पेरजागढ- एक रहस्य... - १५

  • 7.5k
  • 3.4k

१५) रितुला ताईत मिळणे... इन्स्पेक्टर राठोड... जेव्हापासून त्यांनी माझ्या केस वर लक्ष द्यायची वेळा चालू केली होती. तेव्हापासून एक त्यांच्या जीवनात एक वेगळाच प्रवास चालू झाला होता. कधी त्यांनाही वाटले नव्हते की जगात अस्तित्वाच्या बाहेरही विशाल जग आहे म्हणून. कारण दंतकथा पेक्षा तंतोतंत उदाहरण त्यांना फार अधिक प्रमाणात आवडायचे. तसं राठोडला म्हणजे पोलिसांना बघण्याचा प्रत्येक गावकऱ्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामुळे साधा माणूस जेवढा जनसामान्यात मिसळून हवी ती माहिती काढून घेतो तसा ह्या पोलिसाला जमले नसते. पण प्रयत्न आधी त्याचे चालू होते. मी कोणाची भेट घेतली? कुठे वगैरे जायचो? वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी नोंदी केल्या होत्या.