२९ जून २०६१ - काळरात्र - 5

  • 9.8k
  • 3.9k

सक्षमच्या हातात एक बॉक्स होता. चावीने बंद केलेला बॉक्स होता तो. अनि खूप संतापलेला वाटत होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती आणि त्यातून रक्त येत होतं. सक्षमच्या हातातला बॉक्स बघून तो त्याच्या अंगावर धावून गेला आणि संतापात ओरडला, “तुला कुणी शहाणपणा करायला सांगितला होता? का उचललास तो बॉक्स?” सारंग आणि शौनक त्याला मागे ओढत शांत बसवू लागले. अनि असा अचानक अंगावर धावून आल्यामुळे सक्षम घाबरुन अक्षरशः खाली कोसळला होता. रचनाने त्याला उठवण्यात मदत केली. अनिचा असा रुद्रवतार बघून सर्वजण घाबरून गेले होते. शौनक अनिला एका बाजूला घेऊन गेला आणि तिकडे काय पहिलं? असं विचारलं. अनि काहीच बोलायला