Kiti saangaychany tula - 7 books and stories free download online pdf in Marathi

किती सांगायचंय तुला - ७

दिप्ती रूम मध्ये येऊन फ्रेश होते आणि लगेच झोपी जाते.
शिवा मात्र अजूनही जागाच असतो. त्याला कॉफी शॉप मधला प्रसंग आठवतो..
"जर आज ती कॉफी त्यांनी प्यायली असती तर मला कळल असत माझी मैत्री स्वीकार केली की नाही ते. पण त्या बावळट मुलाने घोळ केला सगळा.."- शिवा चिडून म्हणतो..
त्याला राग येत असतो त्या मुलाचा.. मुड ठीक करण्यासाठी मोबाईल वर गाणी ऐकावी म्हणून तो मोबाईल घेतो तर त्याला आठवत की त्याने दिप्ती च्या नकळत तीच गाण मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं होत. तो ती रेकॉर्डिंग लावतो आणि कार मधला प्रसंग डोळ्यासमोर आणत झोपी जातो..
तीन चार दिवस दिप्ती आणि शिवा कामात खूप व्यस्थ असतात. रोज दिप्ती ला तिच्या ऑफिस ची गाडी घ्यायला यायची आणि सोडून पण द्यायची. शिवा ला ऑफिस मध्ये उशीर होत असल्यामुळे त्याची आणि दिप्ती ची भेट फक्त सकाळी नाश्त्याला होत असते.. त्यानंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त होऊन जायचे. पूर्ण चार दिवस झाले होते दिप्ती ला रोज उशीर व्हायचा यायला पण आज ती लवकर आली असते.. पण तिला काही केल्या झोप येत नाही.. म्हणून ती लायब्ररी मध्ये जाऊन पुस्तक वाचायचं ठरवते. लायब्ररी मध्ये बुक शेल जवळ येऊन बुक बघत असते तर तिला तिच्या मागे कोणीतरी असल्याचा भास होतो. ती मागे वळून बघते तर तिथे कोणीच नसत.ती लायब्ररी मध्ये बुक शेल जवळ फिरत असते तर तिला काहीतरी हालचाल जाणवते पण ती त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा बुक चाळत असते.. तर तिला पुन्हा तसाच भास होतो. ह्यावेळेस ती मागे वळून न बघता हळूच पुस्तक बुक शेल मध्ये ठेवून चपळाईने मागे वळते आणि बुक शेल च्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीचा डावा हात पकडून समोर खेचत त्याचा एक पाय स्वतःच्या पायाने उचलून जमिनीवर पाडते आणि उजव्या हाताने त्याच्या टीशर्ट ची कॉलर पकडून ठेवते. त्या व्यक्तीच्या चेहरा बघितल्यावर दिप्ती च्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात. तिने ज्याला खाली पाडल होत तो दुसरा तिसरा कोणी नसून शिवा असतो. दिप्ती लगेच त्याची कॉलर सोडते आणि उभी होते. शिवा मात्र एका हाताने डोकं चोळत तसाच पडून असतो.
"आय एम सो सॉरी, तुम्हाला लागलं तर नाही ना?.."- दिप्ती घाबरत विचारते..
" हा विचार आधी करायचा ना, पाडल्यावर करून काय फायदा"- शिवा उभा होत म्हणतो.
"मला खरचं माहित नव्हत तुम्ही आहात म्हणून, नाही तर कशाला केलं असत मी अस"- दिप्ती आपली बाजू मांडत म्हणते.
" कोण वाटल मग तुम्हाला?"- शिवा थोडं चिडून म्हणतो.
"मला वाटल चोर असेल"- दिप्ती ओठ दाबून हसत म्हणते..
"तुम्हाला चोर वाटलो मी?"- शिवा दात ओठ खात म्हणतो.
" तुम्हाला चोर नाही म्हटलं मी आणि तस ही घरातील लोक असे नाही येत. चोर येतात असे गुपचूप."- दिप्ती
" मी काही गुपचूप नाही आलो"- शिवा
" मग मी जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा का लपलात तुम्ही?"- दिप्ती बारीक डोळे करून म्हणते..
" ते असच"- शिवा नजर चुकवत म्हणतो.
" असच म्हणजे कस? खरं सांगायचं"- दिप्ती हाताची घडी घालून म्हणते.
" घाबरवणार होतो तुम्हाला. पण मीच माती खाल्ली"- शिवा केविलवाणा चेहरा करून म्हणतो.
"पण का घाबरवणार होते तुम्ही मला"- दिप्ती त्याची मज्जा घेत विचारते.
" बघुया म्हटल किती हिम्मत आहे तुमच्या मध्ये. आर्मी मध्ये खूप कठीण मिशन असतात ना. त्याची भीती वाटते की नाही त्यासाठी परीक्षा घेणार होतो तुमची. पण माझीच वाट लागली."- शिवा पुन्हा लहान चेहरा करून म्हणतो..
त्याच्या अश्या बोलण्यावर दिप्ती खळखळून हसते.. तिला अस आपल्यावर हसताना बघून शिवा चिडून म्हणतो.." हसायला काय झालं? प्रत्येकाला कशाची तरी भीती वाटत असते."
"प्रत्येकाचं जाऊ द्या पण मला नाही वाटत कशाचीच भीती"- दिप्ती हसू आवरत म्हणते.
" कशाचीच भीती नाही वाटत?"- शिवा आश्चर्याने बघत तिला म्हणतो.
दिप्ती हसत मान नाही म्हणून हलवते. तेवढ्यात वरून तिच्या ओढणीवर पाल पडते. तशी ती पटकन ओढणी फेकून देत ओरडत शिवा ला मिठी मारते. थोड्यावेळ तर शिवा ला काहीच कळत नाही की काय झालं अचानक.
" प्लीज पळवा तिला, प्लीज"- दिप्ती विनवणी करत असते.
" कुणाला पळवू?"- शिवा गोंधळून विचारतो.
दिप्ती पाल कडे न बघता बोटाने ओढणी कडे इशारा करून म्हणते, " पाल आहे ओढणीवर माझ्या. तिला पळवा प्लीज"- दिप्ती आणखी मिठी घट्ट करत म्हणते.
तिची अशी अवस्था पाहून शिवा ला खूप हसायला येत. तो मनात विचार करतो" आताच म्हणत होत्या की मला कशाचीच भीती नाही वाटत आणि पाल ला घाबरल्या."
" गेली का ती?"- दिप्ती विरूद्ध दिशेने बघत म्हणते.
पाल तर दिप्ती च्या ओरडण्याने आधीच गेली असते.पण शिवा ला आणखी तिची गंमत बघायची असते.
" नाही, नाही गेली"- शिवा दोन्ही हात त्याच्या लोअर च्या खिशात टाकून दिप्ती ची मज्जा घेत म्हणतो.
" मग उभे का आहात असे, पळवा ना तिला"- दिप्ती काकुळतीला येऊन म्हणते.
"हो पळवतो. ऐ पाल शू... शू.."- शिवा एका हाताने इशारा करत म्हणतो..
" हे काय आहे? अस पळवतात का?"- दिप्ती
" मग कस पळवतात?"- शिवा हसू आवरत म्हणतो.
" काही तरी फेकून मारा म्हणजे जाईल ती"- दिप्ती
" काय फेकू आता?"- शिवा आणखी तिची खेचत म्हणतो.
" मलाच फेकून मारा. अहो असेल ना काही आजूबाजूला काही, ते मारा "- दिप्ती वैतागून म्हणते.
तसा शिवा जोरात हसतो आणि म्हणतो, " ती पळाली कधीचं तुम्हाला घाबरून"
हे ऐकल्यावर दिप्ती त्याच्या पासून दूर होते आणि ओढणीकडे कडे बघते तर खरचं पाल नसते तिथे. पण आपल्या अंगावर ओढणी नाही आहे हे समजल्यावर पटकन शिवा कडे पाठ करते. त्याला कळत की दिप्ती का अशी त्याच्याकडे पाठ करून उभी आहे ते. तो लगेच जाणून तिची ओढणी उचलतो आणि तिला देतो. तशी ती थँक्यु म्हणते आणि ओढणी व्यवस्थित घेऊन त्याच्याकडे वळते.
" मी जेव्हा विचारल तुम्हाला तेव्हा खोटं का बोललात तुम्ही?"- दिप्ती
" तुम्ही म्हटल होत ना की तुम्हाला कशाचीच भीती नाही वाटत म्हणून, मग पाल ला घाबरल्या तर मज्जा बघत होतो तुमची"- शिवा
" त्यात काय आहे एवढं. तुम्हीच म्हटल होत ना प्रत्येक व्यक्ती कशाला तरी घाबरतोच म्हणून. मी पण मनुष्य आहे. मला वाटते भीती, पण फक्त पाल ची. मग कशाचीच नाही वाटत."- दिप्ती थोडी लाजत म्हणते..
"पण एवढी भीती?"- शिवा गालात हसत म्हणतो..
" लहानपणी एकदा गालावर पडली होती पाल, तेव्हा पासून भीती वाटते"- दिप्ती खाली मान घालुन म्हणते.
तसा शिवा आणखी हसतो.
"ह्यामुळे एक गोष्ट समजली मला."- शिवा तिचा चेहरा वर करून म्हणतो..
दिप्ती मान हलवून काय अस विचारते..
शिवा तिच्या आणखी जवळ जाऊन म्हणतो.." हिम्मत तर आहे पण सेल्फ डिफेन्स पण करता येतो तुम्हाला. म्हणजे माझ्या सारख्या एवढ्या फिट व्यक्तीला खाली पाडणे काही सोप काम नाही.. आय एम इंप्रेस.."
दिप्ती लाजून मान खाली घालते.
शिवा तिच्या कानाजवळ त्याचे ओठ नेऊन म्हणतो " अरे व्वा! कुणालातरी छान लाजता ही येत. हा पण गुण आहे म्हणजे."
लाजून दिप्ती चे गाल लाल झाले असतात.. शिवा थोडा मागे सरकतो. दिप्ती तशीच खाली मान घालुन उभी असते.
"मला आवडेल माझ्या मैत्रिणी मध्ये एवढे गुण असतील तर"- शिवा ह्या आशेने म्हणतो की आतातरी दिप्ती मैत्रीचा हात पुढे करणार..
दिप्ती त्याच्या डोळ्यात बघते. तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळाला असतो..
खूप वेळ विचार केल्या नंतर ती ठरवते " एक संधी दिली आहे देवाने तर , मागचं सगळं विसरून पुन्हा नवीन सुरूवात करू. एक चान्स देऊन बघू स्वतःला."- अस मनात ठरवून ती हसत आपला हात शिवा पुढे करते. त्याचा तर त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.
" आर यू शुअर..?"- शिवा आश्चर्याने विचारतो..
" 100% शुअर.."- दिप्ती हसून म्हणते.
शिवा पटकन तिचा हात हातात घेतो. त्याला झालेला आनंद दिप्ती त्याच्या चेहऱ्यावर बघत असते.
त्याच्या डोळ्यात हरवून जाते. "किती बोलके डोळे आहेत यांचे. अगदी शिवा सारखे. त्याने काही सांगायच्या आधीच त्याचे डोळे बोलायचे. ह्यांचे पण डोळे तसेच आहेत." दिप्ती मनात बोलत असते.
पण शिवा मात्र आपल्याच धुंदीत असतो. आज तर त्याला गड जिंकल्या सारखं वाटत असते..त्याची नजर दिप्ती वर जाते. ती एकटक त्याच्या कडेच बघत असते. तिला आपल्या कडे अस बघताना पाहून शिवा तिच्या डोळ्यासमोर हात हलवतो.
" कुठे हरवल्या तुम्ही? माहित आहे मी गरजे पेक्षा जास्त हॅण्डसम आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अस एकटक बघत राहणार माझ्या कडे."- शिवा स्वतःचे केस नीट करत म्हणतो.
" छान जोक होता"- दिप्ती त्याची उडवत म्हणते..
शिवा तिच्या कडे रागात बघतो.दिप्ती त्याच्या खोट्या रागावर फक्त हसते. ह्यांना खरचं राग यायच्या आधी निघायला हवं..
मनात विचार करत दिप्ती म्हणते," मला झोप येत आहे आता, मी जाते रूम मध्ये. गुड नाईट"- अस म्हणून दिप्ती वळते पण तिचा हात शिवाच्या हातात असतो.
शिवा आणखी तिचा हात घट्ट पकडतो. दिप्ती मागे वळून बघते. शिवा तिच्या जवळ जातो.. दिप्ती चे हृदय वेगाने धडधडत असते..
" अश्याच हसत राहा. तुम्ही हसताना छान दिसता."- शिवा तिच्या डोळ्यात बघून म्हणतो.
पण दिप्ती त्याच्या डोळ्यात बघण्याच टाळते आणि लाजून खाली बघते.. हात सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करते पण शिवाची पकड मजबूत असल्यामुळे तिचा हात काही केल्या सुटत नाही.
" आता इथे दाखवा ताकद"- शिवा आणखी तिचा हात घट्ट पकडतो.
दिप्ती त्याला तशीच हाताला धरून थोड वळवून हात सैल करत चतुराईने हात सोडवून घेत म्हणते, " प्रत्येक वेळेस ताकद वापरून होत नाही, कधी कधी डोकं पण चालवावे लागते" हसून गुड नाईट म्हणून निघून जाते. शिवा तसाच हसत उभा असतो.
रूम मध्ये येऊन दिप्ती बेड वर पडून तिच्या शिवाचा फोटो सोबत बोलत असते, "आज मी जे काही केलं ते बरोबर केलं की चूक हे मला नाही माहित. मला माहित आहे शिवा तुझ्या पेक्षा चांगला आणि समजून घेणारा मित्र नाही मिळणार कधीचं मला. तू जरी माझ्या सोबत नाही आहे तरीही तूच माझा बेस्ट फ्रेंड राहशील, शेवट पर्यंत. तू जेव्हा जवळ होता तेव्हा तुझी कदर नाही केली मी पण यापुढे अस काहीही वागणार नाही ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल आणि आता मिस्टर दिक्षित सोबत झालेली मैत्री पूर्णपणे निभावण्याचा प्रयत्न करेल. शिवा मी वचन देते तुला"
त्याचा फोटो तसाच हृदयाशी घट्ट धरून दिप्ती झोपी जाते.
...........

नेहमी प्रमाणे दिप्ती वेळेवर उठून वर्कआऊट आणि रनिंग आटपवून रेडी होऊन आरती साठी खाली येते. आरती झाल्यावर दिप्ती बाप्पा जवळ फक्त एवढंच मागते की जे नवीन नात तिने शिवा सोबत जोडलं आहे ते पूर्णपणे निभावण्याची क्षमता द्या.
आज रविवार असल्यामुळे सगळे निवांत असतात. नाश्ता झाल्यावर सयाजीराव पोर्च मध्ये असणाऱ्या रोपट्याना स्प्रे बॉटल ने पाणी देत असतात. दिप्ती त्यांच्या जवळ येऊन उभी राहते.
" काय कॅप्टन, आज सुट्टी का?"- सयाजीराव रोपट्याना पाणी देत म्हणतात.
" सुट्टी नाही आहे आज, बस थोड उशिरा जायचं आहे"- दिप्ती नम्रपणे म्हणते.
" अरे मला वाटलं आज तरी सुट्टी असणार. तुझ्या सोबत वेळ घालवणार होतो मी"- सयाजीराव निराश होऊन म्हणतात.
" थोडच काम बाकी आहे. होईल तीन चार दिवसात पूर्ण. तेव्हा बसू निवांत"- दिप्ती हसत म्हणते.
" बर बर,पण काम झाल्यावर पण तुला काही दिवस आणखी थांबावं लागेल इथे."- सयाजीराव
दिप्ती हसत हो म्हणून मान हलवते.
तेवढ्यात घरातील नोकर तिथे येऊन म्हणतो, " साहेब तुम्हाला आईसाहेब बोलवत आहे."
बॉटल दिप्ती च्या हातात देत सयाजीराव म्हणतात " बघून येतो आमच्या होम मिनिस्टर काय म्हणतात ते"
त्यांच्या बोलण्यावर दिप्ती हसते. सयाजीराव निघून जातात.
"ह्या वयात पण किती प्रेम करतात एकमेकांवर" दिप्ती स्वतःशीच म्हणते.
हातातली बॉटल बघून ती रोपट्याना पाणी देत गुणगुणत असते. शिवा चुपचाप येऊन तिच्या मागे उभा राहतो. दिप्ती आपल्याच धुंदीत गुणगुणत असते. खाली असलेल्या रोपट्याना पाणी शिंपडून झाल्यावर वरती लटकवलेल्या रोपांना पाणी देण्यासाठी वळते तर शिवा ला समोर उभा बघून दचकते आणि तिचा तोल जाऊन ती मागे झुकते तसा शिवा तिला हाताला पकडून सावरतो. तिच्या दुसऱ्या हातात असलेल्या बॉटल मधले पाणी त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे होते. शिवा तसाच तिचा हात पकडुन उभा असतो आणि दिप्ती टेन्शन मध्ये येऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघत असते.
" दिप्ती किती वेंधळी आहे तू. मागे वळताना बघायचं तरी आता नक्की राग येणार यांना." दिप्ती मनात म्हणते.
" माफ करा मला, चुकून झालं. मी मुद्दाम नाही केलं. खरचं"- दिप्ती रडवेला चेहरा करून म्हणते.
शिवा तरीही शांत असतो. त्याला अस शांत बघून दिप्ती खूप वेळ पर्यंत त्याची माफी मागते. शेवटी शिवाला ते सहन होत नाही. दिप्ती च्या ज्या हातात स्प्रे बॉटल असते तो हात वळवून बॉटल चे तोंड दिप्ती कडे करतो. तीच सॉरी पुराण सुरूच असते. शिवा पटकन बॉटल मधले पाणी तिच्या चेहऱ्यावर स्प्रे करतो. तिचा एक हात त्याने आधीच पकडून ठेवल्यामुळे तिला प्रतिकार करता येत नाही.
"अहो सॉरी म्हटल ना मी, खरचं चुकून झालं माझ्याकडून"- दिप्ती चा चेहरा पूर्ण पडलेला असतो.
शिवा परत तिच्या चेहऱ्यावर पाणी स्प्रे करतो.
" हे काय करताय तुम्ही? मी सॉरी म्हटल ना. हवं तर शिक्षा द्या मला पण प्लीज असा राग काढू नका"- दिप्ती
" तुम्ही जेवढ मला सॉरी म्हणणार तेवढ्या वेळेस मी असच करणार."- शिवा पुन्हा पाणी स्प्रे करत म्हणतो.
" ठीक आहे नाही म्हणणार परत सॉरी, पण प्लीज तुम्ही थांबवा आधी हे."- दिप्ती शांतपणे म्हणते.
तसा शिवा तिचे दोन्ही हात सोडतो.
" पुन्हा एकदा सॉरी"- दिप्ती
शिवा परत तिच्या हातातली बॉटल घेऊन तिच्या चेहऱ्यावर पाणी स्प्रे करतो.
" आता काय केलं मी?"- दिप्ती चेहऱ्यावरचे पाणी स्वतःच्या ओढणीने पुसत म्हणते.
" अस तुम्ही सारखं सारखं सॉरी आणि थँक्यु म्हणणार तर मी असच करणार. सलमान खान चा डायलॉग नाही माहित का तुम्हाला, दोस्ती मे नो सॉरी नो थँक्यु " - शिवा बॉटल तिच्या कडे करून म्हणतो.
दिप्ती हसत म्हणते," मूव्ही जास्त बघता काय तुम्ही?"
" हो, पण जास्त सलमान खान च्या"- शिवा हसून म्हणतो.
दोघांना अस हसताना बघून श्रुती त्यांच्या जवळ येते.
"काय सुरू आहे हे, ह...?"- शिवा कडे बारीक डोळे करून श्रुती म्हणते.
दिप्ती पटकन शिवा च्या हातातली बॉटल हिसकावून घेते आणि श्रुती वर पाणी शिंपडून म्हणते," हे सुरू आहे."
"हे काय केलं तुम्ही दिप्ती? अस माझ्या लाडक्या बहिणीला भिजवतात का?- शिवा थोडा गंभीर होत म्हणतो.
त्याच्या अश्या बोलण्याने दिप्ती आणि श्रुती दोघींचाही चेहरा उतरतो. त्यांना अस बघून शिवा दिप्ती च्या हातातली बॉटल घेऊन तिचे झाकण उघडतो आणि पूर्ण पाणी श्रुती च्या डोक्यावर ओततो.
" अस भिजवतात"- शिवा हसत म्हणतो.
श्रुती तोंड फाडून त्याच्या कडे रागाने बघत असते.
" हे काय केलं दादा तू? अरे आंघोळ झाली होती माझी"- श्रुती लटक्या रागात म्हणते.
" हो का, पण वाटत न्हवती ना आंघोळ केल्या सारखी"- शिवा तिला चिडवत म्हणतो.
"थांब तू, मला भिजवले ना दाखवतेच तुला"- श्रुती तिथे असलेली पाण्याची बादली उचलते आणि शिवा च्या दिशेने फेकते.
सगळ एवढ्या लवकर होत की शिवा ला पळण्यासाठी वेळही मिळत नाही. तो पूर्ण भिजलेला असतो.
ह्या दोघांचीही मस्ती बघून दिप्ती हसत असते. तिला अस हसताना बघून शिवा आणि श्रुती दोघेही डोळ्यांनीच एकमेकांना इशारा करतात. त्यांचा इशारा समजून दिप्ती त्यांच्या पासून दूर पळते. ते दोघेही तिच्या मागे तिला पकडण्यासाठी धावतात. संपूर्ण गार्डन मध्ये दिप्ती पळत असते आणि हे दोघे तिच्या मागे धावत असतात. धावता धावता अचानक दिप्ती थांबते कारण तिच्या समोर भिंत असते आणि मागे वळून बघते तर एकीकडे श्रुती आणि दुसरीकडून शिवा ने तिला घेरलेले असते.
दिप्ती श्रुती च्या दिशेने धावते कारण श्रुती जिथे उभी होती तिथून दिप्ती ला निघता आल असत. शिवा च्या मागे पण भिंत असल्यामुळे तिथून जायला मार्गच नव्हता.
"दादा पकड हिला, मी पाणी टाकते."- श्रुती बाजूला असलेला पाईप हातात घेत म्हणते.
तसा शिवा दिप्ती च्या दिशेने धावतो. तिच्या बोलण्यामुळे दिप्ती सावध होऊन मागे वळते आणि शिवा ला जाऊन धडकते. तसा तिचा मागे तोल जातो. शिवा पटकन तिला पाठीला हात लावून सावरतो. दिप्ती पण तिच्या उजव्या हाताने त्याच्या दंडाला पकडते आणि डावा हात त्याच्या हृदयावर ठेऊन स्वतःला पडण्यापासून वाचवते. ती डोळे मिटून जोरजोरात श्वास घेत असते. शिवा ला तिचे श्वास स्पष्टपणे ऐकू येत असतात.. तो एकटक तिच्याकडे बघत असतो. दिप्ती चा हात शिवाच्या हृदयावर असल्यामुळे त्याची धडधड तिला स्पष्ट जाणवत असते. दिप्ती पूर्णपणे शांत झाल्यावर डोळे उघडते.. शिवा आताही तिलाच बघत असतो. तो तिच्या निरागस सौंदर्यात हरवलेला असतो तर दिप्ती त्याच्या बोलक्या डोळ्यात.
दोघांनाही अस बघून श्रुती पटकन पाईप खाली टाकते आणि जीन्स च्या खिशातून मोबाईल काढून दोघांचाही फोटो घेते..
हात जोडत वर बघून मनात म्हणते, "रब जी, प्लीज बना दिजिए ये जोड़ी."
दोघांनाही तिथे तसच सोडून निघून जाते.

..............
क्रमशः












इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED