अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 19

(16)
  • 10k
  • 2
  • 4.9k

शौर्यने क्षणाचाही विलंब न करता समीराने दिलेला डब्बा उघडला..समीराने ही शौर्य सारखच सेम कार्टुन काढलेलं.. त्याच्या ही टिशर्टवर S लिहिलेलं. तो गुढग्यावर बसुन एक हात पुढे करत त्या हातावर ठेवलेलं शौर्यनेच दिलेल लाल रंगाच्या रेपर्समध्ये गुंडाळलेल हार्ट शेपच चॉकलेट.. जेणे करून समीरा त्याला सांगत होती की असं तुझं प्रेम व्यक्त कर..शौर्य मनात काहीसा विचार करतो आणि मोबाईल हातात घेत वॉट्सए वरून समीराला "Nice Idea.. thanks for your suggestions." म्हणुन मुद्दामूनच मेसेज करतो..समीरा तो मेसेज बघताच खुप विचार करू लागते.. हा नक्की माझ्याच प्रेमात आहे की कुणा दुसरीच्या...?? असा का बरं मेसेज केला ह्याने.."ओहहहह...you want to make me jealous??? मी पण काही