किती सांगायचंय तुला - १० प्रियंका अरविंद मानमोडे द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किती सांगायचंय तुला - १०

कामामध्ये शिवा आणि दिप्ती दोघांचेही चार पाच दिवस असेच निघून जातात. बाप्पा पण त्यांच्या गावाला परतले असतात. एवढ्या दिवसात दिप्ती आणि शिवाची मैत्री आणखीच घट्ट झाली होती. दिप्ती ला तर कळले नाही हे पंधरा दिवस कसे भराभर निघून गेले ते. तीच काम पण पूर्ण झालं होत. पण सयाजी रावांना वचन दिल्यामुळे तिला श्रुती ने सयाजीराव साताऱ्याहून परत येई पर्यंत थांबवून ठेवलं होतं.
एवढ्या दिवसांपासून शिवा टेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता आज तो दिवस उजाडला.
आजचा दिवस शिवासाठी खूप महत्त्वाचा होता. एवढ्या दिवसांच्या मेहनतीचं फळ त्याला आज मिळणार होत, जर ती डील त्याला मिळाली तर. कारण तो एकटा त्यासाठी मेहनत करत नव्हता तर त्याच्या कंपनी सारख्या किती तरी कंपनीने ही डील आपल्याला मिळावी म्हणून मेहनत घेतली होती. सकाळपासूनच दिक्षित वाड्यात घाई सुरू होती. अशोक राव, श्रीकांत आणि शिवा तिघेही जाम टेन्शन मध्ये होते. कोणीही धड नाश्ता पण केला नव्हता. त्यांना अस बघून बाकीच्यांना पण टेन्शन आलं होतं. अशोक राव दोघांनाही सूचना देत होते. सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स घेतले का, प्रेझेंटेशन चेक कर बाकीचे सगळे फिर्मालिटी चे पण कागदपत्र बघ अस त्यांचं वारंवार सांगणं सुरूच होत. इकडे घरातील महिला वर्ग एका ठिकाणी बसून त्यांचा गोंधळ बघत होत्या.
" बोर्ड चा रिझल्ट असल्यासारखे का करताय हे?" श्रुती ने न राहवून म्हटलेच.
" श्रुते गप्प बस. दिसत नाही का आज किती महत्वाचा दिवस आहे त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी पण. ते जर यशस्वी झाले तर तुला पण आनंदच होईल की नाही. कुठेही मस्करी करत असते "- मयुरी थोड तिला रागवत म्हणते.
श्रुती लहान चेहरा करून मान हलवून हो म्हणते. सगळ व्यवस्थित बघून झाल्यावर तिघेही कामगिरी फत्ते करण्यासाठी तयार होतात. मयुरी शिवा च औक्षवण करते आणि तिघांच्याही हातावर दही साखर देऊन शुभेच्छा देते . श्रुती आणि काव्या पण त्यांना शुभेच्छा देतात. शिवा एकदा दिप्ती कडे बघतो. दिप्ती गोड हसून डोळ्यांनीच "all the best" म्हणते. शिवा पण हसून थँक्यु म्हणतो.
तिघेही जाण्यासाठी बाहेर येतात. त्यांना बाय करून महिला मंडळ आत येतात.
मयुरी दिप्ती आणि श्रुती ला म्हणते," मी आणि काव्या आदिश्री च्या शाळेत जात आहोत. तिच्या शाळेत parents teacher meeting आहे. श्रीकांत नाही आहे आज म्हणून मी आणि काव्या जाणार आहोत. तुम्ही दोघी घरीच आहात ना? म्हणजे कुठे जायचं प्लॅन तर नाही? माझ्यामुळे तुमचा प्लॅन फिस्कटायला नको. कारण मला गाडी लागेल. जर कुठे जायचं असेल तर मी आणि काव्या तुम्हाला ड्रॉप करू आणि नंतर आम्ही जाऊ"
" नाही वहिनी आम्ही कुठे जाणार आता. तसही खूप दिवसानंतर ही फ्री भेटली आहे आज. हिच्या कामामुळे वेळच नाही मिळाला मनसोक्त बोलायला. सो आम्ही घरीच राहून गप्पा मारणार आहोत. तुम्ही बिनधास्त जा"- श्रुती मयुरी ला म्हणते.
" ओके, आम्ही निघतो थोड्यावेळात.चला बाय"- अस म्हणून मयुरी तिच्या रूम मध्ये आवरायला निघून जाते.
दिप्ती आणि श्रुती पण श्रुती च्या रुममध्ये येतात. दोघी पण कॉलेज च्या आठवणी ताज्या करत हसत असतात. दिप्ती ला अस मनातून हसताना बघून श्रुती तिच्याकडे समाधानाने एकटक बघत असते.
" अशी का बघत आहेस? "- दिप्ती
" किती दिवसानंतर तुला अस हसताना बघत आहे मी. इथे आली तेव्हा कशी होती तू. शांत, आपल्याच विचारात मग्न. आणि आता सगळ्यांची लाडकी झाली आहे घरात. आजकाल जास्तच आनंदी आहेत मॅडम. आखिर बात क्या है ?"- दिप्ती मिश्कीलपणे विचारते.
" काहीच तर नाही. नेहमीच अशी असते मी आनंदी. फक्त तुला दिसत नाही ते. खूप काळजी करते ना तू माझी मग कस दिसणार तुला. आणि अस हसायचं म्हणशील तर किती दिवसांनी अस बोलत आहोत ना आपण."- दिप्ती तिच्या हातावर हात ठेवत म्हणते.
" खरचं हेच कारण आहे की आणखी काही?"- श्रुती तिच्या मनातल जाणून घ्यायच्या उद्देशाने म्हणते.
" म्हणजे, आणखी काय असणार आहे?"- दिप्ती
" इकडे आल्यावर नवीन फ्रेंड्स मिळाले ना तुला. त्यांच्या सहवासात चांगलीच रुळली. खूप लळा लागला आहे त्या फ्रेंड चा. म्हणून म्हटल"- श्रुती
" काहीपण विचार करू नको. ते फक्त फ्रेंड आहे माझे"- दिप्ती
" मी आदिश्री बद्दल बोलत आहे. तुला कोण वाटल?"- श्रुती तिची मज्जा घेत म्हणते.
" मी पण आदिश्री बद्दल बोलत होते."- दिप्ती नजर चुकवत म्हणते.
" खरचं?"- श्रुती गालातल्या गालात हसत म्हणते.
" काय चाललंय तुझ? खर तेच सांगतेय मी. वहिनी बरोबर म्हणतात, नको त्या वेळेला नको ते विचार करत असते तू"- दिप्ती तिच्या पाठीवर एक धपाटा घालून म्हणते.
श्रुती उशी ने दिप्ती ला मारते. दिप्ती पण तिला पलटून मारते. काहीवेळ दोघींची मस्ती सुरू असते. तेवढ्यात श्रुती चा फोन वाजतो. ती मोबाईल कडे बघते तर शिवाचा कॉल असतो.
" हॅलो बोल"- श्रुती
" एक काम कर, माझ्या रूम च्या स्टडी टेबल वर एक ग्रीन कलरची फाईल आहे. ती घे आणि मी सांगतो त्या अॅड्रेस वर पोहोच लगेच. एका तासाच्या आत मला फाईल हवी आहे. नाही पोहोचली इथपर्यंत तर खूप मोठा प्रोब्लेम होईल. प्लीज श्रुती एवढं कर माझ्यासाठी"- शिवा थोड टेन्शन मध्ये असतो.
" काय झालं ते सांगशील का आधी?"- श्रुती त्याला काळजीने विचारते.
" नंतर सांगतो. आधी जे सांगितल ते कर "- अस म्हणून शिवा फोन कट करतो.
" काय झालं?"- दिप्ती
श्रुती तिला शिवा फोन वर काय बोलला ते सांगते आणि धावत शिवाच्या रूम कडे जाते. दिप्ती पण तिच्या मागे जाते. श्रुती टेबल वरची फाईल हातात घेते आणि दिप्ती ला घरी थांबायला सांगून रूम बाहेर जाणारच असते तर लगेच तिच्या लक्षात येत की गाडी तर मयुरी वहिनी घेऊन गेली मग मी कस जाणार. इतक्या लवकर कॅब पण मिळणार नाही.
" काय करू दिप्ती मी. कशी पोहचणार वेळेच्या आत. दादा च्या बोलण्यावरून तर वाटत होत की नक्की काही तरी सिरियस आहे. खूप मेहनत केली आहे ग त्याने ह्या प्रोजेक्ट साठी. थोड्या चुकीमुळे वाया नको जायला."- श्रुती जवळ जवळ रडवेल्या स्वरात म्हणते.
दिप्ती तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला समजावते. फाईल पोहचवायची कशी याचा विचार करत असते तेव्हा तिची नजर टेबल वर ठेवलेल्या हेल्मेट वर जाते. ती जाऊन हेल्मेट हातात घेते आणि श्रुती ला विचारते," हे कोणाचं आहे?"
श्रुती डोळे पुसत उत्तर देते, " दादाचं आहे, पण ह्याच काय?"
" बाईक आहे घरी?' - दिप्ती
" हो , पण मला कुठे बाईक चालवता येते"- श्रुती
" मला येते ना. मी नेऊन देते फाईल, वेळेच्या आत"- दिप्ती हसत म्हणते.
" तू कधी शिकली? आणि जर बाईक ने गेली तर दादा चिडेल तुझ्यावर. त्याला त्याच्या बाईक ला कुणीही हात लावलेलं आवडत नाही"- श्रुती
" ते मी बघून घेईल. तू चाबी ते आधी."- दिप्ती हात पुढे करून म्हणते.
" अग पण दादा..."- श्रुती तिला समजावत म्हणते.
" काय करणार जास्तीत जास्त. ओरडणार ना फक्त. सांभाळून घेईल मी. तू चाबी दे लवकर. आधीच पंधरा मिनिटे वाया गेली आपली"- दिप्ती घाई करत म्हणते.
श्रुती लगेच तिला ड्रॉवर मधून चाबी देते आणि शिवा ने सेंड केलेला अॅड्रस फॉरवर्ड करते.
" अशीच जाणार तू सलवार घालून?"- श्रुती
" वेळ नाही कपडे बदलायला. चल लवकर"- दिप्ती
दोघीही धावतच बाहेर येतात. दिप्ती पार्किंग मध्ये जाऊन बाईक मेन गेट वर आणते आणि मोबाईल समोर ठेऊन GPS वर लोकेशन टाकते. बाईक स्टार्ट करून गेअर टाकून श्रुतीला बाय म्हणते आणि गाडी वाऱ्याच्या वेगाने पळवते. इकडे श्रुती हात जोडून देवाजवळ प्रार्थना करते.
" हे बाप्पा वेळेच्या आधी पोहचवून द्या तिला दादा पर्यंत."
इकडे कॉन्फरन्स हॉल च्या पोर्च मध्ये श्रीकांत येरझाऱ्या घालत होता. शिवा प्रेझेंटेशन देणार असल्याने तो आत मध्ये बसून बाकीच्या कंपनीचे प्रेझेंटेशन बघत बसला होता पण त्याच पूर्ण लक्ष मात्र बाहेर होत. अशोक राव त्याला धीर देत होते. अर्धा तास झाला तरी श्रुती अजून कशी नाही आली म्हणून श्रीकांत ने श्रुती ला फोन लावला.
"कुठे आहे तू श्रुती? अग आमचं प्रेझेंटेशन आहे आता. एवढा वेळ कसा लागला तुला इथे यायला?"- श्रीकांत थोड वैतागून म्हणतो.
" मी घरीच आहे. दिप्ती येत आहे फाईल घेऊन. पोहचत असेल ती "- श्रुती
" तू घरी काय करतेय? तुला आणायला सांगितली होती ना फाईल? आधीच शिवा खूप चिडला आहे. कस तरी शांत केलं त्याला. त्यात तू आणखी...."- श्रीकांत जवळजवळ तिच्यावर ओरडला
" अरे ऐकुन तर घे आधी"- श्रुती त्याला शांत करत म्हणते.
" बोल"- श्रीकांत
श्रुती त्याला मयुरी गाडी घेऊन गेल्यामुळे दिप्ती बाईक ने येत आहे अस सांगते.
" अग तू वेडी आहेस का? तिला बाईक ने कशाला पाठवलं. ही गोष्ट जर त्याला कळली ना तर.. " श्रीकांत त्याच बोलण अर्धवट सोडून गेट कडे बघतो. त्याला एक मुलगी हेल्मेट घालून बाईक वर येताना दिसते.
" नंतर बोलतो. आली बहुतेक दिप्ती"- अस म्हणून फोन कट करतो.
दिप्ती हॉल च्या समोर बाईक पार्क करते. श्रीकांत धावत पायऱ्या उतरून तिच्या जवळ जातो. दिप्ती हेल्मेट काढून बाईक वर ठेवते आणि फाईल ज्या बॅग मध्ये आणली होती ती बॅग श्रीकांत च्या हातात देत म्हणते, " श्रीकांत दादा ही घ्या फाईल. उशीर तर नाही झाला ना मला?"
श्रीकांत नाही म्हणून मान हलवतो.
" आता सुरूच होणार आहे आपल प्रेझेंटेशन. दिप्ती मी नंतर बोलतो तुझ्याशी. आणखी उशीर नको. ओके बाय"- अस म्हणून तो भराभर पायऱ्या चढून हॉल च्या आत जातो. शिवा आणि अशोक राव बसलेल्या ठिकाणी जाऊन शिवा ला ती फाईल देतो. शिवा एकदा पूर्ण फाईल नजरे खालून घालतो आणि सुटकेचा निःश्वास सोडतो.
" पहिलं अस काम आहे हे श्रुती ने बरोबर केलं"- शिवा दोघांनाही म्हणतो.
श्रीकांत परिस्थिती पाहता त्याला सांगत नाही की फाईल श्रुती ने नाही तर दिप्ती ने आणली आहे ते. ते पण त्याच्या बाईक वर. शिवा च्या कंपनीच्या नावाची अनाउन्समेंट होते तसा शिवा अशोक रावांच्या पाया पडून स्टेज वर जातो आणि प्रेझेंटेशन सुरू करतो.
इकडे दिप्ती च काहीं मन लागत नाही. ती श्रुती ला व्यवस्थित पोहचले म्हणून फोन करून सांगते आणि शिवा च प्रेझेंटेशन संपत पर्यंत इथेच थांबणार आहे असंही म्हणते. तिची शिवा बद्दल ची काळजी बघून श्रुती भलतीच खुश होते. एवढं वेळ इथे काय करणार म्हणून दिप्ती बाईक पार्किंग मध्ये लावून हॉल च्या गार्डन मध्ये सावलीत अश्या ठिकाणी बसते की जेणेकरून शिवा हॉल बाहेर आल्यावर दिसला पाहिजे. किमान अर्धा एक तास त्याच प्रेझेंटेशन चालत. त्याच्या नंतर बाकीच्या चार पाच कंपनीचे प्रेझेंटेशन होते. त्यातच चार पाच तास असेच निघून जातात. दिप्ती मात्र तशीच बसलेली असते. सगळ्यांचे प्रेझेंटेशन झाल्यावर वेळ येते ती निकालाची. आणि अर्थातच ती डील मिळते दिक्षित ग्रुप ला. सगळ्यांना शिवा च काम एवढं आवडल होत की निर्णय त्याच्याच बाजूने लागणार हे पक्क होत. सगळे शिवाची प्रशंसा करत होते. अशोक रावांनी तर त्याला कवटाळून घेतल होत. श्रीकांत पण त्याच्या पाठीवर थोपटून शाबासकी देत असतो. त्याला तर आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. एवढ्या कमी वयात एवढं मोठं यश मिळवणे साधी सुधी गोष्ट नव्हती. सगळ्या फॉर्मलिटी करून हळूहळू सगळे बाहेर येत असतात. त्यांना पाहून दिप्ती उभी होते आणि शिवा कुठे दिसतोय का ते बघत असते. पण एवढ्या सगळ्या मध्ये तिला शिवा काही दिसत नाही. सगळे गेल्यावर दिप्ती पुन्हा खाली बसते. तसा शिवा तिला हॉल च्या दरवाज्यातून बाहेर येताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती समजून जाते. लगेच उठून त्याच्या दिशेने चालत जाते.शिवा श्रीकांत आणि अशोक रावांशी बोलत बोलत पायऱ्या उतरत असतो तेव्हा अचानक त्याला दिप्ती त्याचा कडे येताना दिसते. त्याला एक सुखद धक्का बसला होता. तो जागीच थांबतो. एकटक तिच्याकडे बघत असतो. दिप्ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली तरी त्याचं लक्ष नसते. श्रीकांत त्याच्या हाताला मारून त्याला भानावर आणतो.
"खूप खूप अभिनंदन, मिस्टर दिक्षित"- दिप्ती चेहऱ्यावर गोड स्माइल आणून एक हात पुढे करत म्हणते.
" थँक्यू सो मच, पण तुम्ही आणि इथे?"- शिवा हात तिच्या हातात देत म्हणतो.
" तिनेच आणली फाईल"- श्रीकांत
" पण मी श्रुती ला सांगितल होत की?"- शिवा
मग श्रीकांत घडलेला सगळा प्रकार त्याला सांगतो. दिप्ती आपल्या बाईक ने आली आहे हे कळल्यावर शिवाच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात. श्रीकांत ला तर खात्रीच पटली होती की हा आता नक्की चीडणार. अशोक राव पण त्याच्या कडे एकटक बघत असतात. पण झालं उलटच. शिवा जे बोलला त्यानंतर तर श्रीकांत ला फक्त चक्कर यायची बाकी होती.
" तुम्हाला बाईक पण चालवता येते? not bad captain "- शिवा दीप्ती च कौतुक करत म्हणतो.
तस मला ट्रक ही चालवता येतो पण ट्रक मिळाला नाही ना म्हणून बाईक ने आले"- दिप्ती
त्यावर सगळे हसतात. शिवा च्या लगेच ध्यानात येते की आमच्या पैकी कुणीच ह्यांना सांगितल नाही डील आपल्या कंपनीला मिळाली म्हणून, मग ह्यांना कस कळल.
" तुम्हाला कस कळल की डील आपल्या कंपनीला मिळाली आहे ते?"- शिवा
त्यावर दिप्ती काहीही न बोलता फक्त हसते आणि म्हणते, " घरी नाही जायचं का? सगळे वाट बघत असतील आतुरतेने."
शिवा ला मात्र तिने त्याला उत्तर दिलं नाही म्हणून राग येतो पण तो तसा दाखवत नाही.
" अरे हो, चला घरी. सेलिब्रेट करू मस्त. बाबा आपण कार ने जाऊया. शिवा येईल बाईक ने दिप्ती ला घेऊन "- श्रीकांत शिवा कडे बघून डोळे मिचकावत म्हणतो.
" श्रीकांत दादा, तुम्ही या बाईक ने मी आणि काका आम्ही कार ने येतो."- दिप्ती
तिच्या अश्या बोलण्याने शिवा चा चेहरा खाडकन पडतो. त्याचा चेहरा बघून श्रीकांत म्हणतो, " अग तूच ये ह्याच्यासोबत. मला बाबांसोबत उद्याच्या मीटिंग बद्दल बोलायचं आहे थोड. आणि तसही ह्याच्या मागे बाईक वर बसणे म्हणजे ... नको रे बाबा. तुम्हीच बसा. हळू तरी चालवेल थोडा"- श्रीकांत शिवा ला चिडवत म्हणतो.
शिवा त्याच्याकडे रागाने बघतो.
" हो दिप्ती बेटा, तू ये शिवा सोबत आम्ही जातो कार ने"- अशोक राव पण श्रीकांत ला दुजोरा देत म्हणतात.
आता काकांकडून ग्रीन सिग्नल मिळाला म्हटल्यावर तर दिप्ती ला नाही म्हणताच येणार नाही म्हणून शिवा मनातल्या मनात खुश असतो. दिप्ती अशोक रावांच्या बोलण्यावर हो म्हणून मान हलवते.
चौघेही पार्किंग कडे जातात. दिप्ती अशोक रावांसोबत बोलत पुढे चालत असते तर शिवा आणि श्रीकांत त्यांच्या मागे. श्रीकांत शिवा ला एका हाताने स्वतःकडे खेचतो आणि चिडून म्हणतो, " काय रे, मी बाईक ला हात लावला होता फक्त तर किती चिडला होता तू माझ्यावर. आणि आज दिप्ती ने एवढ्या दूर बाईक चालवत आणली ते तिला एका शब्दाने बोलला नाही तू"
" कस बोलणार त्यांना? आज त्यांच्यामुळे प्रेझेंटेशन होऊ शकल आपल. मदत करण्यासाठी केलं त्यांनी हे, मुद्दाम थोडी केलं"- शिवा स्वतःचा ब्लेझर व्यवस्थित करत म्हणतो.
" तुझी तब्बेत तर ठीक आहे ना शिवा? नाही म्हणजे नेहमी काहीही कारण नसताना चिडणारे शिवा दिक्षित आज कारण असून पण चिडले नाही. कस शक्य आहे हे?"- श्रीकांत त्याच्या कपाळाला हात लावून म्हणतो.
" काय चाललय दादा तुझ? ठीक आहे मी. आणि काय म्हणत होता तू? नेहमी विनाकारण चिडतो मी"- शिवा कंबरेवर हात ठेवून म्हणतो.
" हो, नेहमी चिडतो तेही कारण नसताना. आणि आज अस काय झालं तिच्यावर न चिडायला?"- श्रीकांत
" सांगितल ना आताच"- शिवा
" मदत केली म्हणून नाही चिडला की आणखी काही वेगळच कारण आहे?"- श्रीकांत त्याची खेचत म्हणतो.
" आणखी काही कारण नाही आहे. भलते सलते विचार नको करू."- अस म्हणून शिवा निघतो.
श्रीकांत पण हसत हसत त्याच्या मागे येतो. अशोक राव आणि श्रीकांत दोघेही कार मध्ये बसून निघून जातात. शिवा ब्लेझर काढून दिप्ती च्या हातात देतो. शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत घडी करतो आणि हेल्मेट घालून बाईक तिच्या समोर उभी करतो. इशार्यानेच तिला मागे बसायला सांगतो. दिप्ती त्याचा ब्लेझर हातात घेऊन बसू की नाही हाच विचार करत असते. तिला अस विचार करत बघून शिवा थोड चिडून म्हणतो," बसणार आहात की निघू मी एकटाच?"
दिप्ती चुपचाप मागे बसते. शिवा गाडी सुरू करतो आणि मेन गेट पासून डाव्या बाजूला वळवतो.
" आपल्याला उजव्या बाजूला वळायचं होत, तुम्ही डाव्या बाजूला वळलात"- दिप्ती गोंधळून म्हणते.
शिवा काहीच बोलत नाही. दिप्ती थोड्यावेळ शांत राहते पण न रहावुन विचारते," कुठे जात आहोत आपण?"
शिवा आरश्यातून तिच्याकडे रागाने बघतो. दिप्ती मान खाली घालून गप्प बसते. शिवा आरश्यात तिला बघून स्वतःशीच हसतो. काही वेळ गाडी रस्त्यावर धावत असते.
दिप्ती शांत बसून आजूबाजूला बघत असते तर शिवा आरश्यातुन तिला बघत असतो आणि अचानक त्याच्या बाईक समोर कार येते. शिवा जोरात ब्रेक दाबतो. झटका लागल्यामुळे दिप्ती त्याच्या वर आदळते आणि तिचे हात त्याच्या खांद्यावर पडतात.
" नीट पकडून बसा"- शिवा रागात म्हणतो.
दिप्ती थोडी मागे सरकते आणि नीट बसते. तिला कळत नाही शिवा ला कशाचा राग आला आहे ते. "हे असे रागात का आहे? थोड्या वेळा पूर्वी तर ठीक होते. मी ह्यांची बाईक चालवली याचा राग आला बहुतेक, आणि घरी न जाता कुठे घेऊन जात आहेत ते पण नाही सांगितल. काहीतरी भलतचं सुरू आहे दिप्ती ह्यांच्या डोक्यात. मिस्टर दिक्षित तिथे काही बोलले नाही पण आता आपल काही खरं नाही दिप्ती. बाप्पा मदत करा प्लीज"- दिप्ती मनात बडबडते.
शिवा आरश्यातून तिचा चेहरा न्याहाळत असतो.
थोडा वेळाने शिवाची बाईक एका मंदिरा समोर थांबते. दिप्ती खाली उतरते आणि बघते तर शिवा तिला दगडू शेठ हलवाई गणपती च्या मंदिरात घेऊन आला होता.
" मिळालं उत्तर? "- शिवा आताही रागातच असतो.
"किती राग येतो ह्यांना. " दिप्ती मनात विचार करते.
शिवा तिच्या समोर चुटकी वाजवून म्हणतो," जायचं आत की इथेच थांबायचं आहे?"
दिप्ती इशाऱ्यानेच त्याला चला म्हणते. दोघेही मंदिराच्या आत मध्ये जाऊन बाप्पा चे दर्शन घेतात. शिवा डोळे मिटून हात जोडून बाप्पा ला आजसाठी थँक्यू म्हणत असतो. दिप्ती एक नजर त्याच्याकडे पाहून बाप्पा कडे बघते आणि मनात म्हणते," बाप्पा किती राग येतो ह्यांना. अस काही तरी करा की ह्यांचा राग कायमचाच कमी होईल"
शिवा थोड्यावेळाने डोळे उघडतो. बाप्पा च्या मूर्तीला नमस्कार करून दिप्ती कडे बघतो. ती तशीच हात जोडून डोळे मिटून असते. तिला अस बघून शिवा तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, " आणखी किती मागणार आहात बाप्पा कडे. काही बाकीच्यांसाठी पण शिल्लक राहू द्या"
त्याच्या आवाजाने दिप्ती डोळे उघडते. शिवा ला स्वतः च्या एवढ्या जवळ बघून थोडी दचकते आणि बाजूला सरकते. पुजारी प्रसाद घेऊन येतात. दोघांनाही कुंकवाचा टिळा लावून प्रसाद देतात. शिवा त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो.
" अरे अस एकट्याने पाया पडायच्या नसतात. जोडीने नमस्कार करा"- पुजारी
दिप्ती त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असते.
" नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही नवरा बायको नाही आहोत."- शिवा त्यांचा गैरसमज दूर करत म्हणतो.
" अरे आता नाही असले पण एक दिवस होणारच आहात की "- अस म्हणून पुजारी हसत हसत निघून जातात.
पुजारी जे काही बोलले त्यावर दिप्ती चा विश्वासाचं बसत नाही. शिवा ला आता याच्यावर काय बोलायचं हेच कळत नाही.
" निघुया आपण" अस म्हणून शिवा समोर निघतो. दिप्ती त्याच्या मागे चालत असते.
शिवा बाईक काढतो. दिप्ती त्याच्या मागे बसते. बाईक सुरू करून घराच्या दिशेने न जाता दुसऱ्या रस्त्याने चालवत असतो. पण दिप्ती च ह्याकडे लक्ष नसते. मंदिरात पुजारी जे काही बोलले तोच विचार तिच्या डोक्यात असतो. ती आपल्याच विचारात मग्न असते. अधून मधून शिवा तिला आरश्यातुन बघत असतो. तिच्या मनात काय चाललंय हे त्याला तिच्या चेहऱ्यावर वरून समजत. सूर्य मावळतीला आला होता. थंडगार वारा वाहत असतो. त्यावर दिप्ती चे काळेभोर केस वाऱ्यावर उडत होते. ती केस सांभाळण्याचा निष्फळ प्रयत्न करत असते पण बहुतेक तिच्या केसांना तिच्या चेहऱ्यासोबत खेळण्याचा मोह आवरत नव्हता. शिवा मध्ये मध्ये तिला बघत असतो.
किमान अर्धा तासानंतर शिवा बाईक ला ब्रेक लावतो. दिप्ती खाली उतरते.
" कुठे आलो आपण?"- दिप्ती चाचरत विचारते.
" वेताळ टेकडी आहे ही. मी आणि श्रुती नेहमी येतो इकडे ते पण बाईक ने. पण इतके दिवस कामामुळे वेळ नाही मिळाला मला इकडे यायला. आज बाईक होती म्हणून म्हटल एकदा जाऊन येऊ. इथे सूर्यास्त खूप सुंदर दिसतो. "- शिवा एकटक टेकडी कडे बघून म्हणतो.
दोघेही टेकडीच्या माथ्यावर पोहचतात. दिप्ती मावळत्या सूर्याला बघत असते आणि शिवा तिला. तिच्या चेहऱ्यावर पडणारा सूर्याचा प्रकाश तिच्या सौंदर्यात आणखी भर पाडत होता. शिवा तर पार घायाळ झाला असतो तिला अस बघून. थोडा वेळ शांत वातावरणात दोघेही सूर्य बघत उभे असतात.
" तुम्ही माझ्या प्रश्नाच उत्तर दिलेले नाही"- शिवा शांतता मोडत म्हणतो.
"कुठला प्रश्न?"- दिप्ती न समजून विचारते.
" हाच प्रश्न की तुम्हाला मी न सांगता कस कळल डील बद्द्ल?"- शिवा
दिप्ती खाली मान घालुन शांत उभी असते.खर म्हणजे शिवा कडे बघण्याच टाळत असते. तिला तेव्हा कळत की शिवा ला राग कशाचा आला आहे ते.
शिवा तिचा हात धरुन स्वतःकडे खेचतो.
" जेव्हा मी विचारलं तेव्हा उत्तर का नाही दिलं?"- शिवा रागात म्हणतो.
दिप्ती जमिनीकडे बघत उत्तर देते," इथे काका आणि श्रीकांत दादा होते म्हणून"
" मग आता इथे कोणीच नाही आहे. आता उत्तर द्या"- शिवा
" ते म्हणजे...."- दिप्ती अडखडत बोलते.
" हे ते म्हणजे काय आहे? नीट बोला"- शिवा
" तुम्ही काही सांगायच्या आधी तुमचे डोळे सगळ बोलून जातात मिस्टर दिक्षित "- दिप्ती तशीच जमिनीकडे बघत म्हणते.
शिवा चा राग तिच्या बोलण्याने कुठल्या कुठे पळून जातो. तो हसत तिच्या कडे बघतो.
"मग हे तेव्हा का नाही बोललात?"- शिवा प्रेमाने विचारतो
" काका आणि दादा होते तेव्हा म्हणून"- दिप्ती
" तुम्ही जर हे तिथे म्हटलं असत तर त्यांना वेगळं वाटल असते म्हणून"- शिवा तिच्या मनातलं ओळखून म्हणतो.
दिप्ती फक्त हो म्हणून मान हलवते.
शिवा मनात विचार करतो " किती इनोसेंट आहे ह्या. अगदी लहान मुलासारख्या "
शिवा हळूच बोटाने हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर करून डोळ्यात बघून म्हणतो, " फ्रेंड्स आहोत आपण. अस मनात संकोच ठेऊन नाही कस चालणार. जे आहे ते इथेच आणि सगळ्यांच्या समोर बोलून मोकळं व्हायचं. तीच तर असते निस्वार्थ मैत्री. तुम्ही अस बंधनात असल्यासारखं वाटून घेऊ नका. मैत्री केली ना मग बिनधास्त होऊन निभवायची."
" मला वेळ लागेल थोडा "- दिप्ती
" मग हवा तेवढा वेळ घ्या. मला काही प्रोब्लेम नाही. मला तुम्हाला कुठल्याही बंधनात अडकवून ठेवायचं नाही आहे.
पण मित्र म्हणून एक सांगतो. मनात काही मळगत असेल तर ते दूर करून स्वतःला मोकळं करा. लोक काय म्हणतील ह्या विचारातून. जशी हवा, तिला कसलं बंधनं नाही. हवं त्या दिशेने जाते. तसचं स्वतःला बनवा. मुक्त, स्वच्छंद आणि बिनधास्त"- शिवा सगळ एका श्वासात बोलून देतो.
दिप्ती एकटक त्याच्या कडे बघत असते.
" हाच विचार करताय ना की ज्या व्यक्तीला एवढा राग येतो तो अस पण काही बोलू शकतो "- शिवा
" तुम्हाला कस कळल?"- दिप्ती चकित होऊन म्हणते.
" डोळ्यात बघून मनात काय चाललंय हे फक्त तुम्हालाच कळत अस नाही"- शिवा हसत म्हणतो.
त्यावर दिप्ती पण हसते.
" मी तसा सगळ्याच बाबतीत खूप हुशार आहे, पण राग हा माझा विक पॉइंट आहे. खूप प्रयत्न करतो स्वतःवर कंट्रोल ठेवायचा पण नाही पॉसिबल होत. पण ह्या पुढे तुम्ही पार्क मध्ये सांगितलेला उपाय करून बघणार आहे मी. आणि तुम्ही काय ठरवलंय मी जे काही बोललो त्याच"- शिवा
" मी पण पूर्ण प्रयत्न करणार तुम्ही सांगितल तस वागण्याचा"- दिप्ती गोड हसत म्हणते
"प्रॉमिस"- शिवा त्याचा हात समोर करून म्हणतो
" पक्का प्रॉमिस"- दिप्ती हसत हात त्याच्या हातात देते.
" आणखी एक, मंदिरात पुजारी जे काही बोलले त्यावर जास्त लक्ष देऊ नका. बोलण्याच्या ओघात बोलुन गेले असतील ते"- शिवा
दिप्ती हसत हो म्हणून मान हलवते. तेवढ्यात शिवा चा फोन वाजतो.
" अरे दादा कुठे आहात तुम्ही? सगळे वाट बघत आहेत ना तुझी. लवकर ये घरी."- श्रुती
" अग आता निघतच होतो. पोहचतो थोड्या वेळात"- शिवा
" तसे आहात कुठे तुम्ही दोघं?"- श्रुती मस्करीच्या स्वरात विचारते.
" आल्यावर सांगतो ह. ठेव फोन"- शिवा फोन कट करतो.
" चालायचं?"- शिवा दीप्ती ला विचारतो.
" हो जाऊया"- दिप्ती
दोघेही बाईक जवळ येतात. शिवा बाईक सुरू करतो आणि दिप्ती ला घेऊन घराच्या दिशेने वळतो.

............
क्रमशः