चहा प्रेम आणि मी..

  • 8.4k
  • 1.6k

खरतर तुझी माझी पहिली ओळख कुठे झाली तेनीटसे आठवत नाही.. कारण लहानपणापासून घरी चहा प्यायलास तर काळा होशील हा… म्हणत तुझ्याबद्दल सगळ्यांनीच भीती घातली.. खर तर त्या वयात तुझ्याबद्दलचे आकर्षण होते ही आणि नव्हतेही… दूध प्यायचा सतत कंटाळा आणि मोठी लोक असे रंगेबेरंगी कपांमधून काय पितात ते त्याबद्दल आकर्षण होतेच पण खूप गरम असतो,चटका बसतो म्हणून तू आवडायचा ही नाहीस..?????? सोबत काळा झालो तर …ही भीती… त्यांनतर मात्र तुझी माझी ओळख झाली हे खरं … आपसूकपणे .. मग असा पांढरा दुधाळ चहा आणि ग्लुकोसे बिस्कीट खायला शिकलो.. आणि हो खूपदा बुडवताना बिस्कीट खाली पडायचं जे मला बिलकुल आवडायचं नाही…हट्टाने मग