२९ जून २०६१ - काळरात्र - 9

  • 6.9k
  • 2.6k

“वेल, ते जर आपण असू तर ती चांगली गोष्ट नाही का? तो मला आपल्यापर्यंत पोहोचण्याचा एक रस्ता वाटतो. आपण नेहमी म्हणत असतो की आपण आपल्या स्वतःशी बोलायला हवं. आपण स्वतःला आपल्यात शोधायला हवं आणि इथेतर आपल्याला एक आयती संधी चालून आली आहे, जिच्यात आपण आपल्या स्वतःला खरोखरच फिजिकली, मेंटली पाहू शकतो आणि जाणून घेऊ शकतो. देवा..... काय हे?” हंसीका उद्विग्नतेने म्हणाली. सक्षमने निलीमाला उठवलं आणि हॉलमध्ये घेऊन आला. तिला डायनिंग टेबलच्या एका खुर्चीवर बसवत म्हणाला, “एंजॉय यॉर पार्टी नीलिमा...” ती थॅंक्स म्हणत बसली आणि सर्वांच्या चिंताग्रस्त चेहर्‍याकडे बघू लागली. तिला त्यांच्या चेहर्‍यावर आधीसारखा उत्साह दिसत नव्हता. तोच तिचं