संतश्रेष्ठ महिला भाग २

  • 11.2k
  • 4.1k

संतश्रेष्ठ महिला भाग २ संत परंपरेतील महिलांमध्ये प्रथम नाव मुक्ताबाईंचे घेतले जाते . संत मुक्ताबाईंचा उल्लेख फार आदराने केला जातो . अत्यंत लहान वयात उत्तम समज असणारी जुनी व जाणकार संत त्यांना आद्य संत म्हणून संबोधले जाते . ज्यांच्यामुळे मराठी साहित्याचे दालन परिपूर्ण झाले. ज्यांनी मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलविलेला आहे. अशा संत ज्ञानदेवाच्या भगिनी संत मुक्ताबाईंचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदी गावाजवळील सिद्धबेटावर अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार शके १२०१ म्हणजेच इ. सन. १२७९ मध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव होते . स्त्री शक्तीच्या जोरावर त्यांनी तेराव्या शतकातही आपल्या साहित्य कृतीतून परंपरेच्या जोखडातून