Evaluating love .... books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाचं मूल्यमापन ....

आज लवकर येशील?? त्याच्या मोबाईल वर मेसेज आला...


आता हे काय नवीन?? परवाच तर सुट्टी झाली ना यार..anniversary म्हणून. परत आज लवकर येशील म्हणून मेसेज...कठीण आहे बाबा....काय बोलू आता ही राधा पण ना...जरा समजून घेत नाही यार ..!!!!

बघतो...कठीण वाटते...प्रयत्न करतो .....काही काम आहे का???

हम्म्म काम नाही पण appraisal आहे..!!!घरी ये बोलू... राधा ने मेसेज केला


हे काय नवीन खूळ आत्ता...appraisal कसले......झाले की डिसेंबर मध्ये ..आत्ता कुठे..ह्या राधाचे ना काही कळत नाही अशीच आहे पहिल्या पासून ..नीट काही बोलेल तर शपथ...


त्याचे मन भूतकाळात रमले. कामचा समोर ढीग पडला होता पण सगळे यांत्रिकपणे चालू होते...मन मात्र खूप लांब कॉलेज मध्ये गेले..

अनुराधा जोशी...जोशी घराण्याचा वारसा घेऊन आलेली...इंच शेलका बांधा..मोठे रुंद कपाळ, धारदार नसिका आणि करडी डोळे आणि गुलाबी गोरा रंग.बघूनच कोणाला ही घायाळ करणारी ..त्यावर हुशार आणि मनस्वी मुलगी..नाका समोर चालणारी पण तरी ही आपले वेगळे पण जपणारी...थोडी शी मस्तीखोर, थोडी खट्याळ अशी अनुराधा...पहिल्यांदा बघितले तेव्हां मैत्रिणी च्या घोळक्यात चिवचिवाट करत होती...बोलताना तिचे आपले म्हणणे पटवणातला हातखंडा दिसत होता, हावभाव, आवाजाचा विशिष्ट वापर...कोणी पटकन फिदा होऊन जाईल असेच...तो ही बघत बसला तिच्याकडे.......

असे बघणार तो एकटाच नव्हता ..बरीच जण असायची तिच्या मागे, होतीच ती ब्युटी क्वीन ..सब दिलं की धडकन...कॉलजची जान , ती मात्र ह्या सगळ्यापासून चार हाथ लांब राहणारी, कॉलेज मित्र मैत्रिणी, अभ्यास ह्या पुढे काहीच नाही...त्याला ही माहित होते आपली दाळ इथे शिजणार नाही ते .. एक तर इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून मुली आधीच कमी म्हणून आधीच सगळे मागे, त्यात ही सौंदर्याची खाण.. लपून लपून तिला बघत बसायचा, लांबून तिच्या वर लक्ष ठेवून असायचा, मागे मागे फिरायचा पण तिला कळून ना देता...

कॉलज चा फेस्टिवल निमित्ताने दोघांची दोस्ती झाली...खरे म्हणजे राहुल ला छान संधी मिळाली अनुराधा शी दोस्ती करण्याची, पण आपली मर्यादा ओळखून होता ह्या मुळे तो प्रपोज करण्याचा भानगडीत पडला नाही.

बरेच जण ने तिला प्रपोज केल्यानंतर तिचे उत्तर ठरलेले असायचे...मी तुझ्या भावनांची कदर करते पण माझ्या मनात असे काही नाही. तसे पण जोशी घरणात प्रेम प्रकरण चालत नाहीत..शिक नोकरी बघ मग घरी ये...तो पर्यंत मित्र म्हणून राहू...बसा गडी तिथेच बाद...


एकदा राहुल जे तिला विचारले पण ह्या सगळ्या बदल. दुसरा कोणी असता तर कदाचित अनु ने उत्तर दिले नसते पण राहुल बदल फार चांगले मत होते तिचे. एक तर तो आघळ पघळ बोलायचं नाही,अभ्यासू होता आणि मुख्य मह्ये अनुशी रेस्पेक्ट ने वागायचा...उगीच थिल्लारपणा किवा तिचा सौंदर्याचा मागे मागे करणारा वाटत नव्हता..त्या डोळ्यात नेहमी तिला आदरच दिसला... नाहीतर बाकीची मुले एकतर तिचा प्रेमात पडून तिला पटवायला दोस्ती करायची.खरे मित्र असे नव्हतेच तिला.त्यामुळे राहुल चांगला वाटत होता. तसा तो ही हुशार होता.. इंजिनिअरिंग कॉलज मधला हुशार विद्यार्थी होता, त्याच्या बराच प्रोजेक्ट्स ना अवॉर्ड मिळाले होते, दिसायला फार देखणा नसला तरी चेहऱ्यावर आकर्षक होता त्यात शरीर फिट्ट ठेवले होते. कायम मित्रांच्या गराड्यात असायचा. .. प्रोफेसर ही खुश असायचे त्याच्यावर. नोट्स, प्रोजेक्ट्स अभ्यासात मदत करायचा सगळ्यांना...

सांग ना अनुराधा ...असे का उत्तर देतेस सगळ्यांना ...

मग काय सांगू ..खरे तेच सांगितले ..घरी नाही चालणार...सक्त ताकीद आहे. घरी जातपात पाळतात. अभ्यास केलाच पाहिजे, नोकरी केलीच पाहिजे...मग काय सांगू ह्यांना.म्हणून असे सांगते..घरचे नाव काढले की गप्प बसतात सगळे.तसे पण बाबाचा दरारा आहे बाहेर त्याचा फायदा उठवता आला पाहिजे ना मला...

आणि कोणी खरंच घरी आला तर??? मग काय करशील???

हम्म ..मी कशाला काही करायला पाहिजे, बाबाच बघतील काय करायचे ते...ती खळबळून हसून बोलली...

कठीण आहे बाबा ..हिला पटवायला आधी हिच्या बाबा ना पटवले पाहिजे...

होता होता दोघांचे ही इंजिनिअरिंग झाले. राहुल पुढे मास्टर करायला अमेरिकेस निघून गेला. तर अनुराधा पुण्याला नोकरी लागली. दोन वर्षात राहुल ने मात्र तिच्या संपर्कात राहिला.अधून मधून दोघं चॅटिंग करायचे. राहुल चे मास्टर्स झालयावर त्याला तिकडेच नोकरी लागली आणि घरी लग्नाचे वारे व्हायला लागले. अनुराधाला आता तरी विचारावे ..काय माहित लग्न झाले आहे का? की कोणी तिच्या आयुष्यात आहे का ??

त्या दिवशी मग त्याने हिमत करून तिला मेसेज केला. स्काईप वर व्हिडिओ कॉल केला..जवळ जवळ वर्षाने दोघा एकमेकांस बघत होते...राहुल चे पाहिले लक्ष गेले ते तिचा गळ्या कडे...चला मंगळसूत्र दिसत नाही. तरी पण इकडं चा तिकडच्या गप्पा झाल्यावर विषय काढला. ..काय गा लग्न केलस की नाही?? मला वाटले अजून दोन मुलांची आई झाली असशील???

नाही...कॉलेज मध्ये कोणी घरीच आले नाही..रे..तिचा खट्याळपणा अजून हि कामी झाला नव्हता.

दोघांना हि आपल्या कॉलेज ची गोष्टी आठवून खूप हसले मग...राहुल ने सांगितले मुंबई ला येतोय...भेटू या का??बरीच वर्ष झाली आहेत भेटून.ती ही पटकन तयार झाली मग भेटायला.

दोन महिन्याने राहुल भारतात आला. अनुराधा ला भेटायचे मनात खूप प्लॅन्स बनवले होते. शनिवारी पुण्याला आला तो भेटायला खोटेच सांगितले पुण्याला एका लग्नाला येतोय संध्याकाळी भेटू. ठरलेल्या ठिकाणी वेळेच्या आधी कोफिशोप मध्ये तिची वाट बघत बसला..मनाची घालमेल होत होती. आज विचारावे तिच्या मनात कोणी आहे का ते मग घरी सांगावे हिच्या बदल असे मनात योजलेले होते पण विषय कसा काढायचा ते तिच्यावर होते. ती तर फक्त मित्र म्हणून बघत होती त्याचाकडे येवढ्या दिवसात...जवळ जवळ ८ वर्ष ओळखत होते दोघे एकमेकांना मित्र म्हणून. आवडेल का मी जीवनसाथी म्हणून तिला...आपल्याच विचारात दंग होता तो....तेवढ्यात मेसेज आला १० मिनट मध्ये पोचते आहे..तू पोचला का???

त्याने लगेच मेसेज केला ये आरामात मी पोचलो. ..पांढऱ्या रंगाचे ची संत्रो सफाईदार पणे पार्क करून ती कोफिशोप मध्ये शिरली...आज तर अजूनच सुंदर दिसत होती..उंची बरोबर आता शारिरीला गोलाई आली होती ब्ल्यू जीन्स आणि त्यावर पांढरा कुर्ता आणि स्कार्फ मस्तच दिसत होते..त्यावर निळे लायनर लावलेले ते करडे डोळे आणि गुलाबी ओठ..टोक टोक करत तिचे ती मस्त चालणे..जणू एखादी मॉडेलच अवतरली होती...तोच काय सगळे कोफिशोप बघत होते तिच्या कडे...

हाय...कसा आहेस तू...ती मात्र कळून ही ह्या गावाची नाही...असा नखरा ..

मी मस्त...तुला मात्र पुणा मानवलेले दिसतय...छान दिसतेय कॉलेज पेक्षा...

ती मग छान पैकी हसली ..आपले शुभ्र दांतपांक्ती दाखवत राहुल अजूनच प्रेमात पडला तिच्या...

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या भरपुर. जुन्या आठवणी निघाल्या.मित्रमैत्रिणी कुठे आहेत काय करतात ह्याची चौकशी झाली...मग शेवटी त्यानेच विषय काढला.लग्नाचे काय??कोणी पसंत केलाय की ठरले आहे?तुझ्या सारखी सुंदर मुलगी अजून सिंगल कशी???

घरचे बघत आहेत लग्नाचे, दोन तीन कार्यक्रम झाले पण अजून म्हणावसं असा कोणी क्लिक नाही झाला..एकदा ठरलेले लग्न मोडले साखरपुडा झाला होता पण तो अतिशय संशय घ्यायला लागला, एकदा हात उचलला पार्टी मधले फोटो फेसबुक वर बघून म्हणून मग पुढे त्रास नको म्हणून लग्न मोडले. तरी मी बदनाम माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून लग्न मोडले म्हणून... बस म्हणून सिंगल आहे अजून.

अजुन तीच अट आहे का ...शिकून मोठा हो, नोकरी बघ आणि घरी ये....की काही बदलले????.

हाहाहा तुला लक्षात आहे अजून..??

हो.मग.म्हणून तर तुला विचारतोय...घरी कधी येऊ(!!!!हुश्श्श)

काय!!!!! काय बोललास तू??

तेच जे तू ऐकलेस ते. अर्थात तुझ्या मनात असेल तरच. माझ्याबद्दल सगळे माहीत आहेच आता तुला. विचार कर आणि सांग. येऊ का नको ते? तुला चालेल का? आवडेल का ? सगळे सोडून अमेरिकेला यायला आवडेल का? माझ्या बरोबर लाईफ शेअर करावीशी वाटेल का? तुझा होकार असेल तर घरी बोलेन दोघांच्या ही. माझ्या घरी काहीच प्रॉब्लेम नसेल ..झालाच तुझ्या घरी होईल. जातीपाती वरून बस बाकी नाही. एक दमात सगळे बोलून मोकळा झाला राहुल.

अनुराधा मात्र त्याच्याकडे बघत बसली थोडा धक्का बसला तिला...ह्याने प्रपोज ना करता सरळ घरी येऊ का विचारले !!! कमल आहे ...वेगळाच आहे हा ..


ती काहीच बोलत नाही बघून राहुल ला टेन्शन आले.
बाप रे ..काय चाललंय हिच्या मनात काहीच कळेलना..

थोड्यावेळाने तिथून उठला आणि म्हणाला तू विचार कर शांतपणे...मी निघतो. उद्या सकाळी मुंबईला जातोय. राधा माझ्या कडे वेळ नाही जास्ती. एक महिनाच आहे. तुझा होकार असेल तर लगेच हालचाल केली पाहिजे मला. नंतर पुढच्या वर्षी येईन मग आता...


चल बाय निघतो मी...बिल पे करुन तो तिथून निघून जातो. अनु मात्र बराच वेळ विचार करत बसते तिथेच.

बराच वेळ तो तिच्या फोनची वाट बघत बसतो पण अनुचा एक ही कॉल येत नाही.म्हटल्यावर तो ही विचार करतो कदचित तिला मी फक्त मित्र म्हणून आवडतो बस बाकी काही नाही.जाऊन दे घरचे सांगितले तिथे लग्न करून मोकळे व्हावे.....

बरयाच उशिरा अनुराधा त्याला कॉल करते आणि विचारते कधी भेटशील बाबांना ते सांग तसे घरी जाता येईल...हे ऐकुन राहुल बेड वरून खालीच पडतो. ...थोड्यावेळ बोलून मग फोन ठेवतो.


आता घरी आई ला फोन करून अनुराधा बदल सांगतो आणि बाबांना पटवायला सांगतो. अनुराधा ला मेसेज करून तिचे दोन तीन चांगले फोटो मागवून घेतो आणि आई ला पाठवून देतो. घरच्यांना अर्थातच अनुराधा खूप आवडली. मग अनुराधा चा घरी जाऊन भेटून आले. थोडे आढेवेढे घेतले पण राहुल चे शिक्षण, त्याची अमेरिकेत ली नोकरी आणि मुख्य म्हणजे त्याचा स्वभाव बघून शेवटी लग्नाला तयार झाले. मग काय झट मंगनी पट ब्याह करत अनुराधा आणि राहुल लग्नाच्या बेडीत अडकले....


लग्नाच्या पहिल्या रात्री मात्र अनुराधा ने आपल्याला अजून थोडा वेळ हवा आहे...थोडे समजून घेऊ एकमेकांना म्हटले.खरे तर राहुल नाराज झाला पण त्याने थोडा वेळ द्यायचा ठरवले.

आपण प्रेम करत होतो इतक्या वर्ष तिच्यावर ती थोडीच करत होती, तिच्या साठी मी अजून एक मित्रच आहे, त्यात नवीन घर,घरची माणसं, राहणीमान सगळेच वेगळे आहे तिच्यासाठी. थोडा वेळ लागेल तिलाही सगळे समजायला उमजायला. इतकी वर्ष थांबलो अजून काही महिने सही....

लग्नानंतर दोघे हनिमून ला गेले नाहीत, अनुराधा चे व्हिसा, पासपोर्ट सगळे काम करण्यातच दिवस भराभर गेले आणि महिन्याने दोघे अमेरिका ला रवाना झाले.

तिथले नवीन वातावरण, नवीन लोक ह्यात अनुराधा थोडी बावचली. हळू हळू अमेरिका, राहणीमान, लोक ह्यांना सरावली. तिला दर आठवड्याला बाहेर फिरवून आणायचा. आपले घर तिने छान मर्जी ने सजवले होते, रोज नवनवीन पदार्थ करून राहुलला बनवून देत होती . कोणाला ही हेवा वाटेल असे दोघांचे दोस्तीचे नाते होते. होता होता एक वर्ष झाले दोघांच्या लग्नाला.

ह्या वर्षात राहुल खूप समजून घेतले तिला, आपली नव्याने ओळख करून दिली, नवीन नवीन गोष्टी, ठिकाणे तिच्या आवडी निवडी, स्वतंत्र्या दिलं. तरी ही अनु त्याला मित्रच मानायची......नक्की काय होते तिच्या मनात काही कळत नव्हते ..बोलायला गेले तर मला वेळ हवा आहे म्हणायची तर कधी रडायला लागायची. मग राहुल ही माघार ठरलेली. उगीच तिच्यावर जबरदस्ती करण्यात अर्थ नव्हता.

परवाच दोघांनी आपली anniversary सेलिब्रेट केली..पण राहुलचा बिलकुल मूड नव्हता खूप चिडचिड होत होती त्याची आणि आज असा मेसेज...

थोडे फार काम आटपून तो नेहमी पेक्षा लवकर आला. घरी बघतो तर घर छान पणे सजवलेले.गुलाब ठीक ठिकाणी फ्लॉवर पॉट मध्ये लावलेले. मंद संगीत सुरू आणि आत किचन मध्ये अनु काहीतरी बनवत होती. मस्त सुगंध येत होता...

काय झाले..कोणी येणार का आपल्याकडे...लवकर ये म्हणालीस ते ??? त्याला कळेना ..तशी तिची कोणाशी जास्ती मैत्री नव्हती ..पण मग ही सगळी तयारी बघून त्याने विचारले..

नाही...आज appraisal आहे तुझे आणि माझे पण म्हणून तयारी केली आहे.

म्हणजे..नाही समजले काही !!!काय बोलतेय..(खरे तर.मनातून वैतागला होता. नक्की काय आहे मनात)

बास्स ना कॉफी आणते.

मला तुझ्याशी बोलायचे आहे माझ्याबद्दल आणि आपल्याबद्दल सुद्धा...आपले लग्न हे असे अचानक झाले, जास्ती वेळ नाही मिळालं तुला सगळे सांगण्यासाठी..तुला जाणून घेण्यासाठी .. म्हणून तुझ्या कडून वेळ मागून घेतला.माझ्या वागण्याने त्रास झाला असेल ना तुला...सॉरी... मुदाम नाही वागले अशी मी...माझी ही कारण होते त्या साठी...आधीच्या प्रसंगाने पोळले होते म्हणून तुला पारखून घेत होती एवढेच. त्याने नुसता माझ्यावर संशय नाही रे घेतला तर कधी एकांतात मला चावला तर कधी हात पिर्गळायचा काळानिळा होई पर्यंत तर कधी केस ओढायचा अगदी रडे पर्यंत ..बर कोणाला सांगायची पण चोरी काय सांगू ...अरेंज मारिएज ..मग एकांतात का भेटतात म्हणून हजार प्रश्न विचारले असते सगळ्यांनी मला. कहर म्हणजे माझे मित्र मैत्रिणी ही तोडल्या ह्याने. ऑफिसच्या पार्टीचे फोटो फेसबुक वर टाकले कोणी तरी मग घरी येऊन तमाशा केला त्याने, नाही नाही ते बोलला, वर त्याचे घरचे होतेच साथ द्यायला आणि बाबा समोर मारले मला.. शेवटी हिमत करून मीच सुनावले आणि अंगठी फेकून दिली त्याच्या तोंडावर......


आईबाबांनी बोलणेच सोडले माझ्या ह्या वागणे पायी.बाबा आजारी पडले मग माझ्यामुळे..माझा दोष काय तर मी दिसायला सुंदर ...शाप होता हा माझ्यासाठी...कसे सांगू कोणाला...मग तुझ्याशी लग्न झाले..मनात भीती होतीच ...तू पण असा वागलास तर म्हणून तुला जाणून घेतले आधी. तुझा वागणं फक्त आता साठीच आहे का ते नंतर पण तसेच राहील ह्याची खात्री होत नव्हती...

पण तू तर कमालच केलीस..एकदा ही जबरदस्ती नाही की चिडला नाही की मारले नाही की टोचून बोलला नाहीस. नेहमीं सांभाळून घेतले, आई बाबा समोर, सासू सासरे समोर, मित्रमैत्रिणी समोर. मैत्रीण म्हणून नेहमीच स्वीकारले, काळजी घेतलीस माझी,गप चुप प्रेम ही केलेस माझ्यावर, लपून लपून माझ्या साठी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून केल्यास... थँक्यू त्याच्यासाठी ..ह्या वेडी ला समजून घेतल्या बदल ....म्हणून तुझे आज प्रमोशन करणार आहे मी...


म्हणजे.?? खरे तर राहुल ला हे सगळे नवीनच होते..फक्त तो संशयी होता, एकदा तिला मारायचा प्रयत्न केला म्हणून लग्न मोडले तेवढेच माहीत होते...आज जे ऐकले ते सगळेच नवीन होते त्याच्यासाठी...नो वंडर तिने वेळ घेतला, आपल्याला समजण्या साठी बेचारी कसे सहन केले असेल हे तिने ... सौंदर्य शाप पण असू शकते...काय लोक असतात एक एक.....

अनु तेवढ्यात आत जावून आरतीचे ताट घेवून आली. राहुल मला देवा पुढे सिन्दुर भरशील प्लीज??आपली बनवशील आजपासून?? मित्र म्हणून तर तू मला हवाच आहेस पण नवरा म्हणून प्रमोशन आवडेल तुला??? तिने लाजत विचारले...


पण मी कुठे appraisal केलंय तुझे अजून?? मग असे कसे चालेल ??एक साथ प्रोम्शन झाले तर मजा ना??? राधा मला तू एक मैत्रीण आवडतेच.. ..तुझ्यात बायको होण्याचे गुण आहेत की नाही ते मला बघावे लागतील आता....म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत बंदिस्त केले......


बरोबर एक वर्षाने परत आपल्या नात्याचे नव्याने Appraisal करायचे ठरवले दोघांनी. नात्यातला दुरावा, अडचणी, एकमेकांच्या खटकणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या नंतर जाउन नात बिघडवू शकतात त्या दोघांनी मोकळेपणाने बोलायचे ठरवले...असे होते त्यांचे प्रेमाचे appraisal.....

इतर रसदार पर्याय