किती सांगायचंय तुला - ९ प्रियंका अरविंद मानमोडे द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

किती सांगायचंय तुला - ९


शिवा त्याच्या वागण्यावर स्वतःलाच कोसत असतो. थोड तरी भान ठेवायचं ना शिवा, त्या लाहनशी वर राग काढून काही मिळणार होत का तुला. आणि त्यात दिप्ती ने सगळ बघितल. आता काही खर नाही आपल. अस तो स्वतःशीच बडबडतो.
दिप्ती आदिश्री ला घेऊन गार्डन मध्ये बसलेली असते.
आदिश्री च रडगाण सुरूच असत.
" बस ना बाळा, किती रडणार आहेस आणखी? डोळे बघ तुझे लाल झालेत रडून रडून"- दिप्ती तिला शांत करत म्हणते.
" काका मला ह्या आधी कधीच असा ओरडला नाही. माझ्यामुळे राग आला ना त्याला. मी नाही बोलणार त्याच्याशी पुन्हा"- आदिश्री मुसमुसत म्हणते.
" ठीक आहे, मग मी पण नाही बोलणार त्यांच्याशी"- दिप्ती
" तू का नाही बोलणार? तुला थोड रागवला तो."- आदिश्री
" पण माझ्या गोड मैत्रिणीला तर रागवलेत ना. म्हणून मी पण कट्टी त्यांच्यासोबत"- दिप्ती रुसल्याच सोंग घेवून म्हणते.
" तू खरचं कट्टी करणार काका सोबत?"- आदिश्री
" मग नाही तर काय, किती वाईट आहेत ना ते. अस रागवतात का कुणाला? मला नाही आवडलं तुला त्यांनी अस रागावल ते. मला तर वाटतं मैत्रीचं तोडावी त्यांच्याशी"- दिप्ती आदिश्री च्या मनाचा वेध घेत म्हणते.
" नको नको अस नको ना करू. कधी कधी जास्त राग येतो त्याला. पण तसा छान आहे तो."- आदिश्री लाडीकपणे म्हणते.
दिप्ती तीच बोलण ऐकुन गालातच हसते.
" त्याला काम असत ना खूप म्हणून नाही म्हटलं त्याने मला पार्क मध्ये घेऊन जायला." - आदिश्री शिवा ची बाजू घेत म्हणते.
" मग तुला राग नाही आला का त्यांचा?"- दिप्ती
" थोडा आला, पण तो येईल मला मनवायला. बघ तू"- आदिश्री
दिप्ती ला तिच्या समंजसपणा बघून दिप्ती ला तीच नवल वाटते. एवढीशी ही आणि इतकं समज असा मनात विचार करते.
"त्यांना काम करू देत त्यांचं. सायंकाळी आपण जाऊ पार्क मध्ये. मी घेऊन जाईल तुला,ओके"- दिप्ती तिचा मूड ठीक करण्यासाठी म्हणते.
"खरचं?तू घेऊन जाणार मला"- आदिश्री आनंदी होऊन म्हणते.
दिप्ती हसून मान हलवून हो म्हणते तशी आदिश्री तिला मिठी मारते.
" चला पळा आता, मला ऑफिस ला जायचं आहे ना"- दिप्ती
आदिश्री तिच्या पासून दूर होते आणि धावत आत जाते.
दिप्ती गाडीची वाट बघत असते. शिवा तिला हाक मारतो तशी ती मागे वळून बघते.
" दिप्ती, आय एम सॉरी.."- शिवा तिच्या जवळ येऊन म्हणतो.
" पण कशासाठी?"- दिप्ती
" ते मी आदिश्री ला ओरडलो ना"- शिवा खाली मान घालुन म्हणतो.
" मग मला कशाला सॉरी म्हणताय. जिच्यावर ओरडला तिला म्हणा"- दिप्ती
" हो पण, अस ओरडायला नको होत मी तिच्यावर. पण राग आला की मला स्वतःवर कंट्रोल नाही ठेवता येत. त्यात आज मी पहिल्यांदा तिच्यावर हात उचलला आणि ते तुम्ही बघितल. काय विचार करत असणार तुम्ही माझ्याबद्दल म्हणून जे वागलो त्यासाठी सॉरी."- शिवा
" होत असं कामाचं टेन्शन आलं की, इट्स ओके. आणि मला काही वाटल नाही तुमच्याबद्दल. अस काहीही मनात आणू नका."- दिप्ती हसत म्हणते.
"थँक्यू सो मच, मला समजून घेतल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा सॉरी"- शिवा
"तस पण मला कुणीतरी म्हटल होत की दोस्ती मे नो सॉरी नो थँक्यु. बहुतेक आता तेच विसरले वाटत."- दिप्ती
तिच्या बोलण्यावर शिवा हसतो. त्याला अस हसताना बघून दिप्ती च्या चेहऱ्यावर नकळत हसू पसरते. शिवा तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत असतो. त्याची तंद्रि मोडते ती दिप्ती च्या ऑफिस ची गाडी हॉर्न वाजवत असते. दिप्ती त्याला बाय करून निघते शिवा तिला बाय म्हणून तिथेच उभा असतो. दिप्ती मागे वळून बघते आणि हसून म्हणते, " मिस्टर दिक्षित, प्रेमाने समजवलं तर समजून घेईल ती. जाऊन बोला तिच्याशी" दिप्ती आदिश्री बद्दल बोलून गाडी च्या दिशेने वळते.
शिवा गोड हसून हो म्हणत मान हलवतो. दिप्ती गाडीत बसून निघून जाते.
" मी का असा सारखं सारखं त्यांच्यात हरवतो? शिवा साहेब, याच उत्तर नंतर शोधू आधी जे करून ठेवलं आहे ते निस्तारायला हवं"- शिवा स्वतःशीच पुटपुटतो आणि आदिश्री कडे जातो.
आदिश्री तिच्या रूम मध्ये बाहुली सोबत खेळत असते आणि मयुरी तिच्या जवळ बसून तीच काम करत असते.
" वहिनी आत येऊ शकतो का मी?"- शिवा दरवाज्यावर नॉक करत विचारतो.
" अहो शिवा दादा, या ना आता. अस का विचारताय?"- मयुरी बेड वरून खाली उतरत म्हणते. शिवा रूमच्या आत येतो आणि आदिश्री कडे बघून म्हणतो,
" कुणीतरी खुप रूसल आहे माझ्यामुळे."
मयुरी इशाऱ्याणेचं काय झालं म्हणून विचारते. शिवा गाल फुगवून आदिश्री कडे बघतो.
मयुरी हसत" चालू द्या तुमचं" अस म्हणून रूम बाहेर जाते.
शिवा आदिश्री च्या बाजूला येऊन बसतो. तशी आदिश्री त्याच्याकडे पाठ करून बसते.
" अरे बापरे, एवढा राग. काय झालं माझ्या पिल्लुला?"- शिवा तिला लाडीगोडी लावत म्हणतो.
ती काहीच बोलत नाही. आपल्या बाहुली सोबत खेळत असते. शिवा तिला अलगद उचलून स्वतःकडे वळवत म्हणतो.
" सॉरी ना आदु , माफ कर मला प्लीज. चूक झाली माझ्याकडून. पण तुला माहिती आहे ना मला खूप काम आहे सध्या. तू अशी गप्प बसलेली आवडत नाही मला. बोल ना काही पिल्लू"- शिवा लहान चेहरा करून म्हणतो.
आदिश्री त्याच्याकडे बघते.
" तू जे म्हणशील ते करायला तयार आहे मी. पण प्लीज बोल माझ्याशी"- शिवा तिच्या समोर उठाबशा काढत म्हणतो.
त्याला अस बघून आदिश्री हसते.
"मी जे म्हणेल ते करावं लागेल बर तुला"- आदिश्री
" हो, तू जे म्हणशील ते करणार मी"- शिवा तिच्या समोर हात जोडून म्हणतो.
" बर, मग आज लवकर ये आणि मला पार्क मध्ये घेऊन चल"- आदिश्री
" आज?"- शिवा थोड गोंधळून म्हणतो.
त्याच्या बोलण्याने आदिश्री चा चेहरा आणखी उतरतो. तिला अस बघून शिवा विचार करून म्हणतो.
" ठीक आहे, आज जाऊ पार्क मध्ये. खुश... "
शिवा ने हो म्हटल्याबरोबर आडिश्री खूप आनंदी होते.
" तुला माहित आहे आपल्या सोबत दिप्ती आंटी पण येणार पार्क मध्ये"- आदिश्री खुश होऊन म्हणते.
दिप्ती च नाव ऐकताच शिवा ला एक अनामिक आनंद झाला होता पण त्यालाच कळत नव्हतं की अस का होत आहे ते.
" तुला कुणी सांगितल की त्या पण येणार आपल्या सोबत?"- शिवा आदिश्री ला जवळ घेऊन विचारतो.
" तिनेच म्हटलं मला की पार्क मध्ये घेऊन जाणार आज"- आदिश्री
"ठीक आहे मग, आज जाएंगे पार्क में. ओके"- शिवा तिला घट्ट मिठी मारून म्हणतो.
आदिश्री हसत हो म्हणून मान हलवते. शिवा तिला खाली ठेवतो आणि तिच्या कपाळावर किस करून ऑफिस ला निघतो.
दुपारची वेळ असते. शिवा त्याच्या केबिन मध्ये बसून काम करत असतो तेव्हा त्याचा फोन वाजतो.
" हॅलो बाबा, पोहचले का तुम्ही साताऱ्याला?"- शिवा
" हो, पोहचलो."- सयाजी राव
" आत्या कशी आहे आता?"- शिवा
" ठीक आहे ती. म्हणजे पूर्वीपेक्षा बरी आहे."- सयाजी राव
" काही लागलं तर सांगा आणि काळजी करण्यासारखं तर काही नाही ना?"- शिवा
" तेच बोलायचं होत तुझ्यासोबत."- सयाजीराव थोड काळजी च्या सुरात म्हणतात
" काय झालं बाबा सगळ ठीक आहे ना तिथे?"- शिवा घाबरून विचारतो.
" सगळ ठीक आहे. माधुरी पण व्यवस्थित आहे. ICU मधून बाहेर आणलं आहे तिला. मला हे सांगायचं होत तुला की, तिला खूप पच्याताप होत आहे तिच्या वागण्याचा. इथे आलो तेव्हा पासून किती तरी वेळा माफी मागून झाली आहे तिची. आणि आदित्य पण खूप बदलला रे आता. माधुरी ला बोलायचं होत तुझ्यासोबत. तुझी पण माफी मागायची आहे अस म्हणत होती ती. एकदा बोल तिच्याशी. बर वाटेल तिला"- सयाजी राव
शिवा थोड्यावेळ विचार करून उत्तर देतो, " बाबा मला वेळ हवाय थोडा. मी कळवतो तुम्हाला नंतर." - अस म्हणून शिवा फोन ठेवून देतो.
त्याला पण वाटत होत की तिच्याशी बोलावं पण पुन्हा तो प्रसंग आठवला की त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती. तिच्यामुळे बाबांना हार्ट अटॅक आला होता. तेव्हा जर त्यांना काही झालं असत तर. हाच विचार त्याच्या मनात गोंधळ घालत होता.पण तो स्वतःला सावरत पुन्हा आपल्या कामात मन रमवण्याचा प्रयत्न करतो. त्याच काही कामात लक्ष लागत नाही. असच करता करता संध्याकाळ झाली आणि आदिश्रीला पार्क मध्ये घेऊन जायचं होतं म्हणून शिवा लवकर ऑफिस मधून घरी जातो. आज दिप्ती ला जास्त काम नसल्यामुळे ती पण लवकर आली होती. इकडे आदिश्री काका कधीपण येईल म्हणून तयार होऊन बसली असते. दिप्ती पण तयार होऊन तिच्या जवळ येऊन बसते.
शिवाच्या गाडीचा आवाज ऐकू येताच आदिश्री बाहेर पळत सुटते.
शिवा गाडी लावून बाहेर येतो. आदिश्री ला अस वेळेआधीच तयार बघून त्याला तिच्यावर खूप हसायला येत.
" कधी पासून तयार होऊन बसल्या होत्या मॅडम तुम्ही?"- शिवा
" आपल्याला उशीर व्हायला नको ना म्हणून लवकर रेडी झाले मी"- आदिश्री
" अस का? थांब थोड्यावेळ मी पण येतो रेडी होऊन लगेच" - अस म्हणून शिवा तिला घेऊन हॉल मध्ये येतो. श्रुती आणि काव्या पण हॉल मध्ये बसलेल्या असतात.
दिप्ती सोफ्यावर बसून मॅगझिन वाचत असते. चोरून एक नजर तिच्यावर टाकून शिवा रूम कडे जातो आणि थोड्यावेळात तयार होऊन येतो. आज शिवा नेहमी प्रमाणे फॉर्मल ड्रेस न घालता कॅसुअल लूक मध्ये होता. ब्लॅक जीन्स त्यावर ब्ल्यू कलरची टीशर्ट बाजुंपासून फोल्ड केलेली. त्यामुळे त्याचं पिळदार शरीरयष्टी स्पष्ट दिसत होती. त्याला बघून श्रुती शिट्टी वाजवून म्हणते.
"ओहो... आज कुणीतरी खुप जास्त हॅण्डसम दिसत आहे. नजर ना लग जाए. दादा आज मुलींचं काही खरं नाही बघ.तुला अस बघितल्यावर एक तर त्या तुझ्यासाठी स्वतः जीव देतील नाही तर एकमेकींचा जीव घेतील"
दिप्ती मात्र त्याच्या कडे एक नजर बघते आणि पटकन मान खाली टाकते. स्वतःची स्तुती ऐकुन शिवा गोड हसतो आणि श्रुती च्या डोक्यावर एक टपली मारून म्हणतो " झाला ड्रामा,निघायचं का आता."
श्रुती डोकं चोळत हो म्हणून मान हलवते. काव्या, दिप्ती आणि आदिश्री पुढे निघतात. शिवा आणि श्रुती त्यांच्या मागे चालत असतात. श्रुती त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणते " ब्ल्यू कलर दिप्ती चा फेवरेट आहे बर का " अस बोलून त्याच्या पुढे निघते आणि मागे वळून त्याच्या कडे बघते. तो गालातल्या गालात हसत असतो. सगळे गाडी जवळ येतात. काव्या आणि आदिश्री मागच्या सीट वर बसतात. दिप्ती गाडीचे मागचे दार उघडणार तेवढ्यात श्रुती तिच्या समोर येते आणि मागच्या सिट वर बसते.
" तू समोर बस मी इथे बसणार. हा खूप फास्ट चालवतो गाडी. मला भीती वाटते ह्याच्या सोबत समोर बसायला."- दिप्ती शिवाच्या शेजारी बसावी म्हणून श्रुती थाप मारते.
दिप्ती इशाऱ्याने तिला नाही म्हणते. श्रुती तिच्याकडे बघून ही न बघितलेल्या सारखं करते. नाईलाजाने दिप्ती समोर जाऊन बसते. शिवा गाडी सुरू करतो. थोड्याच वेळात सगळे जवळच्याच पार्क मध्ये पोहचतात. गाडीतून खाली उतरल्या बरोबर आदिश्री पार्क च्या आत धावत जाते. काव्या, दिप्ती आणि श्रुती पण तिच्या मागे जातात. शिवा गाडी पार्क करायला जातो. आदिश्री तिथे असलेल्या लहान मुलांसोबत खेळण्यात रमुन जाते. श्रुती आणि काव्या तिच्याकडे लक्ष देत असतात. दीप्ती मात्र एका बाकावर बसून तिला अस खेळताना बघत असते. थोड्यावेळाने शिवा तिच्या जवळ येऊन बसतो. दिप्ती त्याच्या कडे बघते पण त्याच लक्ष मात्र कुठेच लागत नाही. तो सतत मोबाईल हातात घेऊन कुणाला तरी कॉल करतो आणि लगेच कट करत असतो. त्याला अस बघून न राहवून दिप्ती म्हणते.
" एकदा बोलून घ्या त्यांच्याशी. त्यांनाही बर वाटेल आणि तुम्हाला ही"
शिवा तिच्याकडे चकित होऊन बघतो. त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून दिप्ती म्हणते," श्रुती ने सांगितल मला सगळ. मला माहित आहे हा तुमचा फॅमिली इश्यू आहे . मला यात पडायला नको. पण माझ्या वयक्तिक अनुभवावरून सांगते, आपली व्यक्ती समोर असताना सगळ क्लिअर केलेलं चांगलं असत. ती दूर गेल्यावर रडत बसण्यात काहीच अर्थ नसतो. आणि चुका तर सगळेच करतात. आपल्या चुका सुधारण्यासाठी देव जर आपल्याला एक संधी देतो मग आपण तर मनुष्य आहोत. आपण पण ती संधी द्यायला हवी ना. माफ करा मी जर जास्त बोलले अस तुम्हाला वाटत असेल तर. पण वेळ निघून गेल्यावर पच्यातप करण्यात काही उपयोग नाही. म्हणून म्हणतेय, एकदा बोला तुमच्या आत्याशी"
शिवा शांतपणे तीच बोलण ऐकुन घेतो आणि लगेच उठून तिच्या पासून थोडा दूर जातो. सयाजी रावांना फोन लावून आत्याला फोन द्यायला सांगतो. सयाजी राव आनंदी होऊन तिच्याजवळ फोन नेऊन देतात. शिवा थोडा वेळ त्यांच्याशी बोलून फोन ठेवतो आणि दिप्ती जवळ येऊन बसतो.
" किती सहज सगळे प्रश्न सोडवता तुम्ही."- शिवा
दिप्ती फक्त हसते. तिला अस शांत बघून शिवा म्हणतो.
" तुम्हाला एक विचारू?"
दिप्ती मान हलवून हो म्हणते.
" तुम्हाला राग नाही येत का कधी? म्हणजे मी इतक्या दिवसात एकदा पण तुम्हाला राग आलेला नाही बघितल"- शिवा
" आता नाही येत"- दिप्ती कोड्यात बोलते.
"पण का?"- शिवा उत्सुकतेने विचारतो.
" राग आल्यावर तो घालवायला आता माझ्या आयुष्यात आपल अस कुणी नाही आहे"- दिप्ती पुन्हा एकदा कोड्यात बोलल्यासारखी म्हणते.
" तुम्ही नेहमी अस कोड्यात का बोलता. म्हणजे कधी कधी मला कळतच नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे . पण मी काहीही न बोलता तुम्ही कस काय ओळखता की मला काय म्हणायचं आहे ते?"- शिवा
दिप्ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणते, " कभी कभी लफ़्ज़ों में कहीं बात समझ नहीं आती,
तो कभी कभी आंखों से दिल की बात पता चल जाती हैं"
शिवा तिच्या कडे एकटक बघत असतो.
" काय झालं, मी काही चुकीचं बोलले का?"- दिप्ती
" अरे बापरे! हे पण जमत का तुम्हाला. मी तर फॅन झालो तुमचा"- शिवा गोड हसून म्हणतो..
दिप्ती लाजून दुसरीकडे बघते.
" आणखी एक विचारू? "- शिवा
" विचारा."- दिप्ती त्याच्याकडे पाहून म्हणते.
" जर तुम्हाला कधी राग आलाच तर तुम्ही काय करता?"- शिवा
" हा प्रश्न मला श्रुती नेही विचारला होता आम्ही कॉलेज मध्ये असताना. तर मी तिला हेच म्हटल होत की जेव्हा केव्हा तुला राग येतो तेव्हा डोळे मिटून अश्या व्यक्तीचा चेहरा आठवायचा ज्याने तुला आनंद मिळतो. जिच्यावर तू जीवापाड प्रेम करते. तेव्हा माहिती आहे ती कुणाचा चेहरा आठवायची?"- दिप्ती
शिवा कुणाचा चेहरा म्हणून विचारतो.
त्यावर दिप्ती हसत उत्तर देते," तुमचा"
"त्यात हसण्यासारख काय आहे, आहेच मी तिची जान. सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करते ती"- शिवा तिला अस हसताना बघून म्हणतो.
"म्हणजे मला तेव्हा काही नाही वाटल त्याच. पण तुम्हाला प्रत्यक्षात भेटल्यानंतर नवल वाटत आहे की श्रुती तिचा राग शांत करण्यासाठी अश्या व्यक्तीचा चेहरा आठवायची ज्यांना तिच्या पेक्षा पण जास्त राग येतो."
तीच बोलण ऐकुन शिवा रागात तिच्याकडे बघतो. दिप्ती थोडी घाबरते. तिला अस बघून तो जोरात हसतो. त्याच्या अश्या हसण्यावर तीपण हसायला लागते.
श्रुती दुरूनच दोघांनाही बघत असते. तिला छान वाटत त्या दोघांनाही अस सोबत बोलत असलेलं. किती तरी वेळ शिवा आणि दिप्ती बोलत असतात. तो तिला त्याच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल सांगत असतो तर दिप्ती तिच्या कामाबद्दल बोलत असते. इकडे आदिश्री मनसोक्त खेळून दमते. श्रुती आणि काव्या तिला घेऊन दोघांजवळ येतात.
" काका, मला खूप भूक लागली आहे. आपण काहीतरी खाऊया ना"- आदिश्री लाडीकपणे म्हणते.
सगळे पार्कच्या बाहेर येतात. शिवा पार्किंग मघुन गाडी सरळ एका हॉटेल कडे वळवतो. थोड्यावेळाने गाडी एका मोठ्या आणि महागड्या हॉटेल समोर येऊन थांबते. हॉटेल च्या पोर्च वर मोठ्या अक्षरात मराठी मध्ये "आदिश्री " अस लिहिलेलं बघून दिप्ती ला थोड आश्चर्य वाटते.
शिवा तिच्या जवळ येऊन म्हणतो," आपलच आहे. चालायचं आत. तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवतो."
दिप्ती हसून हो म्हणते. सगळे आत जातात.दिप्ती तर तो नजारा बघून जागेवरच थांबते. बाकी सगळे तिच्या पुढे निघतात. ही मात्र तो नजारा बघण्यात मग्न होऊन जाते. तिने ह्या आधी कधी अस महागडं हॉटेल बघितले नव्हते. आत मध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला मॉर्डन पद्धतीचे रिसेप्शन. चारही दिशांना कोपाऱ्यामधे आणि एकदम मधोमध बसण्यासाठी आकर्षक असे सोफासेट. त्याच्या अगदी वर काचेचे भलेमोठे झुंबर. काही लोक सोफ्यावर बसून तर काही वेटर त्यांना हवं नको ते बघत होते. सगळीकडे रोषणाई आणि दिव्यांचा झगमगाट. ते दृश्य बघून दिप्ती च्या डोळ्यात वेगळीच चमक येते. शिवा तिला तिच्या बाजूला उभा राहून बघत असतो. ह्या सगळ्यांमध्ये दिप्ती च लक्ष जात ते तिथे असलेल्या पाण्याच्या लहानशा तळ्याकडे. दिप्ती त्याच्या जवळ जाऊन बघते. त्यात विविध रंगांचे कमळ असतात. ती एका कमळाला हातात घेते. शिवा पण तिच्या मागे जातो
" कस वाटल हॉटेल?"
" खूप सुंदर. अस वाटत आहे की हे खरं नसून फक्त एक स्वप्न आहे."- दिप्ती कमळाला गोंजारत म्हणते.
आपल्याला कुणी अस विचारल म्हणून मागे वळून बघते. शिवा तिच्या मागेच उभा असल्याने तिला हलायला जागाच नसल्यामुळे तिच्या चेहरा सरळ त्याच्या छातीवर जाऊन आदळतो आणि ओठ त्याच्या छातीवर लागतात. तिच्या ओठांचा स्पर्श होताच शिवाच्या संपूर्ण शरीरात रोमांच उभे राहतात. दिप्ती लगेच मागे सरकते पण मागे तळे असल्यामुळे तिला हलता येत नाही आणि तिचा तोल जातो तसा शिवा तिला कमरेला दोन्ही हातांनी पकडून स्वतःकडे खेचतो. दिप्ती त्याच्याकडे एकटक बघत असते. तिला आपल्याकडे अस बघताना पाहून शिवा गाण म्हणतो.

" ऐसे ना मुझे तुम देखो, सीनेसे लगा लूंगा.
तुमको मै चुरा लूंगा तुमसे दिल में छुपा लूंगा"

"काय?"- दिप्ती चकित होऊन विचारते.
शिवा हसत म्हणतो," गंमत करत होतो बाकी काही नाही." दिप्ती स्वतःला त्याच्या पासून दूर करत म्हणते," चला जाऊया आपण. सगळे वाट बघत असतील."
शिवा समोर चालत असतो आणि दिप्ती मान खाली घालून त्याच्या मागे जाते.
" कुठे होतात तुम्ही?"- श्रुती
" ह्यांना हॉटेल दाखवत होतो आपल."- शिवा
" मग कस वाटल दिप्ती"- काव्या
" खूप सुंदर आहे."- दिप्ती
" मला खूप भूक लागली आहे. चला ना लवकर"- आदिश्री रडक्या स्वरात म्हणते. तिच्या बोलण्यावर सगळे हसतात.
सगळे प्रायव्हेट सेक्शन मध्ये एका टेबल वर बसतात. श्रुती मुद्दाम दिप्ती ला शिवा च्या बाजूला बसवते. शिवा ऑर्डर देतो. ऑर्डर येत पर्यंत श्रुती आणि काव्याची बडबड सुरु असते पण दिप्ती मात्र खाली मान टाकून बसलेली असते.
" दिप्ती काय झालं तू अशी शांत का बसली आहे. बोल काहीतरी."- काव्या तिला अस शांत बसलेलं बघून म्हणते.
" काही नाही, असच"- दिप्ती
शिवा ला कळून येत की दिप्ती का शांत आहे ते. तो काही बोलणार तेवढ्यात वेटर ऑर्डर घेऊन येतो. सगळ्यापुढे कॉफी आणि खायचं ठेवून निघून जातो. दिप्ती कप हातात घेते आणि बघते तर त्यावर त्यादिवशी सारखं फ्रेंड अस लिहिलेलं असतं. तिला कॅफे मधला त्या दिवशीचा प्रसंग आठवतो. शिवा च पूर्ण लक्ष तिच्याकडेच असते.
तिला अस शांत बघून त्याला राहवत नाही. तो तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणतो, " मी खरचं गंमत केली. एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्यात तुमचा काही दोष नाही. ती वेळच तशी होती. जर तुम्ही कंफर्टेबल नाही माझ्या मैत्रीत तर मी तुम्हाला फोर्स नाही करणार. आफ्टर ऑल थिस इस यूर लाइफ.. तूम्ही काय तो निर्णय घेऊ शकता."
दिप्ती एक नजर त्याच्या कडे बघते आणि कप ओठाला लावते. शिवा जे समजायचं ते समजून जातो.
दिप्ती हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या कडे पाहत म्हणते" दोस्ती की है तो निभानी तो पडेंगी."
त्यावर शिवा गोड हसतो आणि डोळ्यांनीच हो म्हणून इशारा करतो.

................
क्रमशः