारच, हे ही मी कबुल केले आहे.आता तुझ्याच स्मरणार्थ पाऊल उचललं आहे.जर तुझे अस्तित्व असेल तर दाखव त्याला..कळू दे मलाही की काळझेप त्याची एकट्याची नाही तर माझी सुद्धा आहे.जाताना एकच म्हणेन की जायचंच असेल नशिबात तर त्याच्यासोबत मलाही जाऊ दे...अन्यथा माझा पवन माझ्याचपाशी असू दे...

तिची ही आगळी वेगळी इच्छा खरंच दगडाला सुद्धा पाझर आणणारी होती.तिच्या प्रत्येक कृतीला राठोड अगदी टक लावून बसले होते.काय चाललं होतं? हे तर त्याला नक्कीच कळलं होतं.पण आता अजून बरंच काही चालणार हेही त्याला वाटत होते.हवेची एक छोटीशी लहर भिरभिर करत कानापाशी येत होती.आणि जशी जशी ती गडाच्या सम्मुख येत होती.तिचा आकार आणि रूप एका वेगळ्याच वेशात धारण होत होतं.त्याप्रमाणे सगळे त्या सात बहिणीच्या मंदिराशीच बसून होते.आणि ती वाऱ्याची लहर अलगद सगळ्यांना स्पर्श करून गडावर चालली गेली.

उडलेला पालापाचोळा हाताने थोडं झटकल्यागत करत रितूने पुन्हा पाऊल टाकण्यास सुरूवात केली.ती समोर समोर आणि राठोड तिच्या मागे मागे.आणि त्याच्या मागे दोन पहारेकरी.अगदी तेच निसर्ग सौंदर्य गडाचे अगदी बहरून दिसत होते.चालताना फक्त वाटेवरला वाळलेला गवत पायांना डिवचत होता.पण तो काही वाट अडवू शकत नव्हता.प्रत्येक गुहेला,दगडांच्या कप्पीला अत्यंत बारकाईने रितू बघत होती.आणि राठोड सुद्धा आपल्या मोबाईलचे लाइव्ह लोकेशन बघत बघत रितू ला समोर चला म्हणत खुणवत होता.

"शेवटी काही वेळाने अचानक इन्स्पेक्टर राठोड थबकले.थांबा...लोकेशन संपलं..."

सगळे थांबले...पण ती जागा कोणती होती?ज्याच्या समोर मॅपची लोकेशन नव्हती.तो होता हत्तीखोयाळ.जिथून समोरचं काहीच त्या मॅप मध्ये नमूद नव्हतं.आणि सगळे जिकडे तिकडे बारकाईने बघत होते.अलगद किनाऱ्यावर असलेल्या झाडाचा आधार घेऊन राठोडने त्या खाईमध्ये बघितले.पण त्याला खाईतले काहीच नीटसे दिसेना.आणि गडावरून खाईत उतरण्याचा असा कोणताच मार्ग पण दिसत नव्हता.

शोधा अंतर्गत जेव्हा कुणाला काहीही मिळालं नाही.सगळे मिळून गडावर चढू लागले.प्रत्येकाने स्वतःच्या पद्धतीने बऱ्याच पैकी प्रयत्न केले.पण कुणाला काहीच तसे मिळाले नाही.त्यामुळे परत आता गडावर जावे असे सगळ्यांना वाटू लागले.एका मागोमाग एक असे सगळे शोधक नजर घेऊन गड चढत होते.

बऱ्याच प्रमाणात हिंडफिर करूनही जेव्हा सगळ्यांना काहीच कसं मिळालं नाही? याची रितुला फार प्रमाणात निराशा आली.आणि प्रत्येक काठावर ती जाऊन बघू लागली.कदाचित तिला तरी काहीतरी मिळावं म्हणून.शेवटी जिथे दगडांची शिळा उभट असल्या प्रकारे होती.जिथे मेंधेपांडे महाराजांचं एकाष्म होतं.त्याच्या समोरच काही अंतरावरून तिला काहीतरी दिसलं आणि ती घाईघाईने गड उतरू लागली.

अद्याप तिच्या उत्साहाला जुमानता राठोडसुद्धा तिच्या मागोमाग आला.कारण त्यालाही वाटलं होतं की नक्कीच रितुला काहीतरी मिळालंच असणार.खाली उतरल्यावर रितू धावत धावत हत्तीखोयाळच्या दुसऱ्या बाजूला उभी राहिली.आणि तिने समोर बोट दाखवत इन्स्पेक्टर राठोडला इशारा केला.

हत्तीखोयाळच्या काठाला एक पाकळीचा झाड होता.ज्याच्या पारंब्या आणि मुळे दगडांना घट्ट पकडून होती.आणि अलगद त्याच्या पायथ्याशी माझी बॅग लटकून होती.जी वाटेवरून दिसत तर नव्हतीच पण अशीही नजरेला सहसा दिसत नव्हती.एका साथीदाराच्या मदतीने राठोडने ती बॅग काढली आणि रितूकडे दिली.रितू ने बॅग खोलून बघितलं तर माझ्या बऱ्याच काही वस्तू त्या बॅगेत पडून होत्या.ज्या तिला आवश्यक होत्या.

बॅग मिळाली यापेक्षा तिला आणखी काय महत्त्वाचं होतं.स्वतःभोवती गड जिंकल्याची स्मित उद्भवत ती गड उतरायला लागली, आणि राठोडलाही काहीतरी मिळाल्याचं समाधान मिळालं.कदाचित नियमांचे उल्लंघन करून जरी तो त्या गडावरून परतला नसता, तर कदाचित आज त्याला इतकं काही करावं लागलं नसतं.आणि ज्या पद्धतीने रितूने जे शोधकार्य केलं होतं, ते अगदी अद्वितीय होतं.आणि त्याप्रमाणे ते सगळे हॉस्पिटल मध्ये जमा झाले.

रेट करा आणि टिप्पणी द्या

सर्वप्रथम टिप्पणी टाइप करा!