Love tea and me .. books and stories free download online pdf in Marathi

चहा प्रेम आणि मी..

खरतर तुझी माझी पहिली ओळख कुठे झाली ते
नीटसे आठवत नाही.. कारण लहानपणापासून घरी चहा प्यायलास तर काळा होशील हा… म्हणत तुझ्याबद्दल सगळ्यांनीच भीती घातली.. खर तर त्या वयात तुझ्याबद्दलचे आकर्षण होते ही आणि नव्हतेही… दूध प्यायचा सतत कंटाळा आणि मोठी लोक असे रंगेबेरंगी कपांमधून काय पितात ते त्याबद्दल आकर्षण होतेच पण खूप गरम असतो,चटका बसतो म्हणून तू आवडायचा ही नाहीस..😄😄😄😄😄😄 सोबत काळा झालो तर …ही भीती…

त्यांनतर मात्र तुझी माझी ओळख झाली हे खरं … आपसूकपणे .. मग असा पांढरा दुधाळ चहा आणि ग्लुकोसे बिस्कीट खायला शिकलो.. आणि हो खूपदा बुडवताना बिस्कीट खाली पडायचं जे मला बिलकुल आवडायचं नाही…हट्टाने मग तुला दूर सरायचं .. तू तेव्हा फक्त बिस्कीट ओला करायला लागायचास… वय वर्ष ८/९ होते बहुतेक.. आठवणीतील ही तुझी माझी खरी ओळख ..

त्यानंतर बिस्कीटने साथ सोडली आणि चपाती आली.. गरम गरम चपातीचा रोल आणि वाफाळलेला तू.. डुबुक करून खाताना चटके हि बसायचे आणि घाईघाईत तू मात्र तसाच राहून जायचास टेबलवर.. कितीतरी वर्ष ..

त्यांनतरचा तू आठवतोय ते सकाळचा अभ्यासचा सोबती म्हणून .. अभ्यास करता करता मिटलेले डोळे उघडायचे काम मात्र तू चोख बजावायचा . तेव्हाच कधीतरी त्या गा आपली मैत्री घट्ट झाली.अगदी आयुष्याचा भाग कधी झालास कळलंच नाही..

बघ ना कॉलेजमध्ये भेटलेला तू,, कधी कॅन्टीन मध्ये तर कधी टपरी वर.. त्यातला टपरीवरचा तू जरा जास्ती भावलास.. अगदी १ कटिंग मध्ये तेव्हा दुनिया सामावलेली असायची, मित्र बरोबर कल्ला , मौज, मस्ती भविष्यही स्वप्नं ह्याचा साक्षीदार ही तूच. कटिंग घेऊन टपरीवर घोळक्यात उभे राहून टाईमपास करण्यात जी मज्जा आहे .. ती शब्दात नाही मांडता येणार तेव्हा तुझे माझे वय १६/१७ .. तिथून खरी दोस्ती सुरु झाली…आपली

त्यांनतर कटिंग घेऊन वाट बघण्याचा काळ.. १० मिनिटात येते म्हणणारी ती… चांगला तासभर उशीर करायची तेव्हा साथीला फक्त तू असायचास .. मनाची घालमेल, ते वाट बघणे , खोटा खोटा राग आणि आळवणे .. ह्या सगळ्यांचा साक्षीदार फक्त तू..

तिच्या बरोबर फिरताना आयुष्ययभर साथ द्यायचा स्वप्नचा साक्षीदार ही तूच .. रोमँटिक पाऊस , लोणावळाची बाईकची सफर आणि गरम गरम वाफाळता तू.. त्या नाजूक गुलाबी ओठांचा स्पर्श झालेला तू आणि तो एकाच प्याला …. तेव्हा कित्ती गोड लागायचास …ती तुझी चव आजही जिभेवर आहे त्या धुंद आठवणी त्याला कोण विसरेल….???

नंतरच तू भेट्लेलास तो ऑफिसमध्ये.. रोज थोड्या थोड्या वेळाने गरम गरम डेस्कवर ना बोलावता येणारा, तू आलास कि छोटा ब्रेक होणार हे ठरलेले .. थोडे टेन्शन रिकामे करणारा, चल जरा बोलू या .. म्हणत आपसूक मीटिंग मध्ये शिरणारा ही तू.. बरेचसे प्रॉब्लेम्स तुझ्या एका कपावर सुटणारा ..अनेक मित्र जमवले तुझ्या साथी मुळे….

त्यानंतरचा काळ, एक गरम चाय कि प्याली हो उसको पिलाने वाली हो वाला , तू आठवतोय ते नाजूक हातानी गोल्डन रिंग असेलेल्या कप मधून समोर आलेला .. तिचा कप देताना झालेला नाजूक स्पर्श आणि हिंदाळलेला तू.. सोबतच अलवार मोहक हास्य आणि त्यात बुडलेला मी… त्यांनतर तू मात्र नेहमीच भेटत राहिलास, कधी बिस्कीट , कधी ब्रेड कधी पराठा कधी चपाती कधी पोह्याबतोबर, सकाळ संध्याकाळ, कधी रोमँटिक क्षणांचा साक्षीदार तर कधी भांडणाचा ही.. अर्थात भांडण शमवली आहेत ती तुझा तुझ्याच जीवावरच ..

परदेशात भेटलेला मात्र तू खूप वेगळा… अमेरिकेत तू अगदीच पांचट बेचव कुठून प्यायलं असे मनात आणणार तर इंग्लंड मध्ये भेटलेला तू गरम कमी उकळलेला बिन दुधाचा तर ऑस्ट्रेलिया मधला तू चक्क मसाला चायच्या नावाने गरम कळकट्ट औषध असल्यासारखा…. तेव्हा तुझी खरी खरी आठवण यायची आणि. किंमत ही कळायची… खरी मज्जा तर घरी आल्यावर ,मस्त अद्रक घातलेला गरम, ब्राउन, कमी दुधाचा गोड असा… अर्थात तिच्या हातून ….. त्या ना बोलता ही खूप काही बोलून जाण्याचा साक्षीदार ही तू……

हल्ली मात्र राहून राहून तू भेटोस ते वेगळ्याच रूपात.. बिन साखरेचा , कधी लिंबू मारलेला तर कधी चक्क ग्रीनटीच्या नावाने .. तर कधी जस्मिन टी कधी टरमेरिक टी च्या नावाने ..मज्जा नाही बुआ तुझ्या ह्या रूपात …. आपले जुनेच रूप बरं .. आता तर काय तुला वलय हि प्राप्त झालाय… एक चहावाला आमचा पंतप्रधान आहे.. म्हटल्यावर तुझा भाव ही वधारला आहे….

गड्या.. तू काय साथ सोडू नकोस यार.. आयुष्यात मज्जा नाही तुझ्याशिवाय..


इतर रसदार पर्याय