७)पवन...एक कुतूहल...हॉस्पिटलमध्ये होत असलेली धावपळ सगळ्यांच्या निदर्शनास येत होती. रितूला एक प्रकारे मानसिक धक्का बसल्यासारखा होता. कदाचित ऐकताना तिला जे काही वाटले नव्हते, पण आज प्रत्यक्षात बघतांना ती अनुभवत होती. रात्रीची ती जी काही परिस्थिती होती.तिला समोरही काय करावं? काय नाही ?हा विचार गुंतत चालला होता.भिंतीवरच्या येशूला डोळ्यातले अश्रू देऊन ती सारखी मला मागत होती.तिच्या जीवनाची मनीषा अशी विझु नको देऊस, सतत हीच प्रार्थना तिच्या अंतर्गत गाजत होती. रात्री झालेल्या धावपळीमुळे बिचारी ती माझ्या बाजूलाच निशब्द होऊन बसली होती.जिवाचं पण लावायला सुद्धा ती मागेपुढे बघणार नव्हती.तिच्या मनाची ती कठोर निष्ठा,खरंच दगडाला सुद्धा पाझर आणणारी होती. सकाळी आई आली.आल्या आल्या तिने