लॉकडाउन - क्वारंटाइन सॉफ्टवेअर इंजिनीअर - भाग ६

  • 5.2k
  • 1.8k

“रामराव, आहात का घरात?” पाटलांनी दारावर थाप मारत जोरात आरोळी मारली. “या... या पाटील. काय म्हणतात, आज सकाळीच चरणकमल आमच्या घराला लावलेत. काय विशेष?” रमराव दार उघडत म्हणाले. “तुमचे कुलदीपक आले म्हणे पहाटे, त्यांनाच घ्यायला आलोय.” पाटील मिशीला ताव देत म्हणाले. पाटलांचे हे बोलणे ऐकून रामरावांचा चेहरा चिंताग्रस्त झाला. रामराव पाटील, गावातील एक उमदा शेतकरी माणूस. स्वभावाने चांगला. सुयोग, रामरावांचा एकुलता एक मुलगा. सॉफ्टवेअर इंजिनीअर. नोकरीला अर्थातच पुण्याला. उच्चशिक्षण देखील पुण्यालाच. त्यामुळे गावाशी फारसा संबंध नाहीच. काल रात्री दुचाकीवर मित्रासोबत घरी येण्यासाठी निघाला. तसं गाव त्याला आवडायचं नाही. पण आता गावी जाणं म्हणजे काळाची गरज होती. सर्वत्र कडक लॉकडाउन सुरू