२९ जून २०६१ - काळरात्र - 14

  • 7.4k
  • 2.8k

“अजून ऐक, अनि आणि सक्षम हे तिसर्‍या विश्वातले आहेत. त्याने आताच तुझा फोटो काढला. त्याचा फोन खराब नाहीये. तुला आठवत असेल आपण डिनर सुरू करतानाच त्याच्या फोनच्या स्क्रीनला प्रॉब्लेम झाला होता आणि फोन बंद झाला होता.” सारंगने हातातला वाईन ग्लास खाली ठेवला आणि गंभीर मुद्रेने हंसीकाकडे बघू लागला. “तुला तो काळोख म्हणजे डार्क एरिया आठवतोय का? ज्याच्यातून आपण पास झालो होतो, मला असं जाणवलं की त्या एरियामधून जो कुणीही पास झाला तो वेगळ्याच विश्वात पोहोचला आणि जो त्या काळोखातून पास झाला तो त्याच्या मूळ विश्वात कधीही परत जाऊ शकत नाही आणि मला असं वाटतं की आपण धूमकेतू