शिवा ची कार फुल स्पीड ने रस्त्यावर धावत असते. रेडिओ स्टेशन वर मस्त जुनी गाणी सुरू असतात. शिवा लक्ष देऊन कार चालवत असतो आणि दिप्ती आपल्याच विचारात मग्न होऊन काचेच्या बाहेरील हिरवळ बघत असते. एवढ्या वेळ कोणी कोणाशीच काहीही बोलत नाही. थोड्या वेळात गाडीचा ब्रेक लागतो. अचानक झटका लागल्याने दिप्ती विचारातून बाहेर येते.
"पोहचवल की नाही वेळेच्या आधी "- शिवा दिप्ती ला म्हणतो.
दिप्ती चेहऱ्यावर स्मित हास्य आणत हो म्हणून मान हलवते आणि दार उघडून गाडी च्या खाली उतरते.
शिवा पण लगेच तिच्या मागे गाडी बाहेर येतो. दिप्ती फॉर्मली बाय करून वळते आणि शिवा तिला हाक मारतो.
तशी ती जागीच थांबते आणि मागे वळून बघते.
" मला हे म्हणायचं होत की, तुमचं काम किती वेळात पूर्ण होईल. नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी येतो तुम्हाला घ्यायला."- शिवा थोडा अळखळत म्हणतो.
" मला माहित नाही किती वेळ लागेल, म्हणजे बहुतेक सायंकाळ पण होऊ शकते. तुम्ही कशाला त्रास करून घेता एवढा. मला सोडेल ऑफिस ची गाडी ."- दिप्ती त्याच्या डोळ्यात न बघता इकडे तिकडे बघत म्हणते.
" त्यात त्रास कसला, माझा हाच रुट आहे, तुम्ही कळवा मला तस , येतो तुम्हाला घ्यायला. तस पण मैत्रीत त्रास होत नाही अश्या गोष्टींचा "- शिवा गोड हसून म्हणतो..
" नको, खरचं नको. मी येईल बरोबर."- दिप्ती विरोध करत म्हणते.
तिच्या अश्या बोलण्याने मात्र शिवा चा चेहरा उतरतो.
"ओके एस यू वीश.."- अस म्हणून शिवा तिला बाय करून निघून जातो.
दिप्ती पण मेन गेट च्या आत जाते.
दिप्ती ला कळत होत की शिवा ला वाईट वाटलं तिच्या बोलण्याच पण ती त्याच्या जितका होईल तितका दूर राहण्याचा प्रयत्न करत असते..
दिप्ती हेड ऑफिस ला रिपोर्ट करून कामाला लागते. इकडे शिवा पण त्याच्या मीटिंग मध्ये व्यस्त होऊन जातो.
पण शिवा ला मात्र मध्ये मध्ये दिप्ती ची आठवण येत असते. थोड्यावेळ साठी का होईना दिप्ती कामामुळे तीच दुःख विसरली असते.. संपूर्ण दिवस खूप बिझी जातो दोघांचाही. शिवा ला तर जेवण करायला पण वेळ मिळत नाही. एका मोठ्या कॉन्ट्रॅक्ट वर काम सुरू होत त्याचं. जर हा कॉन्ट्रॅक्ट त्याच्या कंपनी ला मिळाला तर शिवा ला खूप चांगली संधी होती कमी वयात बेस्ट बिझनेस मॅेन बनायची. म्हणून तो तहानभूक विसरून काम करत असतो..
कामाचा व्याप आणि जेवण न केल्यामुळे त्याचं डोकं ठणकायला लागते.
कॉफी साठी तो त्याच्या सेक्रेटरी ला कॉल करतो " दिप्ती एक कॉफी आण लवकर"
थोड्यावेळात त्याची सेक्रेटरी कॉफी घेऊन येते. शिवा तिला कप टेबल वर ठेव म्हणून सांगतो नी थँक्यु म्हणतो.
" इट्स ओके सर, आणि सर माझ नाव दिशा आहे दिप्ती नाही."- अस म्हणून ती केबिन बाहेर जाते.
तेव्हा त्याला आठवत की आपण दिशा ऐवजी दिप्ती म्हटलं होत आणि स्वतःशीच हसतो. तो असा हसत असताना श्रीकांत कधी त्याच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसतो हे त्यालाही कळत नाही.
" अस गालातल्या गालात काय हसत आहात शिवा भाऊ?"- श्रीकांत थोडा रिलॅक्स होऊन खुर्चीला मागे टेकत म्हणतो.
शिवा भानावर येतो आणि गोंधडून इकडे तिकडे बघत श्रीकांत ला विचारतो.." तू कधी आला?"
" तू एकटाच हसत होता ना तेव्हा. पण का हसत होता रे तू?"- श्रीकांत बारीक डोळे करून म्हणतो..
शिवा काही उत्तर देणार तेवढ्यात अशोक राव ( शिवा चे काका) तिथे येतात.
"श्रीकांत, नवीन साईट ची डॉक्युमेंट कुठे ठेवली रे तू, किती वेळचा शोधत आहे मी."- अशोक राव थोड वैतागून म्हणतात.
" तुमच्या टेबल च्या ड्रॉवर मधेच ठेवले होते मी"- श्रीकांत
" चल दाखव मला कुठे आहे तर"- अशोक राव
श्रीकांत त्यांना चला म्हणून त्यांच्या सोबत जातो. इकडे शिवा मात्र सुटकेचा निःश्वास सोडतो.
"वाचलो, नाहीतर दादा मधला सी आय डी ऑफिसर जागा झाला असता आज."- शिवा स्वतःशीच म्हणतो.
आणि सगळे विचार सोडून पुन्हा कामाला लागतो.
" हॅलो श्रुती, अग मला यायला वेळ होईल थोडा, म्हणजे रात्र पण होऊ शकते. काका काकूंना सांगून देशील."- दिप्ती श्रुती ला म्हणते.
"पण जेवण कुठे करशील?"- श्रुती काळजी ने विचारते.
" इथेच मेस मध्ये, काळजी नको करू तू ओके ठेवते मी फोन. बाय"- दिप्ती फोन ठेवून देते आणि पुन्हा कामाला लागते.
रात्रीचे आठ वाजले असतात तरी दिप्ती च काम काही पूर्ण झाल नव्हत. इकडे शिवा पण त्याच्या केबिन मध्ये काम करत असतो. ऑफिस चा पुष्कळ स्टाफ गेला असतो, फक्त मेन लोक काम करत असतात.. थोड्यावळाने शिवा त्यांना उरलेलं काम उद्या करू म्हणून जायला सांगतो आणि स्वतः केबिन मध्ये येऊन उरलेलं काम करायला घेतो..
" शिवा, झालं नाही का तुझ. जायचं नाही वाटते आज घरी. बाबा वाट बघत आहे तुझी"- श्रीकांत बाहेरूनच केबिन मध्ये डोकावत म्हणतो.
" दादा तू आणि काका व्हा समोर मी येतो थोड्या वेळाने"- शिवा लॅपटॉप मध्ये बघत म्हणतो.
"ठीक आहे पण लवकर ये, आणि खाऊन घे काहीतरी. सकाळपासून काहीच नाही खाल्ल तू"- श्रीकांत
शिवा हो म्हणून मान हलवतो. श्रीकांत त्याला बाय करून निघून जातो. शिवा पुन्हा कामाला लागतो.
"कॅप्टन दिप्ती, उरलेलं काम उद्या करा. इट्स टू लेट.. आय थिंक यू शुल्ड गो.."- दिप्ती चे वरिष्ठ अधिकारी येऊन तिला म्हणतात.
" येस सर, थोडच काम बाकी आहे. निघते थोड्या वेळात"- दिप्ती
वरिष्ठ अधिकारी ओके म्हणून निघून जातात. दिप्ती चे सहकारी ऑफिसर पण निघून गेले असतात. दिप्ती एकटीच असते ऑफिस मध्ये. काम झालं असते तीच, पण सकाळी शिवा ला तिने नाही म्हटल त्याचाच ती विचार करत असते. तिला वाईट वाटत असते स्वतःच्या अश्या वागण्याचं.
" काय करू बाप्पा मी, सकाळी जे झालं त्याबद्दल काहीच तक्रार केली नाही त्यांनी. चिडले पण नाही. मी दूर रहा म्हटल तरी मैत्री तोडली नाही. खरचं ते मला फ्रेंड मानतात आणि मी, मी आज नाही म्हणून मन दुखावलं त्यांच. करू का त्यांची मैत्री स्वीकार? मान्य आहे मला की मागचं सगळं विसरून पुढे बघितल पाहिजे, पण एवढ सोपं नाही ते. माझ्या बाबतीत तर मुळीच नाही. भीती वाटते मला पुन्हा मैत्री करायला. काय करू मी बाप्पा, प्लीज मार्ग दाखवा मला"- दिप्ती स्वतःशीच विचार करत असते.
तेवढ्यात दिप्ती चा फोन वाजतो. श्रुती चा असतो फोन.
"हॅलो दिप्ती, अग किती वेळ आणखी. नऊ वाजले आता."- श्रुती
" बस निघतच होते मी आणि तुझा फोन आला.चल बाय, घरी आल्यावर बोलू"- दिप्ती
" ऐक दादा आहे बाहेर उभा, त्याच्या सोबतच ये. ठेवते मी फोन बाय"- दिप्ती काही म्हणायच्या आधी अस म्हणून श्रुती फोन कट करते. तिला माहिती होत की दिप्ती वाद घालत बसेल म्हणून ती दिप्ती ला चान्स देत नाही काही बोलायचा.
" काय मुलगी आहे, बोलू पण नाही दिलं मला काही आणि फोन कट केला. घरी गेल्यावर बघते हिला"- दिप्ती स्वतःशीच म्हणते आणि बॅग घेऊन तिच्या केबिन बाहेर पडते.
इकडे गेट बाहेर शिवा गाडी ला टेकून दिप्ती ची वाट बघत उभा असतो. त्याला दिप्ती मेन गेट मधून बाहेर येताना दिसते. तसा तो तिला हात हलवत हाय म्हणतो.
दिप्ती त्याच्या जवळ येते आणि हाय म्हणते.
" तुम्ही गेले का नाही घरी.. एवढा उशीर झाला तरीही? माझ्या साठी थांबण्याची गरज नव्हती"- दिप्ती
"मला श्रुती चा कॉल आला होता, तिने सांगितलं की तुम्ही पण घरी यायच्या आहात म्हणून आणि माझ पण काम आताच झालं, म्हणून म्हटलं हाच रूट आहे तर थांबू थोडा वेळ."- शिवा दिप्ती ला म्हणतो.
थोडा वेळ दोघेही तसेच उभे असतात. कोणीच कोणाशी बोलत नाही.
शांतता भंग करत शिवा म्हणतो, " निघायचं आपण?" दिप्ती हो म्हणून कार मध्ये जाऊन बसते.
शिवा पण कार सुरू करतो आणि रेडिओ स्टेशन वर गाणी लावतो. आता रात्रीची वेळ म्हटल की गाणी पण रोमँटिक लागतात. तशीच गाणी सुरू असतात रेडिओ स्टेशन वर.
त्यात अभिजित ने गायलेल 'कभी यादों मे आऊ, कभी खाबों में आऊ ' हे गान वाजत असते.
दिप्ती तिच्या पण नकळत ते गाण गायला सुरुवात करते.
कभी यादों में आऊं कभी ख़्वाबों में आऊं
तेरी पलकों के साये में आकर झिलमिलाऊं
मैं वो खुशबू नहीं जो हवा में खो जाऊ
हवा भी चल रही है मगर तू ही नहीं है
फिज़ा रंगीन बनी है कहानी केह रही है
मुझे जितना भुलाओ मैं उतना याद आऊं
हां.. हां.. जो तुम ना होते होता ही क्या हार जाने को
जो तुम ना होते होता ही क्या हार जाने को
मेरी अमानत हो तुम मेरी मोहब्बत हो तुम
तुम्हे कैसे मैं भुलाऊं..
तिला अस गाण गाताना बघून शिवा हळूच रेडिओ चा आवाज कमी करतो आणि फक्त दिप्ती चा आवाज ऐकत असतो. दिप्ती पूर्ण मग्न होऊन गात असते. गात असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं असते आणि अचानक काही तरी फुटण्याचा आवाज येतो. तशी ती शांत होते. शिवा रस्त्याच्या कडेला गाडी थांबवतो. दिप्ती पटकन डोळे पुसते.
"काय झालं?"- शिवा ने गाडी का थांबवली म्हणून दिप्ती आश्चर्याने विचारते.
शिवा बघतो म्हणून गाडी बाहेर येतो. गाडीचा समोरचा टायर पंक्चर झाला असतो..
" टायर पंक्चर झाला"- शिवा कारच्या खिडकीतून डोकावून दिप्ती ला म्हणतो.
"मग आता?"- दिप्ती थोड टेंशन मध्ये येऊन विचारते.
" मी बघतो डिक्की मध्ये स्टेफनी आहे का ते. तुम्ही आत बसा."- शिवा
शिवा डिक्की उघडून बघतो तर त्यात स्टेफनी नसते.
" नाही आहे, मी दुसरी गाडी बोलवतो.. डोन्ट वरी.."- शिवा फोन लावत म्हणतो.
रस्ता तसा रहदारीचा असल्याने पुष्कळ गाड्या येत जात असतात. आणि काही दुकाने, हॉटेल्स पण सुरू असतात.
शिवा थोड्यावेळ बोलून फोन ठेवून देतो..
"दुसरी गाडी येत पर्यंत आपण कॉफी घेवूया? जर तुम्हाला काही हरकत नसेल तर आणि तुम्हाला भूक पण लागली असेल ना?"- शिवा ला भूक लागली असते पण तो तस बोलून दाखवत नाही.
" तुम्हाला लागली का भूक?"- दिप्ती त्याच्या मनातल ओळखून म्हणते.
शिवा फक्त हसत हो म्हणतो.
" घेणार ना कॉफी?"- दिप्ती हो म्हणेल ह्या आशेने शिवा तिच्या कडे बघून म्हणतो..
दिप्ती हसून हो म्हणते.
"चला कॉफी साठी तर हो म्हणाल्या." - शिवा आनंदी होऊन मनात म्हणतो.
दोघेही जवळच्याच कॅफे मध्ये जातात. छोटस पण सुंदर असते कॅफे. दिप्ती आर्मी युनिफॉर्म मध्ये असल्यामुळे कॅफेत असलेले सगळे तिलाच बघत असतात. दोघेही कोपऱ्यातल्या टेबल वर बसतात. शिवा वेटरला बोलवून ऑर्डर देतो आणि त्याच्या कानात काही तरी सांगतो.
वेटर ऑर्डर घेऊन निघून जातो. काही वेळ दोघेही शांत असतात.
दिप्ती विचार करत असते की "मी जेवढ यांच्यापासून लांब राहायचा प्रयत्न करते तेवढे हे माझ्या समोर येतात. काय करू मी बाप्पा?"
" छान गाता तुम्ही"- शिवा शांतता भंग करत म्हणतो.
"थँक्यु"- दिप्ती हसून उत्तर देते.
" एक विचारू? राग तर नाही ना येणार?"- दिप्ती थोड चाचरत म्हणते.
" आता ते तुम्ही काय विचारता यावर अवलंबून आहे."- शिवा हाताची घडी घालून म्हणतो.
" तुम्हाला माझ्या सोबत का मैत्री करावीशी वाटली? म्हणजे काही स्पेशल रिजन"- दिप्ती भीत भीत विचारते.
शिवा डोळे मोठे करुन तिच्या कडे पाहतो.
दिप्ती खाली मान टाकून विचार करते," कशाला विचारला हा प्रश्न? आता नक्की राग येणार यांना."
दिप्ती ला घाबरलेल बघून शिवा जोरात हसतो. दिप्ती आश्चर्याने त्याच्याकडे बघते.
" किती घाबरता तुम्ही. रिलॅक्स, राग नाही आला मला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झाल तर,तुम्ही मला टक्कर देणाऱ्या वाटल्या."- शिवा
तिला समजलं नाही अश्या नजरेने दिप्ती त्याच्या कडे बघते.
" म्हणजे, आतापर्यंत किती तरी मुलींनी माझ्यासोबत मैत्री करता यावी म्हणून काय काय नाही केलं. पण तुम्ही मात्र वेगळ्या वाटता त्या सगळ्यांपेक्षा. एवढा भाव तर मी पण नाही खाल्ला कधी. म्हणून म्हटलं मिळालं आहे आपल्या सारखं कोणीतरी तर करावी मैत्री."- शिवा सगळ एका दमात बोलून जातो.
दिप्ती फक्त शांतपणे ऐकत असते.
" तसे आणखी एक कारण आहे, मला माहित नाही तुम्हाला आवडेल की नाही ते.. पण तुम्हाला बघितल ना की छान वाटते मला.. म्हणजे प्रसन्न वाटते मनाला.."- शिवा बोलून तर देतो पण नंतर आपण हे काय बोललो म्हणून खाली मान टाकतो. दिप्ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते. तिला आपल्या कडे अस बघताना पाहून शिवा समोर म्हणतो.
" तुम्हाला वाईट तर नाही वाटल माझ्या बोलण्याच?"
दिप्ती मान हलवून नाही म्हणते. " आश्चर्य वाटल, तुम्ही जे काही आता बोलले त्याचं."
"का?"- शिवा
दिप्ती मान हलवून काही नाही म्हणते. शिवा पण तिला जास्त फोर्स करत नाही.
दिप्ती ला आश्चर्य याच वाटल होत की तिचा शिवा पण तिला हेच म्हणायचा नेहमी जे आता शिवा ने तिला म्हटल होत.
वेटर ऑर्डर घेऊन येतो आणि ट्रे टेबल वर ठेवून निघून जातो. शिवा एक कॉफी चा कप दिप्ती समोर ठेवतो आणि दुसरा स्वतः घेतो. दिप्ती मात्र तिच्याच विचारात असते. शिवा तिच्या समोर चुटकी वाजवून कप कडे इशारा करतो. तशी ती कप हातात घेते आणि थोड्यावेळ तशीच कॉफी कडे बघत असते. कॉफी वर फ्रेंड अस लिहिलेलं असते. दिप्ती एक नजर शिवा कडे बघते. शिवा सँडविच खात इकडे तिकडे बघत असतो पण त्याच लक्ष दिप्ती च्या प्रतिक्रियेवर असते. दिप्ती कॉफी घेऊ की नाही ह्याच विचारात असते.. तेव्हा त्यांच्या टेबल जवळून एक कपल मस्ती करत जात असते आणि चुकून दिप्ती ला त्या मुलाचा धक्का लागतो. वरवरची कॉफी टेबल वर पडते त्यामुळे त्यावर लिहिलेलं पण पुसल्या जाते.. तो मुलगा दिप्ती ला सॉरी म्हणून निघून जातो. दिप्ती इट्स ओके म्हणते.पण शिवा ला मात्र खूप राग येतो त्या मुलाचा. मनात दोन तीन शिव्या घालत कसाबसा स्वतःला सावरतो. त्याचा राग चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो. दिप्ती च्या लक्षात येत ते. तिला तर हसायला येत त्याची परिस्थिती पाहून. पण ती स्वतःवर कंट्रोल करते.
" दुसरी कॉफी मागवू का?"- शिवा चेहरा पाडून म्हणतो.
"नाही, असूद्या"- दिप्ती गोड हसून म्हणते..
बिच्चारा शिवा तसचं तोंड पाडून सँडविच संपवतो. त्याची तर इच्छाच होत नाही खायची पण दिप्ती ला कळू नये म्हणून तो चुपचाप खातो. बिल देऊन शिवा आणि दिप्ती कॅफे मध्येच बसतात गाडी ची वाट बघत.
थोड्यावेळाने ड्राइव्हर गाडी घेऊन येतो आणि शिवा ला फोन लावतो. शिवा आणि दिप्ती कॅफे बाहेर येतात. शिवा ड्राइव्हर ला पंक्चर गाडी दुरुस्त करायला सांगतो आणि ड्राइव्हर ने आणलेल्या गाडीने निघून जातो. मस्त गार वारा सुरू असतो बाहेर म्हणून शिवा काच खाली करतो. दिवसभर झालेल्या कामामुळे दिप्ती खूप थकलेली असते. थोड्याच वेळात तिचा डोळा लागतो आणि नकळत तीच डोकं शिवा च्या खांद्यावर पडते. शिवा आधी थोडा दचकतो पण दिप्ती ला अस शांत झोपलेलं बघून तो तिला उठवत नाही. त्याला तर वाटत असते की हा प्रवास संपूच नये. काही वेळाने गाडी वाड्याच्या आत येते. गाडी चा आवाज ऐकुन श्रुती पटकन बाहेर येते. तर तिला दिप्ती शिवाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली दिसते. शिवा तिला उठवू की नाही ह्याच विचारात असतो.
श्रुती गाडी जवळ येऊन म्हणते.." मज्जा आहे बाबा एका मुलाची."
शिवा रागात तिच्याकडे बघतो आणि डोळ्यांनीच इशारा करून दिप्ती ला उठव म्हणून सांगतो. श्रुती तिला उठवते. आपल डोकं शिवा च्या खांद्यावर बघून तिला कसतरी होते. ती फक्त सॉरी म्हणुन गाडी बाहेर येते. शिवा पार्किंग मध्ये गाडी घेऊन जातो. श्रुती दिप्ती ला डोळ्यांनीच इशारा करते.
" काय झालं?"- दिप्ती कळूनही न कळल्या सारखं दाखवते.
" काय होत हे?"- श्रुती तिला चिडवत बारीक डोळे करून म्हणते.
" काय होत म्हणजे? झोप लागली होती मला बाकी काही नाही. काहीही विचार नको करत जाऊ. मी जाते झोपायला, खूप थकले आज..गुड नाईट"- दिप्ती अस म्हणून रूम कडे निघून जाते.
"कुठ पर्यंत पळणार आहे तू दिप्ती. यायचं तर तुला इथेच आहे. माझ्या घरी माझी वहिनी बनून"- श्रुती दिप्ती जाते त्या दिशेने बघत म्हणते..
.....
क्रमशः