किती सांगायचंय तुला - ८

  • 8.8k
  • 3
  • 3.5k

एवढा वेळ एकमेकांत हरवलेले असताना कोणी तरी दिप्ती ची ओढणी ओढत असते. तशी ती भानावर येते आणि खाली बघते.. आदिश्री तिची ओढणी ओढत असते.. तिला बघून दिप्ती खाली बसण्यासाठी झुकते पण शिवा चा हात तिच्या पाठीवर असल्यामुळे ती थांबते.. शिवा तरी पण तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो.. " मिस्टर दिक्षित"- दिप्ती त्याला आवाज देत असते पण शिवा मात्र तिच्यात एवढा हरवला असतो की त्याला तिचा आवाज ऐकू येत नाही. शेवटी ती त्रासून त्याला दोन्ही दंडाला धरून हलवते. शिवा भानावर येतो आणि सॉरी म्हणुन दिप्ती पासून दूर होतो. दिप्ती आदिश्रि समोर दोन्ही गुडघ्यांवर खाली बसते. " तुला नवीन फ्रेंड मिळाला तर तू