अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 19 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 19

शौर्यने क्षणाचाही विलंब न करता समीराने दिलेला डब्बा उघडला..

समीराने ही शौर्य सारखच सेम कार्टुन काढलेलं.. त्याच्या ही टिशर्टवर S लिहिलेलं. तो गुढग्यावर बसुन एक हात पुढे करत त्या हातावर ठेवलेलं शौर्यनेच दिलेल लाल रंगाच्या रेपर्समध्ये गुंडाळलेल हार्ट शेपच चॉकलेट..

जेणे करून समीरा त्याला सांगत होती की असं तुझं प्रेम व्यक्त कर..

शौर्य मनात काहीसा विचार करतो आणि मोबाईल हातात घेत वॉट्सए वरून समीराला "Nice Idea.. thanks for your suggestions." म्हणुन मुद्दामूनच मेसेज करतो..

समीरा तो मेसेज बघताच खुप विचार करू लागते.. हा नक्की माझ्याच प्रेमात आहे की कुणा दुसरीच्या...?? असा का बरं मेसेज केला ह्याने..

"ओहहहह...you want to make me jealous??? मी पण काही कमी नाही...",समीरा स्वतःशीच बोलत हसु लागली आणि हसतच मोबाईल वर काही तरी टाइप करू लागली.

समीरा : "थेंक्स बोलण्यासारखं काय आहे त्यात.. फक्त एकदा अस ट्राय कर.. म्हणजे ती नक्की हो बोलेल जिच्या तु प्रेमात आहेस.. मी ही लगेच हो म्हटलेलं.. जेव्हा त्याने मला अस प्रपोज केलेलं तेव्हा.."

समीराने लगेच मेसेज टाइप करून सेंट केलाही..

समीराचा मेसेज वाचताच शौर्यलाही थोडंस हसु आलं...

शौर्य : "ओके.. तु तुझा एवढा एक्सपिरियन्स सांगतेस मग तर ट्राय करावंच लागेल पण आता कस आहे ना आम्हा दोघांचीही एक्साम सुरू होणार आहे. एक्साम झाली की मग नक्की ट्राय करतो.. "

समीरा : "ओल दि बेस्ट.."

शौर्य : "Same 2 U for coming exam.."

दोघांनाही एकमेकांशी बोलून खुप छान वाटत होत. दोघेही स्वतःने केलेला पराक्रम आठवुन अगदी हसत असतात..

परीक्षेच्या भीतीने ससगळेच अभ्यासात गुंतले..

अश्यातच बोलता बोलता परीक्षेचा दिवस उजाडतो.. सगळे गेटजवळ बोलत एकमेकांना बेस्ट ऑफ लक करतात..

शौर्य खुप दिवसांनी कॉलेजला आल्यामुळे सीमा आणि समीरा त्याची विचारपूस करतात.. शौर्यला ही खुप दिवसांनी समीरा दिसते त्यामुळे तो सगळ्यांच्या नकळत का होईना तिला बघतच राहतो आणि तीच ही तेच चालु असत..

वृषभ : "शौर्य तुझा क्लासरूम A3 आहे.. मी माझा आणि तुझा आपल्या दोघांनचा बघुन आलो. "

रोहन : "माझा सुद्धा बघितला असतात तर.??"

वृषभ : "आधीच बोलायचं ना मित्रा... थांब बघतो परत जाऊन.."

रोहन : "नको राहु देत माझं मी बघतो.."

"हाय गाईज", मनवीने सुद्धा येऊन ग्रुपमध्ये स्वतःची हजेरी लावली.

शौर्य : "मी क्लासरूमध्ये जाऊन बसतो बाय... अस बोलत शौर्य तिथुन निघु लागला.."

शौर्य निघणार तोच मनवीने सुद्धा शौर्यला बेस्ट ऑफ लक करायला हात पुढे केला.. सगळे अगदी टक लावुन शौर्य काय रिएक्शन देतोय हे बघत असतात..

पण शौर्यने ते बघुन न बघितल्या सारख करत तो तिथुन निघु लागला..

रोहन : "शौर्य बस ना.. अजून किती राग करतोय. ती सॉरी ही बोललीय ना.. प्लिज माझ्यासाठी एकदा माफ कर ना तिला..प्लिज.."

मनवी : "शौर्य एकदा मी केलेली चुक सुधारायची संधी तर दे... आणि एकदा तर माफ करूच शकतोस ना.. प्लिजsss.."

समीरा : "मला ही तेच वाटत.."

सगळे शौर्यला समजवतात.. शौर्यही झालं गेलं विसरून मनवीला हात मिळवतो..

"थेंक्स आणि ऑल दि बेस्ट फॉर एक्साम",मनवी शौर्यचा हात पकडतच बोलते..

"सेम टु यु", शौर्य स्वतःचा हात तिच्यापासुन सोडवत बोलतो..

टॉनी : "दोघांचीही पुन्हा फ्रेंडशिप झाली त्याबद्दल सेलिब्रेशन व्हायलाच हवं.. काय बोलताय गाईज.."

मनवी : "सेलीब्रेशन तो बनता हे पण एक्साम झाल्यावर आणि पार्टी माझ्याकडुन असेल.."

"येहहहह", शौर्य सोडुन सगळे एकत्रच ओरडतात..

शौर्यला आज मनवी मध्ये खुप भारी फरक जाणवत होता. नेहमी रोहनमध्ये गुंतून असणारी तिची नजर आज वेगळंच काही तरी बोलत होती..

शौर्य : "मी क्लासरूमध्ये जाऊन बसतो.. तुम्हीही आपापल्या क्लासरूममध्ये जावा.. आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.."

वृषभ : "A3 इथे खालीच आहे शौर्य.."

राज : "बहुतेक एक्सामीनर शौर्यच्या ओळखीचा असणार बघ.."

टॉनी : "ते का बर??"

राज : "मग त्याला कस कळलं की शौर्यच्या पायाला लागलंय..??"

वृषभ : "त्याला कस कळेल?? आणि मॅन म्हणजे तु आम्हांला कळेल अस बोल."

"हो न",सगळे प्रश्नार्थी चेहऱ्याने राजकडे बघत बोलले.

राज : "मग बरोबर ह्याचा क्लासरूम खाली आणि आपला वर्ती कसा काय ठेवला त्याने.."

"सगळेच हसु लागतात", राजने जणू पहिल्याच पेपरच आलेलं सगळ्यांच टेन्शन कमी करत असतो..

"बर मी निघतो मला क्लासरूम शोधायचाय.. बाय", अस बोलत वृषभ तिथुन निघाला..

रोहन : "मला तर अजुन माझा क्लासरूम बघायचंय.."

मनवी : "मला पण"

सगळेच एकमेकांना बाय आणि बेस्ट ऑफ लक करत तिथुन निघत आपापल्या क्लासरूममध्ये जाऊ लागले.. शौर्यही एका पायावर बेलेन्स करत आपल्या क्लासरूममध्ये जाऊ लागला..

समीरा शौर्यला आवाज देत त्याच्या मागे मागे जाऊ लागली..

"बेस्ट ऑफ लक", समीरा हात पूढे करतच म्हणाली..

शौर्य : "तुला मगाशी तर केल ना मी..??"

"हे त्यासाठी नाही.. दहा दिवस राहिलेत एक्साम संपायला..मग...",समीरा भुवया उडवत शौर्यला विचारू लागली.

शौर्य : "मगsss.. तु सांगितलंस त्याप्रमाणे.."

तोच मनवी तिथे येते.. आणि दोघांचंही बोलणं अर्धवट रहात..

मनवी : "अरे वाह समीरा तुला सुद्धा A3 आला का??"

"नाही ग..",समीरा शौर्यच्या हातात असणारा तिचा हात मागे घेत बोलली..

शौर्य : "तुझा क्लासरूम कुठे??"

मनवी : "जिथे तु तिथे मी.."

मनवी अस बोलताच समीरा तिच्याकडे बघतच रहाते..

शौर्य : "म्हणजे..?".

मनवी : "मी आत्ताच लिस्ट बघुन आलीय.. तुला पण A3 क्लासरूम आलाय ना आणि मला सुद्धा सेम आलाय."

शौर्य : "आणि रोहनला??"

मनवी : "त्याच त्याला माहित असेल ना तो अजुन लिस्ट बघतोय तिथे.. मला बॉर झालं म्हणुन आली मी.. तस पण तुम्ही लोक बोलताना दिसलात मला वाटलं एक्सामच काही तरी डिस्कस करत असाल. तेवढाच अभ्यास होईल.."

मनवी थोडं खोटं हसु तोंडावर आणत बोलु लागली..

शौर्य आणि समीरा तिच्या अश्या बोलण्याकडे बघतच बसतात..

"चल आपण जाऊयात क्लासरूमध्ये?? मी नेते तुला..", अस बोलत मनवीने शौर्यचा हात पकडत त्याला घेऊन जाऊ लागली..

"मी ही निघते.. बाय..आणि पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक.." समीरा शौर्यकडे थोडं रागात बघतच बोलली.. तिला मनवीने त्याला अस पकडलेल अजिबात आवडत नसत.. पण शौर्यच लक्ष मात्र समीराच्या बोलण्याकडे नसत.. मनवीने पकडलेल्या हाताकडे तो बघत असतो..

"तुला पण बेस्ट ऑफ लक..बाय..",मनवी शौर्यचा हात पकडत त्याला तिथुन नेऊ लागली.

"बाय..", समीरा पुन्हा मोठ्याने बोलते पण शौर्यच लक्षच नसत..

शौर्य : "मनवी मला आता जमतंय चालायला.. "

मनवी : "जास्त उजव्या पायावर जोर दिलास तर तुलाच त्रास होईल आणि मी नेतेय ना तुला.."

"मी करेल मॅनेज..",शौर्य मनवीचा हात सोडवतच बोलला..

"अग तु गायब कुठे झालीस.. मी कधीच तुला शोधतोय..." रोहन शौर्य आणि मनवीने एकमेकांचा धरलेला हात बघतच बोलतो

"तु ह्याला अस का पकडलयस?? काय झालं??",रोहन मनवीला विचारतो..

मनवी : "बर झालं तु आलास.. ह्याला क्लासरूममध्ये न्यायचंय.. तुम्ही लोक अस एकट्याला टाकुन कस काय जाऊ शकता?? बिचारा एकटाच लंगडत जात होता.. "

रोहन : "सॉरी यार शौर्य.. मी ही विसरून गेलो.. "

शौर्य : "काय तु पण.. मला जमतंय आता चालायला.. तुझा कुठेय क्लासरूम??"

रोहन : "मी पण A3.."

"अरे वाह.", शौर्य खुश होत रोहनला टाळी देतच बोलला

मनवी : "खरंच???"

रोहन : "होsss.."

मनवी : "तिघे एकत्रच आहोत मग आपण.."

रोहन : "ग्रेट.."

"नशिब..वाचलो..",शौर्य मनातच बोलला..

सगळे जाऊन आपापल्या क्लासरूमध्ये बसतात.. रोहनची जागा बरोबर शौर्यच्या बाजूच्याच डेस्कवर येते आणि रोहनच्या बरोबर बाजूच्या डेस्कला पण दोन तीन बेंचसोडून मनवीची जागा येते..

सर ही वर्गात येतात.. हातातील घड्याळाकडे बघतच ते अन्सर शिटपास करायला देतात.. जेणेकरून रोल नंबर वैगेरे टाकता येईल.. पुरवणी हातात मिळताच रोहन शौर्यला हळुच आवाज देतो.

रोहन : "शौर्यsss.. शौर्यsss.."

पण शौर्यच लक्षच नसत..

शौर्य बघत नाही म्हणुन रोहन मोठ्यानेच शौर्य म्हणुन ओरडतो.. तोच सरांसकट संपुर्ण वर्गच त्याच्याकडे पाहु लागतो.. सरसुद्धा त्याच्याकडे येतात.

सर : "You have any problem?? what you want??"

सर रोहनकडे येतच त्याला विचारू लागले..

रोहन : "Nothing sir.. I just want to do best of luck to him.. Best of luck Shaury"

सर : "Mister Rohan, this is exam hall.. don't make such a noise.. Am i clear.."

"सॉरी सर..",रोहनला ओरडून सर निघुनही गेले..

सर जाताच शौर्य रोहनकडे बघतो.. आणि काय झालं विचारतो..

रोहन हातातील पेन फेकुन मारायची एकटिंग करत रागानेच शौर्यला बघतो..

रोहन : "कधीच आवाज देतोय.."

शौर्य : "ऐकूच नाही आलं सॉरी".

रोहन : "हेल्प मी.. पासिंग मार्क्स पुरत तरी.."

शौर्य अंगठा दाखवत त्याला इशाऱ्यानेच हो म्हणुन सांगतो..

बेल होताच प्रश्न पत्रिका प्रत्येकाच्या हातात आल्या.. प्रश्न पत्रिका बघुन रोहनचा चेहरा पूर्ण पडुन गेला..पेपर मिळाल्या मिळाल्याचं शौर्यला आवाज देन चालु झालं..

"जेवढं येत तेवढं लिही.. मग बाकीच मी सांगतो.."शौर्यने अस बोलताच रोहनच्या जीवात जीव आला.. शौर्यही पटापट पेपर लिहू लागला..

"सप्लिमेंट सर!", शौर्यचा आवाज ऐकताच सगळे त्याच्याकडे वळून बघू लागले..

"पेपर देऊन अर्धा तास फक्त झाला असेल आणि ह्याला सप्लिमेंट लागली सुद्धा.",रोहन स्वतःलाच प्रश्न करतो..

सर स्प्लिमेंटवर सही करे पर्यंत शौर्यने रोहनला देखील सप्लिमेंट घे म्हणुन इशारा केला..

"तु पागल आहे का..? ह्याच पेपरवर काही लिहिलं नाही आणि सप्लिमेंट कसली घेऊ..", रोहन त्याच्या पुढे बसलेल्या विद्यार्थ्याच्या आड लपुन बसतच स्वतःची दोन तीन पेजेस शिवाय काहीही न लिहिलेली अन्सरशिट शौर्यला दाखवु लागला..

"सांगतो तेवढं कर.." शौर्यने अस बोलताच आता रोहन मोठ्याने ओरडला..

"सप्लिमेंट सरsss" पुन्हा सगळे मिळुन रोहनकडे बघु लागले..

सर रोहनला सप्लिमेंट देऊन संपुर्ण वर्गात फेऱ्या मारू लागले. ह्याच संधी चा फायदा घेत शौर्यने आपली पहिली अन्सरशीट रोहनला हळुच पास केली व त्याची स्वतःकडे घेतली..

शौर्यने वापरलेल डोकं बघुन रोहन त्याला फ्लेनकीस देऊ लागला..

"पटकन लिही.."अस बोलत शौर्य बाकीच राहिलेलं पेपर लिहु लागला..

रोहननेही पटापट शौर्यचा पेपर उतरवुन तो त्याला सरांच्या नकळत पून्हा दिला.. शौर्यने पुन्हा दुसरा पेपर रोहनला पास करायला घेतला..पण रोहन पेपर काही घेत नव्हता..

रोहन : "हात दुखला..बस झालं.. मी निघतो.. पास होईल हेच खूप.. बाय..बाहेर भेटु अस बोलत पेपर सरांकडे देत तो क्लासरूमधून बाहेर पडला.."

शौर्य आता पटापट त्याच्या पेपर सोडवु लागला.. शेवटच्या क्षणापर्यंत शौर्य पेपर सोडवत राहिला.. बेल होताच सर पेपर घेऊन गेले..

खुप वेळ एका जागेवर बसुन राहिल्याने शौर्यचा पाय चांगलाच आखडून गेलेला.. त्याला उभं राहायला जमत नव्हतं..

तोच कोणी तरी हात पुढे केला.. समोर बघतो तर मनवी..

मनवी : "म्हणुन मगाशी तुला सांगत होती.. तुला वाटत तेवढा तु बरा नाही झालास.."

मनवीच्या हाताला पकडत स्वतःचा तोल सावरत शौर्य उभा राहिला.. पण एका पायावर तोल सावरण अशक्यच वाटत होतं त्याला.. शौर्य पुन्हा बसला..

मनवी : "काय झालं??"

शौर्य : "प्लिज माझी बेग आणुन देशील??"

मनवीने जाऊन त्याची बेग आणुन दिली.. शौर्यने त्यातील मोबाईल काढत वृषभला फोन लावला.. पण वृषभचा फोन सायलेंटवर असल्याने त्याने उचलला नाही.. मग त्याने रोहनला फोन लावला.. आणि त्याला बोलावून घेतलं..

मनवी : "मी ही नेलं असत ना तुला बाहेर.."

शौर्य : "ते चांगलं नाही दिसत ग मनवी.. रोहन येतोय.."

मनवी : "का काय झालं त्यात.. एका मित्राला निष्पाप मनाने मदत केली तर त्यात काय चांगल नाही दिसत.."

तोच रोहन येतो..

रोहन : "काय झालं शौर्य??"

शौर्य : "मला उठायला होत नाही.. हेल्प हवी होती.."

रोहन शौर्यचा हात खांद्यावर घेत त्याला उचलतो..

"आहहह मम्मा... रोहन खुप दुखतंय रे पाठ.. आणि पाय पण..", शौर्य कळवळतच बोलतो..

रोहन : 'औषध घेतलेलीस का??"

शौर्य : "झोप येते रे ती औषध घेऊन म्हणुन दोन दिवस नाही घेतली.."

रोहन : "काय तु आता गेल्या गेल्या औषध घे.. तस पण उद्या सुट्टी आहे."

रोहन शौर्यला समजवतच बाहेर आला.. बाहेर गेटजवळ बाकीचे मंडळी उभी होती..

समीरा : "तुला काय झालं शौर्य??"

रोहन : "जास्त पेपर लिहिल्यामुळे त्रास झालाय बाकी काही नाही.."

सीमा : "म्हणजे??"

रोहन : "म्हणजे जास्त पेपर लिहावा ह्यासाठी ह्याने रात्रभर भरपूर अभ्यास केला आणि तो करण्यासाठी त्याने औषध स्कीप केली म्हणून हा त्रास.. "

समीरा : "शौर्य काय हे??"

शौर्य : "आता घेईल वेळेवर.."

रोहन : "वृषभ ह्याला घेऊन जा... पर्वा भेटूया.. शौर्य थेंक्स.. "

राज : "एक मिनिट त्याने तुला थेंक्स म्हणायला हवं की तू त्याला??"

रोहन : "शौर्यमुळे मी आज पास झालो.."

टॉनी : "बाजुला बसत असेल?? बरोबर ना.."

रोहन : "एकदम बरोबर.."

समीरा : "चला मी निघते.. पुढच्या परीक्षेची तैयारी करायचीय.."

"आम्हीही निघतो..", अस बोलत सगळेच निघाले..

शौर्य रूमवर येऊन औषध घेतो.. थोड्यावेळाने त्याला बर वाटत..

तोच मोबाईलवर विराजचा फोन येतो..

"हॅलो",अस बोलत शौर्य कोणाचा फोन आहे हे न बघताच कानाला लावतो..

विराज : "कसा आहेस??"

शौर्य : "वीर तु..."

विराज : "तु फोन करत नाहीस म्हटल्यावर मलाच फोन करावा लागेल ना.. मी तुम्हांला आपलं मानतो पण तुम्ही अजूनही परकच माना.. स्पेसिअली तु शौर्य.. मला त्रास होतोय यार तुझ्या अश्या वागण्याचा.."

शौर्य : "तु समजतोस तस नाही आहे रे.."

विराज : "एक फोन सुद्धा तुला नाहीना करता येत.. बाय दि वे दिल्ली काय बोलते?? आवडते की नाही???"

शौर्य विराजच्या अश्या बोलण्यावर शांतच रहातो..

(विराजला कस कळलं की शौर्य दिल्लीला आहे?? त्यासाठी प्रतिक्षा करा पूढील भागाची.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.. कॉलेजमधील परीक्षेच्या काळात केलेल्या अश्या घडामोडी आठवल्या की नाही?? ते ही कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल