लॉकडाउन - हंपीकर नागेंद्र - भाग ५

  • 7.5k
  • 2.7k

एप्रिल महिन्याचे कडक ऊन अंगाची लाहीलाही करत होते. हंपी शहरातील, माफ करा विजयनगर साम्राज्याच्या राजधानीतील असंख्य पाषाण उन्हाने तप्त झाले होते. त्यांना बघण्यासाठी म्हणून कुणी आले नव्हते. आता त्यांना त्याची सवय झाली होती. इकडे नागेंद्र देखील घरात चिंतेत बसून होता. नागेंद्र, अठ्ठावीस वर्षांचा तरुण. आई मदयंती आणि वडील मंजूनाथ यांच्यासह नागेंद्र हंपीत रहात होता. ते मूळ कुठचे? हे मंजूनाथला देखील माहिती नव्हते. पण पोटापाण्यासाठी ते हंपीत वास्तव्याला होते, नागेंद्रला एक लहान भाऊ देखील होता, केशव नावाचा. तिथेच गंगावतीला इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. हंपीपासून गंगावती काही जास्त दूर होते असे नाही, पण हंपीला पर्यटकांची जास्त वर्दळ असल्याने केशव गंगावतीलाच भाड्याच्या खोलीवर