How much do you want to tell - 1 books and stories free download online pdf in Marathi

किती सांगायचंय तुला - १

ट्रेन ची अनाउन्समेंट झाली असते. ट्रेन पुणे स्टेशन वर थांबली असते. आपल सगळ सामान घेऊन ती खाली उतरते. या अगोदर ही ती पुण्यात आली होती.. कित्येक दा. पण आज तिला पुणे काहीतरी वेगळे भासत असत.. टॅक्सी ड्रायव्हर ला पत्ता सांगून ती तिच्या मार्गाने निघते. काही मिनिटात त्या पत्त्यावर पोहोचते.
दिक्षित वाडा ... भल्यामोठ्या शोभित भिंतीवर आकर्षित अशी नेमप्लेट वाचून वाड्याच्या गेट कडे ती वळते. गेट च्या आत मध्ये जात असतानाच तिला गेटवर वॉचमन अडवतो.
"अहो कुठे जात आहात न विचारता. हे पर्यटक स्थळ नाही आहे परवानगी न घेता आत यायला. दिक्षित वाडा आहे हा." - वॉचमन
त्याच्या अश्या बोलण्याने तिला पुण्यात आल्याची जाणीव होते..
गालात हसत ती नम्रपणे म्हणते.."अहो दादा मी श्रुती ची मैत्रीण आहे, दिप्ती देशमुख."
"हो सगळे असेच म्हणतात आणि शिरतात आत.. आणि मग काही झालं तर बोलणी आम्ही खातो.. "-वॉचमन
"अहो पण तुम्ही ऐका तर माझ"- ती
"मला काही ऐकायचं नाही. तुम्ही व्हा बाहेर"- वॉचमन एक हात गेटकडे दाखवत तिला म्हणतो.
ती तिच्या मैत्रिणीला श्रुती ला फोन लावते.
"हॅलो श्रुती, अग मी आली आहे. गेट जवळ आहे "
"अग मग ये ना आत"- श्रुती
"वॉचमन सोडत नाही आहे आत.तू ये खाली" - ती
"बरं बरं येते मी थांब तू"- श्रुती
थोड्या वेळातच श्रुती गेट जवळ येते. गोबरे गोबरें गाल, गोरा रंग, खांद्यापर्यंत कापलेले केस, हसल्या वर गालावर खळी पडायची तिच्या. मध्यम उंची, त्यावर साजेसा असा पिंक कलर चा ड्रेस.. पाहताच क्षणी कुणाच्या ही मनात भरणारी. दिप्ती जवळ येऊन ती तिला घट्ट मिठी मारते.
"रवी दादा काय हे? मैत्रीण आहे ती माझी. तुम्ही तिला आत का नाही सोडलं?"- थोड नाराजीच्या सुरात तिने प्रश्न करते..
" माफ करा श्रुती ताई, ते मागच्या वेळेस झालं होत ना मला वाटल पुन्हा कोणी तस आले असणार म्हणून मी..."- वॉचमन
"बरं बरं असू द्या. आता कळल ना. येऊ द्या तिला आत"- श्रुती
" सॉरी मॅडम "- वॉचमन दिप्ती ला म्हणतो.
"काही हरकत नाही तुम्ही तुमच काम करत होतात, मला नाही वाईट वाटल"- दिप्ती नम्रपणे म्हणते.
" शंकर बॅग घे मॅडम ची."- नौकर ला उपदेश देत श्रुती दिप्ती चा हात पकडुन तिला वाड्याच्या आत घेऊन येते.
वाड्याची भव्यता बघून दिप्ती भारावून जाते.
"थांब इथे मी आलेच" - श्रुती
असं म्हणून श्रुती निघून जाते. पण दिप्ती मात्र संपूर्ण वाडा बघण्यात एवढी मग्न असते कि तिला श्रुती चा आवाज पण ऐकू येत नाही..
पेशवाई पद्घतीने बनवलेला तो वाडा, प्रशस्त हॉल , हॉल च्या मधोमध काचेचे भलेमोठे झुंबर, आकर्षित असा चौरस पद्धतीचा सोफा सेट, हॉल च्या एका कोपऱ्यातून किचन कडे जाण्याचा मार्ग, त्याच्याच बाजूला डायनिंग रूम,पण या सगळ्यांमध्ये तीच लक्ष वेधून घेतले ते एका भिंतीने. कितीतरी फोटॉफ्रेम लावल्या होत्या त्या भिंतीवर. आणि त्या सगळ्या फोटो मध्ये एक फ्रेम अशी होती जीच्याकडे दिप्ती भान हरपून बघत होती. आर्मी ऑफिसर ची फोटो होती ती. त्यातील व्यक्ती ही तिच्या बाबाच्या वयाची होती.
आपल्याच विचारात मग्न असताना तिची तंद्री तुटते त्या जबरदस्त आवाजाने.
"कोण आहे तु? आणि आत कोणी सोडले तुला?- ती व्यक्ती.
ती मागे वळुन बघते तर तिला त्या फोटो मधले व्यक्ती दिसतात.
"गुड मॉर्निंग सर, मी श्रुती ची....."- दिप्ती
"गप्प बस. आधी हे सांग तुला आत कोणी येऊ दिलं. परवानगी घ्यावी लागते हे पण माहित नाही का तुला?"- ते व्यक्ती
"पण मला श्रुती ने...."- दिप्ती.
तिचे बोलणे मध्येच तोडत ते म्हणतात, " श्रुती च नाव घेऊ नको. खूप बघितले तुझ्या सारखे.सामान घे आणि निघ"
आता मात्र दिप्ती चे डोळे पाणावले असतात.. ती तिची बॅग उचलते आणि जाण्यासाठी वळते. तसा तिला हसण्याचा आवाज येतो. दिप्ती मागे वळून बघते तर श्रुती, तिची आई आणि ते व्यक्ती हसत असतात. दिप्ती तर गोंधळून त्यांना बघत असते.
श्रुती तिच्या जवळ येऊन तिच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणते," हे माझे बाबा रिटायर्ड आर्मी ऑफिसर कर्नल सयाजी दिक्षित आणि ही माझी आई सौ सुचित्रा दिक्षित. आणि आई बाबा मी सांगितलं होत ना माझ्या मैत्रिणी बद्दल हीच ती दिप्ती देशमुख."
"दिप्ती बाळा आता कळले आम्हाला तु श्रुती ला चार वर्षे कस सांभाळलं ते. हीचा राग सहन करणे आम्हाला नाही जमल पण तू ते करून दाखवलं. तुझी परीक्षा घ्यावी म्हणून वागलो अस. खरच जस श्रुती ने सांगितलं तशीच आहे तु. शांत आणि समजुतदार."- सयाजी राव दिप्ती ला म्हणाले.
"अग हे असेच करतात. आम्हाला पण खूप वेळा घाबरवल आहे ह्यानी अस.तुला वाईट तर नाही वाटल ना?"- श्रुती ची आई सुचित्रा ताई दिप्तीला जवळ घेत म्हणतात.
"नाही काकु नाही वाईट वाटल. तसं पण आता सवय झाली आहे मला अश्या वागण्याची. हो ना श्रुते?"- एक भुवई वर करत दिप्ती विचारते.
श्रुती फक्त हसत मान होकारार्थी हलवते.
"चला श्रुती बाळा दिप्ती ला तिची रूम दाखवा, तिला खायला प्यायला द्या काही. दमली असेल ती.आपण नंतर बोलू निवांत .ओके"- सयाजी राव
"ओके सर"- दिप्ती
"अग सर काय म्हणते काका म्हण"- सयाजी राव
"अहो बाबा तिला आर्मी बद्दल खुप रिस्पेक्ट आहे. सांगितलं होत ना मी तुम्हाला. आणि त्यात तुम्ही तिला सिनियर, म्हणून सर म्हणाली ती"- श्रुती
तिच्या बोलण्यावर सयाजी राव हसत " बर " म्हणून निघून जातात..
श्रुती दिप्ती ला घेऊन तिच्या रूम कडे जाते आणि शंकर ला दिप्ती ची बॅग दिप्ती च्या रूम मध्ये ठेवायला सांगते.
दिप्ती देशमुख.... अह इंडियन आर्मी ऑफिसर कॅप्टन दिप्ती देशमुख.
दिसायला अगदी साधी. तिला बघून कोणी म्हणणार पण नाही ती ऑफिसर आहे म्हणून. सावळा रंग. श्रुती पेक्षा थोडी जास्त उंची, मेन्टेन केलेली फिगर, नाजूक बांधा, बोलके डोळे, त्यावर फ्रेम नसलेला चष्मा, स्टँड कॉलर चा ऑफ व्हाईट कलर चा लाँग टॉप आणि त्यावर काळी लेगींग, हातावर आर्मी प्रिंट असलेली खड्याळ, चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि तितकंच तेज ही.
श्रुती आणि ती पुण्याच्या एकाच इंजिनीरिंग कॉलेज मध्ये होत्या. त्यांची फील्ड वेगळी पण रूममेट्स असल्यामुळे चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या त्या. त्यात श्रुती खूप चिडकी आणि रागीट. तिच्या विरूद्ध दिप्ती होती .शांत , समजूतदार आणि तितकीच सहनशील. श्रुती चा राग घालवणे फक्त दिप्तीला जमायचं. म्हणून तर दोघी चांगल्या मैत्रीणी होत्या.पण एक गोष्ट सारखी होती दोघींमध्ये ती म्हणजे साधी राहणी. श्रुती एवढ्या मोठ्या नावाजलेल्या घराण्याची मुलगी पण तिला कसल घमेंड नव्हत त्याच. आणि दिप्ती मिडल क्लास फॅमिली मधून आणि ते ही विदर्भातून आलेली. पण तीच्या स्वभावामुळे श्रुती ला ती आवडायची. दिप्ती ने दहावी पासून ठरवलं होत तिला आर्मी जॉईन करायची आहे ते.
आणि खूप मेहनत घेऊन ती या स्तराला पोहचली सुद्धा. पण स्वभाव मात्र तोच. तिच्या अश्या वागण्यानेच किती तरी ऑफिसर्स चा क्रश होती ती.पण हिला मुलांची एलर्जी. फक्त श्रुती च तिची जिगरी दोस्त. पुण्यामध्ये काही तरी काम असल्या मुळे तिला इकडे यावे लागले. आणि गणपती येत असल्या मुळे श्रुती नी तिला आपल्याच घरी राहायची सोय करून दिली. दिप्ती ला कलेची खूप आवड. गणपती ची सजावट, रांगोळी काढणे, गिटार वाजवणे, वाचन , कविता लिहिणे हे सगळ तिला आवडायचं. सजावट तर ती एखाद्या इव्हेंट मनेजमेंट सारखी करायची. श्रुती ने तिला कित्येकदा बोलावले होते सजावटी साठी,पण दिप्ती ला वेळच मिळत नव्हता. पण ह्या वेळेस मात्र योग जुळून आला आणि दिप्ती चे काम पुण्यात असल्यामुळे ती श्रुती कडे आली होती.

दोघीही श्रुतीच्या रूम मध्ये पोहचतात. श्रुती तिला घट्ट मिठी मारत म्हणते " यार दिप्ती, थँक्यु सो मच.. तू माझ्या साठी आली इथे"
तिला दूर करत दिप्ती म्हणते " तुझ्या साठी नाही काही बाप्पा साठी आले. डेकोरेशन त्यांच्यासाठी करायचं आहे तुझ्यासाठी नाही काही."
श्रुती तिच्याकडे रागाने बघते.
"अरे माझ उंदीर ते. चिडल का?"- दिप्ती तिचे गाल ओढत म्हणते. आणि दोघीही हसतात.
"थांब मी तुला खायला काही तरी आणते. खुप भूक लागली असेल ना"- श्रुती
दिप्ती फक्त मान हलवून हो म्हणते. श्रुती तिला बस म्हणून सांगते आणि रूम च्या बाहेर जाते. इकडे मात्र प्रवासामुळे दिप्ती ला खूप झोप येत असते तर ती तशीच बेडवर पडते आणि तिला नकळत झोप लागते. श्रुती तिच्या साठी खायला आणते तर तिला दिप्ती झोपलेली दिसते.ती तिला न उठवता तिच्या अंगावर पांघरून टाकते आणि रूम बाहेर निघून जाते. तासभरा नंतर दिप्ती ला जाग येते.ती बाजूला बघते तर श्रुती तिच्या बाजूला बसून मोबाईल सोबत खेळत असते.
मोबाईल मध्ये बघतच श्रुती तिला विचारते " झाली झोप? थांब मी कॉफी आणते तुझ्या साठी."
"नाही नको राहू दे, चल आपण डेकोरेशन काय करायचं ते डिस्कस करू, आधीच खूप उशीर झाला आहे. फक्त पाच दिवस उरले आहे."
" आधी काही खाऊन घे नंतर कर जे करायचं आहे ते. मी आणते तुझ्या साठी खायला". अस बोलून श्रुती रूम बाहेर निघून जाते.
दिप्ती फ्रेश होऊन येते. आणि केस नीट करायला ड्रेसिंग टेबल कडे वळते. ती जसे केस मोकळे करणार कोणी तरी तिला मागून कमरेला पकडून गोल फिरवत म्हणतो " मेरी जान, माझा बच्चा किती मिस केलं मी तुला." दिप्ती ला काहीच कळत नाही. ती पूर्ण गोंधळलेली असते. तसा मागून त्यांना आवाज येतो.
"दादा, अरे तू..."- श्रुती
तसा तो तरुण श्रुती कडे बघतो आणि आश्चर्यचकित होतो.
त्याला प्रश्न पडतो श्रुती इथे तर मग मी कोणाला पकडलं? तसा तो दिप्ती ला खाली उतरवून तिच्या कडे बघतो आणि बघतच राहतो. दिप्ती स्वतःचे केस नीट करत श्रुती जवळ जाऊन उभी होते.पण तो आताही तिलाच बघत असतो.
त्याची तन्द्री तोडत श्रुती त्याच्या जवळ जाऊन त्याला बिलगते आणि म्हणते " दादा तू कधी आलास. किती मिस केलं मी तुला हया पंधरा दिवसात आणि तू दिप्ती ला का अस उचललं, बघ ना घाबरली ना ती किती". तिला स्वतःपासून दूर करत तो म्हणतो " अग मला वाटल तूच आहेस, ह्यांचा चेहरा दिसला नाही मला त्यांच्या केसांमुळे".
खरचं किती दाट होते दिप्ती चे केस.. म्हणूनच ती कधी केस मोकळे नाही सोडायची. मुळात तीला आवडतच नव्हत ते. श्रुती दिप्ती कडे बघते ती खाली मान टाकून उभी असते.
श्रुती तिच्या जवळ जाऊन विचारते " दिप्ती ठीक आहेस ना तू?"
" अग ते अस सगळ अचानक झालं ना म्हणून ते... ठीक आहे मी"- दिप्ती थोडी अडखळत उत्तर देते.
" आय एम सो सॉरी,मला खरचं माहीत नव्हत ,मला वाटल श्रुती आहे म्हणून... तुम्हाला वाईट तर नाही वाटल ना?"- श्रुती चा भाऊ
" नाही .. मुद्दाम नाही केलं तुम्ही, इट्स ओके"- दिप्ती
" आता हे तुमचं सॉरी पुराण संपल असेल तर मी ओळख करून देते... दादा ही माझी मैत्रीण दिप्ती देशमुख आणि दिप्ती हा माझी जान माझा मोठा भाऊ शिवा.. शिवा सयाजी दिक्षित. अग पंधरा दिवसांसाठी बिझनेस ट्रिप ला गेला होता. खूप दिवस बघितल नाही ना मला म्हणुन असा वागला तो.खूप प्रेम करतो माझ्यावर. मी सांगितलं होत ना तुला आणि फॅमिली फोटो मध्ये पण दाखवलं होत ना"-श्रुती
दिप्ती फक्त मान हलवून हो म्हणते. शिवा तिच्या निरागस चेहऱ्याकडे एकटक बघत असतो. श्रुती च्या नजरेतून हे सुटत नाही.ती त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून त्याला भानावर आणते आणि दिप्ती कडे बघून म्हणते " दिप्ती चल, तुला आई नी खालीच बोलावल आहे आणि दादा तू पण ये". दिप्ती चा हात पकडुन ती तिला रूम बाहेर घेऊन जाते..
पण शिवा मात्र ती जाते त्याच दिशेने बघत असतो.
शिवा दिक्षित, टॉप चा बिझनेसमन, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट चा बिसनेस.. सयाजी रावांच्या बाबांनी हा बिझनेस सुरू केला पण सयाजीराव यांना आर्मी चे वेड.मग शिवा च्या काकांनी पूर्ण बिझनेस सांभाळला. आता शिवा त्यांना मदत करत होता. कमी वयात त्याने खूप मोठं यश प्राप्त केले होते. दिसायला अगदी साऊथ इंडियन मूव्ही मधल्या हीरो सारखा. उंच, पिळदार शरीरयष्टी,रंगाने गोरा, चेहऱ्यावर बिअर्ड, कित्येक मुली त्याच्या साठी वेड्या होत्या पण हा कुणाला भाव देईल तर शप्पथ. आणि स्वभावाने श्रुती सारखाच चिडका आणि रागीट. आपला राग तो कुणावर ही काढत होता.जी व्यक्ती समोर आली तिच्यावर त्याचा राग निघायचा.

"ये बेटा, झाली झोप ?खाऊन घे काही तरी"- सयाजीराव दिप्ती ला म्हणतात..
" आई तू कॉफी बनवत आहेस ना? मग तू नको बनवू ,दिप्ती ला करू दे, छान बनवते ती. आणि तसंही खूप दिवस झाले तिच्या हातची कॉफी पिऊन."- श्रुती सुचित्रा ताई ला म्हणते.
"अग ती पाहुणी आहे आपली अस कामाला लावू मी तिला"- सुचित्रा ताई थोड रागवतच म्हणतात.
" तू एकदा पिऊन तर बघ आवडेल तुला पण. अहो बाबा खूप छान करते ती ,आमच्या हॉस्टेल वर फेमस होती हीची कॉफी"- श्रुती
" अस म्हणतेस, दिप्ती बनव मग तूच"- सयाजीराव
" अहो पण...."- सुचित्रा ताई
" काकु बनवते मी"- दिप्ती गालात हसत म्हणते.
" दिप्ती पाच कप बनव ह, दादा पण येईलच इतक्यात फ्रेश होऊन"- श्रुती
दिप्ती होकारार्थी मान हलवून किचन मध्ये जाते.
तिथे तिची ओळख मंदा बाई सोबत होते. मंदा बाई दिक्षित वाड्याच्या खूप जुन्या सेविका..शिवा आणि श्रुती ला त्यांनी स्वतःच्या लेकरांसारख सांभाळलं होत. आणि शिवा चा तर त्यांच्या वर खूप जीव. तो त्यांना गर्लफ्रेन्ड म्हणायचा. मंदा बाई सोबत बोलता बोलता दिप्ती ने कॉफी बनवत असते..
" मी आणते बाळा तू जाऊन बस"- मंदा बाई दिप्ती ला म्हणतात.
तशी दिप्ती डायनिंग टेबल वर येऊन बसते. सयाजी राव आणि तिची चांगलीच गट्टी जमते. दोघेही एकाच क्षेत्रातील. तेवढ्यात शिवा पण तिथे येतो. सुचित्रा ताई मंदा बाई ना कॉफी आणायला लावतात. शिवा बरोबर दिप्तीच्या समोर बसतो. ती जागाच असते त्याची नेहमीची. मंदाबाई कॉफी आणि थोड खायला घेऊन येतात.
शिवा एक घोट घेत म्हणतो " व्वा काय कॉफी बनवली आहे, जीसने भी बनाई है उसका हात चुमने का दिल कर रहा है." अस म्हणताच दिप्ती ला जोरदार ठसका लागतो.
सगळे त्याच्या कडे बघतात. शिवा ला काहीच कळत नाही. तो विचार करतो मी अस काय चुकीचं बोललो. श्रुती त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणते " कॉफी दिप्ती ने बनवली आहे." आता मात्र शिवा ला ठसका लागतो. तसे दिप्ती ला सोडून बाकी तिघेही त्याच्याकडे बघून हसतात.तो बिचारा खाली मान घालुन कॉफी संपवतो आणि आपल्या रूम कडे जातो.

क्रमशः

( नमस्कार मित्रांनो , मी पहिल्यांदाच काहीतरी लिहिण्याच्या प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की तुम्हाला ते आवडणार. काही चूक झाल्यास क्षमा असावी.)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED