Kiti saangaychany tula - 8 books and stories free download online pdf in Marathi

किती सांगायचंय तुला - ८


एवढा वेळ एकमेकांत हरवलेले असताना कोणी तरी दिप्ती ची ओढणी ओढत असते. तशी ती भानावर येते आणि खाली बघते.. आदिश्री तिची ओढणी ओढत असते.. तिला बघून दिप्ती खाली बसण्यासाठी झुकते पण शिवा चा हात तिच्या पाठीवर असल्यामुळे ती थांबते.. शिवा तरी पण तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो..

" मिस्टर दिक्षित"- दिप्ती त्याला आवाज देत असते पण शिवा मात्र तिच्यात एवढा हरवला असतो की त्याला तिचा आवाज ऐकू येत नाही.
शेवटी ती त्रासून त्याला दोन्ही दंडाला धरून हलवते. शिवा भानावर येतो आणि सॉरी म्हणुन दिप्ती पासून दूर होतो.
दिप्ती आदिश्रि समोर दोन्ही गुडघ्यांवर खाली बसते.
" तुला नवीन फ्रेंड मिळाला तर तू मला विसरली का?"- आदीश्री लहान चेहरा करून म्हणते.
"नाही बाळा, तुला कसं विसरणार मी. तू तर माझी सगळ्यात गोड मैत्रीण आहे."- दिप्ती तिचे गाल ओढत म्हणते.
" मग एवढ्या दिवसात तू मला एकदा पण नाही बोलली"- आदिश्री गाल फुगवून म्हणते.
" कामामुळे मला वेळ नाही मिळाला आणि तुझी पण शाळा असते, मग डान्स क्लास असतो. आपली भेट नाही होत ना रोज. पण ह्या नंतर आजपासून मी तुझ्या सोबत वेळ घालवणार."- दिप्ती तिला समजावत म्हणते.
"काका पण विसरला मला"- आदिश्री शिवा कडे बघून म्हणते.
" मी नाही विसरलो तुला, मला पण वेळ नाही मिळत ना पिल्लू. काम आहेत पुष्कळ.. आणखी काही दिवस बस, मग सगळा वेळ तुझा"- शिवा खाली बसून म्हणतो.
"प्रॉमिस?"- आदीश्री तिचा हात दोघांसमोर करून म्हणते.
" पक्का प्रॉमिस"- दिप्ती तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवते.
" माझा पण एकदम पक्का प्रॉमिस"- शिवा त्याचा एक हात दिप्ती च्या हातावर आणि दुसरा हात आदिश्री च्या हाताखाली ठेवून म्हणतो.
आदिश्री पटकन दोघांनाही मिठी मारते.. त्यामुळे दिप्ती शिवा कडे झुकते ,दोघं आणखी जवळ येतात.
"आदु, तुला कुणी सांगितलं आम्ही इकडे आहोत ते?"- शिवा आदिश्री ला विचारतो.
" श्रुती आत्याने सांगितलं"- आदिश्री दोघांपासून दूर होत म्हणते.
दोघेही इकडे तिकडे बघतात तेव्हा त्यांच्या लक्षात येत की श्रुती इथे नाही आहे. तिघेही परत जाण्यासाठी निघतात तर समोरून श्रुती येते.
" बाबा बोलवत आहे तुला"- शिवा काही बोलण्याच्या आधी श्रुती त्याला म्हणते.
तिचा चेहरा पाहून त्याला काही तरी गंभीर विषय आहे असं वाटतं.
"येतो कपडे बदलवून"- शिवा
" नाही, असाच जा"- श्रुती गंभीर होऊन म्हणते.
शिवा थेट सयाजी रावांच्या रूम कडे निघतो. दिप्ती ला काहीच कळत नव्हते की काय झालं ते. ती इशाऱ्याणेच श्रुती ला काय झालं म्हणून विचारते. श्रुती नंतर सांगते म्हणून शिवा च्या मागे निघून जाते. दिप्ती आदिश्री ला घेऊन तिच्या रूम मध्ये जाते.
शिवा सयाजी रावांच्या रूम मध्ये येतो. सयाजी राव, अशोक राव, श्रीकांत, सुचित्रा ताई, मयुरी आणि काव्या असे सगळे आधीच तिथे उपस्थित होते. त्या सगळ्यांना तिथे बघून तर शिवा ची खात्री पटली होती की काहीतरी सिरियस आहे. सुचित्रा ताईंच्या डोळ्यात पाणी होत.
"काय झालं बाबा?"- शिवा सयाजी रावांना विचारतो.
सयाजी राव एक नजर सुचित्रा ताईकडे बघतात आणि शिवा कडे बघून म्हणतात, " शिवा साताऱ्यावरून फोन आला होता आदित्य चा , माधुरी ला हार्ट अटॅक आला आहे.. आय सी यू मध्ये आहे अस म्हणत होता.. आपल्याला बोलावल आहे त्यांनी. "
शिवा सगळ शांतपणे ऐकत असतो. एक नजर सुचित्रा ताई कडे बघतो. त्या डोळ्यांना पदर लावून बसलेल्या असतात. शिवा त्यांच्या जवळ जातो आणि खाली बसून म्हणतो, " तुला जायचं आहे तिला बघायला?"
सुचित्रा ताई रडतच मान हलवून हो म्हणतात.
" बर जा, मी नाही म्हणणार नाही तुला "- शिवा त्यांचा हात हातात घेऊन म्हणतो.
" शिवा, तुझे बाबा आणि मी जाणार आहोत,तू पण आला असतास तर...."- सुचित्रा ताई थोड अडखळत बोलतात.
" तुला जायला नाही म्हणत नाही आहे मी. पण प्लीज मला यायला सांगू नको. तुमच्या दोघांची जायची व्यवस्था करतो आणि बाबा सोबत काही पैसे ठेवा. कामी येईल तिकडे."- अस म्हणून शिवा त्याच्या रूम कडे निघतो.
सुचित्रा ताई श्रुती कडे बघतात. श्रुती त्यांच्या अश्या पाहण्याचा उद्देश लक्षात घेऊन म्हणते, " मी पण नाही येणार आहे तुमच्या बरोबर" आणि पाय आपटत निघून जाते.
बाकीची मंडळी पण रूम बाहेर पडतात.
दोघांनी पण नकार दिल्याने सुचित्रा ताईंना खूप वाईट वाटत. त्या आणखी जोरात रडायला लागतात.
" अग आता का रडतेस अशी? त्याने दिली ना परवानगी "- सयाजीराव
" ते ठीक आहे हो, पण शिवा आला असता आपल्या सोबत तर भेट झाली असती ना त्याची माधुरी सोबत."- सुचित्रा ताई डोळे पुसत म्हणतात.
" हे बघ, त्याने आपल्याला विरोध नाही ना केला. मग आपण पण त्याला फोर्स करायला नको. जास्त विचार करू नको. निघायचं आहे आपल्याला. चल आवर लवकर"- सयाजी राव त्यांना समजावत म्हणतात.
तश्या सुचित्रा ताई हो म्हणून आवरायला लागतात.
इकडे शिवा रूम मध्ये येऊन ऑफिस साठी तयार होत असतो, पण त्याच लक्ष मात्र कुठेच लागत नाही. त्याच एक मन म्हणत असते की जायला हवं आणि दुसर मन त्याला विरोध करत असते.. विचार करून करून त्याच्या डोक्याचा भुगा झाला असतो.. पण मग तो स्वतःला सावरत नाही जायचं अस ठरवतो.
नकळत त्याच मन त्याला भूतकाळात घेऊन येते..
माधुरी ताई म्हणजे सयाजी राव आणि अशोक राव यांची एकुलती एक बहिण. म्हणजे शिवा ची आत्या. त्यांचं लग्न पण दिक्षित कुटुंबा सारख्या नावाजलेल्या घराण्यात झालं होतं. एकुलती एक असल्यामुळे माहेरी त्यांचे सगळे हट्ट पूर्ण होत होते. पण सासरी मात्र त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. सासू सासरे जरी चांगले असले तरी त्यांचे पती मात्र त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होऊ लागला होता. ही गोष्ट सयाजी रावांच्या बाबांना समजल्यावर त्यांनी तिला कायमचेच घरी आणले. तेव्हा त्याच्या पदरात पाच वर्षाचा आदित्य होता. दिक्षित कुटुंब जस शिवा चे लाड पुरवायचे तसेच सगळे आदित्य सोबत पण वागत होते. शिवा लहानपणापासूनच समजुतदार आणि दुसऱ्यांचा आदर करणारा होता तर आदित्य तेवढाच हट्टी आणि वर्चस्व गाजवणारा. शिवा का जे वस्तू आवडायची ती वस्तू आदित्य मनमानी करून स्वतःची करून घेत होता. शिवा शांतपणे हे सगळ सहन करत होता. दोघांचं संगोपन सारखं झालं होतं पण शिवा च्या स्वभाव सगळ्यांना आवडीचा असल्यामुळे त्याची प्रशंसा जास्त होत होती. हे आदित्य ला कधीच सहन होत नव्हते.
तो नेहमी शिवा चा तिरस्कार करायचा. जसजसे दोघे मोठे होत होते, शिवा विषयी आदित्य चा राग आणखी वाढत होता. दोघांनीही मास्टर डिग्री मिळवल्यानंतर कंपनी जॉइन करायचे ठरवले. आदित्य ला ह्या सगळ्यात काहीएक रस नव्हता पण शिवा कंपनीत जाणार म्हणून त्याने ही तोच निर्णय घेतला होता. त्याला फक्त पैसे कसे मिळवायचे हेच माहिती होत. अशोकराव आणि श्रीकांत च्या मदतीने शिवा हळूहळू काम पुढे नेत होता. मन लावून काम करत होता. पण आदित्य काम न करता बाकीच्या गोष्टी करायचा. एके दिवशी तर चक्क त्याने त्याच्या डिपार्टमेंट च्या एका महिला कर्मचारी सोबत दुष्कर्म करायचा प्रयत्न केला, तिने शिवा कडे त्याची तक्रार केल्यावर शिवा ने त्याच्या कानाखाली एक लावून त्याला ताकीद देऊन सोडले. पण ही सल मात्र आदित्य च्या मनात नेहमीसाठी राहिली. त्याने शिवा सोबत हिशोब चुकता करायचं ठरवून दीक्षित ग्रुप च्या प्रतिस्पर्धी कंपनी सोबत हात मिळवला. शिवा ची कंपनी ज्या प्रोजेक्ट टेंडर वर काम करत होती तो टेंडर त्या प्रतिस्पर्धी कंपनीला त्यांच्या कडे मिळवायचा होता. म्हणून दिक्षित ग्रुप मध्ये राहून आपली मदत करू शकेल असा व्यक्ती त्यांना हवा होता. आदित्य ने त्यांच्या सोबत हात मिळवून त्यांचं काम सोपं केलं होत. आदित्य सगळ्या पर्सनल डिटेल्स त्या कंपनीला पुरवायला लागला.असेच काही दिवस तो हे काम सगळ्यांच्या नकळत करत होता.पण एक दिवस याची जाणीव श्रीकांत ला झाली. त्याने ती अशोकराव आणि शिवा ला पण सांगितल. पण त्यांच्या कडे आदित्य विरूद्ध पुरावा नसल्याने ते शांत होते. पुरावा मिळवण्यासाठी शिवा ने त्याचे काही माणस आदित्य च्या मागावर पाठवले. ते आदित्य ची प्रत्येक डिटेल शिवा ला देत होते. असच एकदा आदित्य त्या कंपनीच्या मालकाला भेटायला गेला तेव्हा शिवा च्या माणसाने त्याला फोन करून ही माहिती दिली तसा शिवा आणि श्रीकांत दोघेही त्या ठिकाणी पोहचतात. कुणी बघू नये म्हणून दोघेही एका पिल्लर मागे लपून सगळ ऐकत असतात. आदित्य त्या मलकाच्या हातात एक फाईल देतो आणि कामाचं बोलून निघून जातो. शिवा हे सगळ त्याच्या मोबाईल फोन मध्ये रेकॉर्ड करून घेतो आणि दोघेही त्याच्या मागे निघतात आणि ऑफिस मध्ये येऊन ती रेकॉर्डिग अशोक रावांना दाखवतात. आदित्य ऑफिस मध्ये न येता घरी जातो. शिवा, श्रीकांत आणि अशोक राव पण घरी येतात.
घरी येऊन बघतात तर आदित्य हॉल मध्ये पाय पसरवून आरामात बसलेला असतो. त्याला अस बसलेलं बघून अशोक राव त्याच्या जवळ येऊन म्हणतात.
" आदित्य, ऑफिस ला का नाही आला आज. माहिती होत ना तुला महत्वाची मीटिंग आहे ते"
आदित्य नजर चुकवत म्हणतो," ते आपल्या नवीन साईट वर गेलो होतो. काम कस सुरू आहे ते बघायला."
" कस सुरू आहे मग काम?"- श्रीकांत त्याला थोड रागात विचारतो.
" छान सुरू आहे. बस थोडेच बाकी आहे"- आदित्य काही तरी बोलायचं म्हणून म्हणतो.
शिवा सटकन त्याच्या कानाखाली वाजवतो आणि त्याची कॉलर पकडून म्हणतो," कुठली साईट रे, त्या हरामखोर वर्मा ची. ज्याला तू आपल्या कंपनीचे डिटेल्स दिले."
शिवा च बोलण ऐकताच आदित्य चा चेहरा भीती ने पांढरा झाला होता.
" काय म्हणतोय तू हे?"- आदित्य कळत असूनही न कळल्यासारख दाखवतो.
" माहित नाही तुला मी कशाबद्दल बोलतोय ते? थांब दाखवतो"- अस म्हणत शिवा मोबाईल काढतो आणि त्याला रेकॉर्डिंग दाखवतो.
रेकॉर्डिंग पाहिल्यावर आदित्य पूर्णपणे शॉक मध्ये जातो.
"बोलती बंद झाली का रे तुझी. आता समजलं काय म्हणत होतो मी"- शिवा
त्यांचा आवाज ऐकुन सयाजी राव, सुचित्रा ताई आणि माधुरी ताई तिघेही हॉल मध्ये येतात.
" काय सुरू आहे शिवा? कसला आरडाओरडा चाललाय तुमचा?"- सयाजी राव
शिवा तिघांनाही ती रेकॉर्डिंग दाखवतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो.
" हे काय केलं नालायक मला तू?"- सयाजी राव चिडून म्हणतात.
आदित्य त्यांच्या कडे पाठ करून उभा राहतो.
" अरे काय गरज होती अस करायची?"- सुचित्रा ताई त्याला हाताला पकडून स्वतःकडे वळवत म्हणतात.
आदित्य तोंडातून एक शब्द काढत नाही. सगळे त्याला विचारत असतात पण माधुरी ताई मात्र शांत उभ्या असतात. त्यांना अस शांत बघून सयाजी राव म्हणतात,
" माधुरी तू काहीच बोलणार नाही आहे का ह्याला? अशी गप्प का?"
तरीही त्या शांत असतात. आता मात्र अशोक रावांचा पारा चढतो," हा असा सांगणार नाही. थांब मी पोलिसांना बोलवतो. दोन फटके पडतील ना तेव्हा कळेल ह्याला. त्या वर्माचा तर बंदोबस्त केला आहे आता तुझा पण करतो." - अस म्हणून अशोक राव मोबाईल घेतात.
एवढा वेळ शांत असलेल्या माधुरी ताई पटकन जाऊन त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतात. त्यांच्या अश्या वागण्यावर सगळे त्यांना आश्चर्याने थक्क होऊन बघतात.
" हे काय करत आहे तू माधुरी? दे फोन इकडे"- अशोक राव त्यांच्या हातातून मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत म्हणतात.पण माधुरी ताई तेवढ्याच वेगाने मागे सरकतात.
कुणालाच कळत नाही त्या का अश्या वागत होत्या ते.
" काय चाललय तुझ माधुरी? दे अशोक ला फोन. ह्या नालयकला चांगली शिक्षा व्हायला हवी"- सयाजी राव दात ओठ खात म्हणतात.
" कशाची शिक्षा? काय केलं अस त्याने ज्याची शिक्षा देणार तुम्ही त्याला?"- माधुरी ताई ओरडत म्हणतात.
सगळे जण त्यांच्या कडे डोळे फाडून बघत असतात. त्यांना कळत नाही की एवढं सगळं होऊन पण ही आदित्य ची बाजू का घेत आहे ते.
" अग काय बोलतेस तू? शिवा ने दाखवलं तरी माहित नसल्या सारखं काय करतेस"- सुचित्रा ताई.
" त्याने जे काही केलं बरोबर केलं."- माधुरी ताई आदित्य च्या बाजूला उभ्या होत म्हणतात.
त्यांच्या अश्या वागण्याचे सगळ्यांना आश्चर्य वाटते.
" म्हणजे तुला माहिती होत हे सगळ?"- शिवा माधुरी ताई ला विचारतो.
" हो, माहित होत मला सगळ. आणि त्याने जे केलं बरोबर केलं. आपल्याला जर हक्क मागून नसेल मिळत तर तो अश्या पद्धतीने मिळवण्यात काही वाईट नाही आहे."- माधुरी ताई ठामपणे म्हणतात.
" काय बोलतेय तू तुला तरी कळतेय का?"- सयाजी राव चिडून म्हणतात.
" आणि कुठल्या हक्का बद्दल बोलत आहे तू? दोघांनाही लहानपणापासून सारखाच दिलं की. मग कुठला हक्क?"- अशोक राव माधुरी ताई ला म्हणतात.
" तोच हक्क जो शिवा ला मिळाला पण माझ्या मुलाला नाही. तोच हक्क ज्यामुळे शिवा हवं ते करू शकतो पण माझा मुलगा नाही. तोच हक्क दादा, ज्यामुळे फक्त सगळे शिवा च नाव घेतात. आदित्य च नाही"- माधुरी ताई रागाने लालबुंद झाल्या होत्या.
" त्यासाठी तस वागावं पण लागत. हा वागलाय का कधी? केवळ मनमानी, विनाकारण हट्ट पूर्ण करून घ्यायचे एवढंच येत ह्याला"- सयाजी राव आदित्य कडे रागात बघून म्हणतात.
" का वागला तो असा कधी विचार केलाय कुणी? त्याला स्वातंत्र्य दिलं असत तसं तर तो पण शिवा सारखं वागला असता ना"- माधुरी ताई आदित्य ची बाजू मांडत म्हणतात.
" माधुरी तू आंधळी झाली आहे ग मुलाच्या प्रेमात. तुला हे साधीसुधी चूक वाटते का. किती मोठा प्रसंग ओढवला असता आपल्या कंपनीवर. ह्याचा विचार केलाय कधी"- सयाजी राव त्यांना समजावत म्हणतात.
पण त्या कुणाचच ऐकायला तयार नसतात. त्यांचं तेच तेच बोलण सुरू असत. किती तरी वेळ त्यांचं तेच सुरू असते आणि सगळे त्यांना समजावत असतात.
शेवटी सयाजी रावांचा संयम संपतो.
आताच्या आता निघायचं माझ्या घरातून आदित्य. तुला हीच शिक्षा समज. "- चिडून सयाजी राव म्हणतात.
" तो जर इथून गेला तर मी पण जाणार त्याच्या सोबत. पण तुमच्याशी कायमचे संबंध तोडून"- माधुरी ताई सयाजी रावांना म्हणतात
ह्या वर कुणीच काही बोलत नाही.
" माझ्या मुलाला त्याचा हक्क देण्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर एक करू शकता तुम्ही"- माधुरी ताई न रहावुन बोलून देतात.
अशोक राव त्यांना बोलणार तेवढ्यात सयाजी राव हात दाखवून त्यांना थांब म्हणतात आणि माधुरी ताई कडे बघून म्हणतात, " बोल काय हवय तुला?"
" बाबांनी जे संपत्ती माझ्या नावावर केली आहे ती सगळी संपत्ती हवी आहे मला. ती मिळाल्यावर मी निघून जाईल इथून."- माधुरी ताई
हे ऐकल्यावर तर सगळ्यांना पायाखालची जमीनच सरकली अस वाटत होत.
सयाजी राव त्यांच्या रूम मध्ये जावून प्रॉपर्टी चे पेपर्स घेऊन येतात आणि माधुरी ताईंच्या हातात ठेवतात.
" दादा अरे...."- अशोक राव त्यांना काही बोलणार तेच सयाजी राव त्यांना डोळ्यांनीच काही बोलू नको म्हणतात.
माधुरी ताई आणि आदित्य दोघेही आपापल्या रूम मध्ये जावून बॅग्स घेऊन येतात आणि कुणाशी एक शब्द न बोलता वाड्याच्या बाहेर पडतात. सगळे त्यांना शांतपणे अस जाताना बघत असतात. शिवा एक नजर सयाजी रावांना बघतो. ते शांत उभे असतात. शिवा ला त्यांचा स्वभाव माहित होता. ते काही बोलत जरी नसले तरी त्यांना आतमधून खूप वाईट वाटत होते. शिवा त्यांच्या जवळ जातो आणि आवाज देतो तसेच ते खाली कोसळतात. त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टर सांगतात की मायनर हार्ट अटॅक होता, पण अस समोर होऊ नये म्हणून काळजी घ्यायला लावतात. हे सगळ माधुरी ताईंना कळल्यावर पण त्या सयाजी रावांना भेटायला येत नाही याचाच शिवा ला खूप राग येतो. हळूहळू दिवस जात होते. घरातली सगळी मंडळी सगळ विसरली होती पण शिवा मात्र काहीच विसरला नव्हता. त्याच्या मनात आताही आत्या आणि आदित्य साठी राग होता. हे सगळ्यांना माहीत होते त्यामुळे सयाजी रावांनी पण त्याला सोबत येण्यास फोर्स केला नव्हता.
शिवा त्याच्याच विचारात असताना त्याची विचारशृंकला तुटते ती आदीश्रि च्या आवाजाने. ती जोरजोरात आवाज देत त्याच्या रूम चे दार ठोठावत असते. शिवा दार उघडतो. आदिश्री आत येते नी लाडिक पने म्हणते, " काका आज मला पार्क मध्ये घेऊन चल ना. किती दिवस झाले मी गेले नाही तुझ्या सोबत."
" नाही अादु, आज नाही जमणार मला. नंतर कधी तरी जाऊ. आज खूप काम आहे ऑफिसमध्ये"- शिवा आरश्यात बघून केस करत म्हणतो.
" चल ना रे. काय काम काम. मला एकटीला खूप बोअर होत "- आदिश्री रडवेला चेहरा करून म्हणते.
" नाही म्हटल ना मी. नंतर घेऊन जाईल तुला"- शिवा थोड रागात म्हणतो.
पण आदिश्री त्याच एक नाही ऐकत. तिची जिद्द सुरूच असते. आता मात्र शिवा ला राग अनावर होतो आणि तो तिच्या वर चिडून म्हणतो," तुला कळत नाही का आदिश्री. एकदा नाही म्हटलं ते. आता आणखी हट्ट करशील ना तर धपाटा देईल तुला" बोलता बोलताच शिवा च लक्ष दाराकडे जात. दारासमोर दिप्ती ला उभ बघून तो त्याचा आदिश्री वर उचललेला हात पटकन खाली घेतो.
त्याच्या अश्या बोलण्याने आदिश्री रडायला लागते. रडता रडता तीच पण लक्ष दिप्ती वर जाते तशी ती पटकन जाऊन तिला बिलगते आणि मोठ्याने रडते. शिवा दिप्ती ला काही म्हणणार तेच दिप्ती त्याच काहीही न ऐकता आदिश्री ला उचलते आणि तिथून निघून जाते. शिवा त्याच्या माथ्यावर हात मारून घेत फक्त बघत असतो.

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED