शौर्यने आपल्या रूममध्ये शिरताच दरवाजा आतुन लावुन घेतला. वृषभ दरवाजा ठोकत शौर्यला आवाज देत बाहेरच उभा राहिला.. वृषभच्या आवाजाने आजु बाजूचे स्टुडंन्ट बाहेर येऊन बघू लागले. टॉनी आणि राजसुद्धा डोळे चोळत बाहेर आले.
टॉनी : "ए वृषभ आरडा ओरडा कश्याला करतोयस..?आणि एवढ्या लवकर आलात पण तुम्ही ??आणि शौर्य कुठेय??"
वृषभ काही बोलणार तोच शौर्यचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला.. वृषभला वाटलं की राग शांत झाला असेल म्हणून शौर्यने दरवाजा उघडला. पण तस काहीही नव्हतं. शौर्यच्या नजरेत त्याला राग स्पष्ट दिसत होता. हातात टॉवेल घेत तो तिघांकडेही न बघताच अंघोळीला निघुन गेला.
राज : "शौर्यला काय झालं??कालची अजुन उतरली नाही का त्याची..?? नाही म्हणजे आपण तिघ इथे असुन त्याला दिसलो नाही का?? नेहमी बोलणार आता काहीही न बोलताच गेला तो.."
वृषभ : "राज तु आणि रोहनने मिळुन खुप गोंधळ घातलाय.. शौर्यला खुप हर्ट झालय.."
टॉनी : "काय झालं ते तरी सांगशील.."
वृषभ : "शौर्यला येऊ दे मगच सांगतो.."
तिघेही शौर्यची त्याच्या रुम बाहेर वाट बघत उभे राहिले. जवळपास अर्ध्या एक तासाने शौर्य आला.. तिघे त्याच्या रुमजवळ असे उभे आहेत हे तो लांबुनच बघतो. पण त्यांच्याशी न बोलताच रूम उघडुन सरळ आत शिरला.. आतून कडी लावणार तस वृषभ ने त्याला मागे ढकलत टॉनी आणि राजला आत घेतलं आणि दरवाजा लावुन घेतला..
शौर्य : "वृषभ माझं डोकं आधीच खुप दुखतय आणि मी मस्तीच्या मुड मध्ये जरा सुद्धा नाही आहे. प्लिज तुम्ही लोक जावा इथून."
वृषभ : "शौर्य यार प्लिज ऐकुन घे ना. अस राग नको ना करूस."
टॉनी : "एक मिनिट कोणी सांगणार आहे का काय झालं ते??"
शौर्य : "वृषभ मला कोणत्याच गोष्टीवर बोलायचं नाही आणि काल झालेल्या गोष्टीवर तर अजिबात नाही. "
शौर्य डोकं धरतच बेडवर बसला..
राज : जास्त डोकं दुखतंय का शौर्य???
राज शौर्यला हात लावत विचारायला जाणार तोच शौर्य त्याच्यावर भडकला..
शौर्य : "ए राज मला हात नाही हा लावायचा. लांब राहायचं माझ्या पासुन. मला तुमच्या लोकांशी बोलायचंच नाही प्लिज तुम्ही जावा इथून.."
टॉनी : "अरे पण तू त्याच्यावर का भडकतोयस. ड्रिंक तर तु तुझ्या मर्जीने करत होतास. त्यात तुला ह्या वृषभ आणि रोहनने मिळुन कस सांभाळलं असेल ते देवालाच माहिती. काल आमच्या सगळ्यांच्याच एन्जॉयमेंटची तु पुर्णपणे वाट लावलीस. तुला बर वाटत नाही म्हणुन हा राज आपुलकीने विचारतोय तर तु त्याला पण ओरडतोयस. आम्ही तुझ्यावर भडकायच सोडून तूच उलट आमच्यावर भडकतोयस."
वृषभ : "अरे टॉनी तु शांत हो तुला नाही माहीत काही. "
टॉनी : "का शांत होऊ यार..कसा बोलतोय तो बघ"
वृषभ : "शौर्यने काल आधीच क्लीअर केलेलं की तो ड्रिंक वैगेरे घेत नाही आणि घेणार ही नाही. ह्या राजने वेटरला सांगुन सॉफ्ट ड्रिंक मध्ये हार्ड ड्रिंक मिक्स करून त्याला फसवुन दिल. तरी मी नाही बोललो होतो पण हा आणि रोहन दोघेही ऐकायला तैयार नव्हते."
टॉनी : "काय! राज तुझं डोकं आहेना ठिकाणावर. तुला काय गरज आहे तो नाही बोलत असताना जबरदस्ती पाजयची.."
राज : "आय एम सॉरी ना शौर्य.. प्लिज ना राग नकोना करुस."
शौर्य : "मला कोणाचीच सॉरी नकोय.. मला बर वाटत नाही आहे मला आराम करु दे. तुम्ही जावा इथुन."
वृषभ : "आम्ही कुठेही जाणार नाही आहोत तुला एकट सोडुन."
हे लोक काही ऐकणार नाही हे शौर्य जाणुन होता म्हणुन तो तसाच बेडवर पडून डोकं दाबत बसतो.
तिघेही तिथेच त्याच्याजवळ बसून रहातात. वृषभचा फोन वाजतो तस तो फोनवर बोलायला गॅलरीजवळ जातो.
शौर्य तसाच बेडवर डोकं टेकुन झोपुन राहण्याचा प्रयन्त करतो पण त्याच पोट आणि त्या बरोबर डोकं दोन्ही खूप दुखत असत. तो नुसतं कुस बदलुन झोपण्याचा प्रयत्न करत असतो..
टॉनी : "शौर्य बाहेर चल ना..लिंबु पाणी घेतल्यावर बर वाटल तुला.."
शौर्य काहीच बोलत नाही.
वृषभ : "रोहन आलाय खाली. शौर्य तुझा मोबाईल तु त्याच्या घरीच विसरलास.. आणि हो तुझ्या मोबाईल वरून आठवलं तुझ्या आईचा फोन आलेला काल.."
"डोन्ट टेल मी की तु तो उचललास??", शौर्य उठुन बसतच बोलु लागतो..
वृषभ : "उचलावा लागला यार 27 मिस कॉल होते. आम्हाला वाटल उचलला नाही तर हॉस्टेलवर फोन करतील आणि पुन्हा त्या घाबरतील त्यांना तु तिथेही नाही भेटलास तर. म्हणुन.."
शौर्य उशीवर पूर्णे पणे राग काढत ती खाली आपटतो आणि रूममधुन रागातच बाहेर पडतो.. तिघेही त्याच्याबरोबर त्याच्या मागे जातात.
रोहन होस्टेलच्या गेटजवळच उभा असतो.. शौर्य त्याच्याकडे मोबाईल मागतो..
रोहन : "शौर्य आधी तु शांत हो ना.. प्लिज.. मला तुला गमवायच नाही यार. तुला काय तुमच्या पैकी कुणालाच. प्लिज मी तुझे पाय धरून हवी तर तुझी माफी मागतो.."
शौर्य : "माझा मोबाईल दे.."
"मी देतो मोबाईल तु इथे ये आधी." अस बोलत रोहन शौर्यचा हात पकडत त्याला बाजूलाच असलेल्या मैदानात नेतो. तिथे एका बेंचवर बसवतो. शौर्य डोक धरून मान खाली घालुन बसतो. रोहन सोबत आणलेलं लिंबु सरबत त्याला पियायला देतो.
रोहन : "हे पि बर वाटेल तुला.."
"रोहन ह्यातसुद्धा हार्ड ड्रिंक मिक्स करून नाही ना देत तुम्ही मला.?", शौर्य डोळ्यांत पाणी आणून रोहनकडे बघत त्याला विचारतो.
रोहन : "शौर्य विसरून जा ना. ह्या पुढे अशी चुक नाही होणार रे. "
"हा शौर्य प्लिज.", सगळे एकत्रच बोलले..
सगळे त्याला समजवत ते जबरदस्ती पियायला देतात.. लिंबू सरबत पिल्यावर त्याला थोडं बर वाटत..
तो तसाच बसुन रहातो..
शौर्य : "थेंक्स.."
रोहन : "तुला बर वाटतंय??"
शौर्य : "हम्मम थोडं.. माझा मोबाईल??"
रोहन शौर्यला मोबाईल देतो
रोहन : "आणि हो आईला कॉल कर तुझ्या.. ती वाट बघतेय तुझ्या फोनची. तिने जे केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं अस त्यांनी मला तुला सांगायला सांगितलंय. प्लिज कॉल कर.. "
शौर्य काही तरी बोलणार पण तोच रोहन पुन्हा बोलू लागला..
"तुला आई आहे तरी नाही तर माझ्यासरखं कम नशिबी.. आईची आठवण खुप येते रे पण तिच्या पर्यंत माझ्या फोनची रिंग जाऊच शकत नाही यार. आई कधीच चुकत नसते फक्त आपल्याकडुन चूक होऊ नये हेच बघत असते.. आईच प्रेम मिळतंय तुला ते एन्जॉय कर. " शौर्य रोहनकडे बघतच रहातो.. रोहन भुवया उडवतच त्याला काय म्हणुन विचारू लागला.
शौर्य रोहनच्या बोलण्याचा विचार करू लागला..
वृषभ : "शौर्य तु अजुन नाराज आहेस का आमच्यावर??"
शौर्य मानेनेच नाही बोलतो.. तसे सगळे खुश होतात.. सगळे कालच्या टॉपिकवर बोलु लागतात.
शौर्य मात्र रोहनच्या बोलण्याचा विचार करतो.. रोहनने त्याच्या बाबतीत मांडलेलं आईच मत शौर्यच्या हृदयावर घाव करून गेल होत. मला म्हत्वाचा फोन करायचाय अस सांगून तो त्या चौघांपासून थोडं लांब जातो..
शौर्यने हातात फोन घेऊन आपल्या आईचा नंबर लावला.. अनिताने एकाच रिंगमध्ये फोन उचलला. जणु ति त्याच्या फोनची वाट बघत होती
अनिता : "झाला का राग शांत माझ्या शरू बाळाचा.. किती वाट पाहायला लावलीस तु.. जरा सुद्धा तुला तुझ्या मम्मा बद्दल काहीच वाटत नाही का??"
शौर्य : "मला तुझ्याबद्दल काही न वाटायला तु सुद्धा तशीच वागलीस ना.."
अनिता : "सगळं जाऊदे आधी तु कसा आहेस ते सांग.."
शौर्य : "आहे बरा.. आणि तु??"
अनिता : "तुझ्याशिवाय कशी असणार सांग.."
शौर्य : "तुला तुझा विर आहे ना.. मी कश्याला हवो तिथे.. तुम्हा तिघांत मिच वेगळा आहे.. म्हणुन मला अस लांब केलंस.."
अनिता : "शरू गैरसमज नको ना करुस.. विर आणि तु दोघेही मला सारखेच आहात.. आणि मला खरच तुझ्याशिवाय नाही करमत.."
"मग मी येऊ परत मुंबईला..? मला खुप आठवण येतेय ग तुझी, विरची आणि बाबाची पण. बाबाला तर नाही भेटु शकत पण तू तरी भेट ना ग.. प्लिज",शौर्य रडतच बोलतो.
अनिता : "ए शरू काय झालं??"
शौर्य : "बोललो ना आठवण येतेय.."
अनिता : "नक्की हेच कारण आहेना??"
शौर्य : "हम्मम"
मॉम : "फ्रेंड्स झाले का तुझे??"
शौर्य : "हम्मम खुप."
अनिता : "रोहनला थेंक्स म्हण माझ्याकडून त्याने काल फोन उचलुन माझं बाळ बर आहे मला सांगितलं.."
शौर्य : "हम्म सांगतो. मॉम तुला बर वाटत नव्हतं का?? वीर ने फोन केलेला मला. तो बोलत होता. "
अनिता : "शौर्य तु त्याला सांगितलं तर नाहीस ना तु दिल्लीला आहेस ते??"
शौर्य : "तो विचारत होता पण मी नाही सांगितलं.. म्हणजे मी त्याच्याशी सुद्धा बोलण्याच्या मुड मध्ये नव्हतो.."
अनिता : "शौर्य मी जे सांगते ते नीट ऐक.. मी.."
शौर्य : "हॅलोss... हॅलोss"
पण शौर्यचा फोन स्विच ऑफ होतो आणि बोलणं अर्धवट राहत. फोन खिश्यात टाकत तो तिथेच उभं रहातो.. खुप दिवसांनी आईशी बोलुन थोडा हळवा झाला होता तो..तोच रोहनने खांद्यावर हात ठेवला त्याच्या..
शौर्यने पटकन डोळे पुसले आणि रोहनकडे बघितलं..
रोहन : "आर यु ओके??"
शौर्य : "हम्म."
रोहन : "शौर्य काय झालं तु रडलास का?"
शौर्य : "खुप दिवसांनी मम्मासोबत बोललो ना म्हणुन थोडं..झ
रोहन : "समजु शकतो.."
शौर्य : "मम्माने तुला थेंक्स म्हटलंय. तु तिला फोन उचलुन मी बरा आहे हे सांगितलंस त्या बद्दल.. आणि माझ्या कडून पण थेंक्स.. तु जर मगाशी मला समजवल नसतस तर कदाचित मी फोन केला नसता."
रोहन : "बसना यार तु खुश आहेस ना.. मग मी खुश.."
अस बोलुन दोघेही गळे मिळतात..
शौर्य : "बाकीचे कुठेत??"
रोहन : "फ्रेश होऊन अर्ध्या तासात येतो बोलले.. तो पर्यंत प्ले हाउस मध्ये जाऊयात केरम खेळायला?? ती लोक आली की मग ब्रेकफास्ट करून येऊयात"
शौर्य : "हमम.."
रोहन आणि शौर्य दोघेही प्ले हाऊसमध्ये जाऊ लागले.. समीरा आणि सीमा आधीपासूनच तिथे होत्या.. समीरा शौर्यला बघुन न बघितल्यासारख करते.. सीमा रोहन आणि शौर्यला हात दाखवत हाय करते..शौर्य सुद्धा तिला हाय करतो..
सीमा : "तुला वाटतंय का बरं??"
शौर्य मानेनेच हो बोलतो.
शौर्य : "गुड मॉर्निंग समीरा.."
"गुड मॉर्निंग रोहन..", समीरा जाणुन बुजून शौर्यला इग्नोर करते.
रोहन : "गुड मॉर्निंग! शौर्य चल आपण टेबल टेनिस खेळूयात."
शौर्य : "आज मी खेळणार नाही फक्त बसुन बघेल"
रोहन : "काय यार चल ना..."
समीरा : "रोहन चल आपण खेळुयात. माझी प्रॅक्टिस पण होईल."
रोहन : "चलsss"
रोहन आणि समीरा दोघेही टेबल टेनिस खेळायला जातात.
सीमा : "ए शौर्य तु केरम तरी खेळ ना माझ्यासोबत.."
समीरा तिरक्या नजरेने बघत रहाते.
शौर्य : "आज खरच मुड नाही ग.."
ए शौर्य आता भाव नको ना खाऊस.. प्लिज.. सीमा जबरदस्ती शौर्यचा हात पकडत त्याला टेबलवर बसवते. सीमा आणि शौर्य खेळायला लागतात तर एकीकडे रोहन आणि समीरा. थोड्याच वेळात राज, टॉनी आणि वृषभ तिथे येतात. समीरा प्रत्येकाला आवाज देत जाणुन बुजून गुड मॉर्निंग करते जेणे करून शौर्यला ह्याची जाणीव व्हावी की ती त्याला इग्नोर करतेय. सीमा हे बघ ही लोक आलीत तु ह्यांच्यासोबत खेळ. अस बोलुन शौर्य टेबलवरून उठतो आणि रोहन, समीरा खेळत असतात तिथे जाऊन एक चेअर घेऊन त्यावर बसतो
रोहन : "शौर्य तु खेळणार काय.?"
समीरा : "रोहन तुला कंटाळा आला असेल तर सांग आपण बंद करू."
रोहन : "अग तस नाही तो असाच बसलाय म्हणुन म्हटलं ग."
शौर्य समीराकडे बघतच रहातो. तिच्या चेहऱ्यावर राग त्याला स्पष्ट दिसत होता. पण नेहमी लपुन बघणारी समीरा आज काही शौर्यकडे बघत नव्हती.
शौर्य : "समीरा काय झालं तु अशी रागात का आहेस?? आणि माझ्याशी का बोलत नाहीस.."
समीरा : "रोहन ह्याला सांग मला ह्याच्याशी बोलायचं नाही."
शौर्य : " का??"
आता सगळेच समीराकडे बघतात..
समीरा : "दारुडी मुलं मला अजिबात आवडत नाहीत.."
रोहन : "अग समीरा शौर्य दारूडा नाही तुझा गैरसमज.."
समीरा हातानेच रोहनला थांबायला सांगते... मला कालचा टॉपिक नकोय इथे.. आणि तु कोणाची बाजु घेऊन माझ्याशी बोलु नकोस.
शौर्य समीराकडे बघतच बसतो..
शौर्य : "समीरा तुला नक्की माझ्याशी बोलायचं नाही??'
समीरा : "रोहन त्याला सांग मला नक्की म्हणजे नक्की त्याच्याशी बोलायचं नाही.."
शौर्य : "ठिक आहे मी जातो रूमवर तुम्ही खेळा.."
टॉनी : "ए शौर्य थांब ना."
शौर्य कोणाचंही न ऐकताच रुमवर जातो.
समीरालासुद्धा ती थोडं जास्तच रुड वागली अस वाटु लागत.
रोहन : "काय यार समीरा तु पण अस केलंस. एक तर बिचारा आता कुठे जरा शांत झालेला आणि त्यात तु अस..."
समीरा : 'मी काय केलं. तोच आलेला माझ्याशी बोलायला. "
वृषभ : "मग कोणी अस बोलत का??"
समीरा : मग काल तो जे वागला ते बरोबर होत का??
टॉनी : "अग गैरसमज झालेला तुझा.. आणि माझा पण..'
समीरा : 'मला वाटलंच होत तु आज त्याची बाजु मांडुन बोलणार ते. मी ह्या सीमाला पण बोललेली."
टॉनी : "एक मिनिट मी त्याची बाजु नाही मांडत..'
समीरा : "मला कालच्या टॉपिकवर पुन्हा डिस्कस नको प्लिज.."
वृषभ राजकडे रागात बघतो.. राज दोन्ही हात कानाला लावतो.. वृषभ तिथुन उठुन धावतच बाहेर जातो पण तोपर्यत शौर्य तिथुन निघुन गेला असतो.. वृषभ शौर्यला शोधायला हॉस्टेलमध्ये जायला निघतो.. शौर्य रूममध्ये येतो.. मोबाईल चार्जिंगला लावतो.. बेगेतुन लॅपटॉप काढुन त्यावर काहीतरी करत बसतो..
तोच वृषभ शौर्यच्या रूममध्ये शिरतो..
वृषभ : "शौर्य! तु असा निघुन का आलास??"
शौर्य : "असच.."
वृषभ : "तुझ्याजवळ लॅपटॉप पण आहे??"
शौर्य काहीच बोलत नाही..
वृषभ : "काय करतोयस.. बघु तरी. ओहह हो फेसबुक..'
शौर्य : "मग काय करू खाली गेलो तर त्या समीराला आवडत नाही. नुसती रागाने बघत होती. ड्रिंक तर तुम्ही लोकांनी पण केलं मग ती फक्त माझ्यावरच का रागावली???"
वृषभ : "तुला न समजण्या इतपत तु बुद्धु आहेस अस मला वाटत नाही.."
शौर्य : "म्हणजे ती.??"
वृषभ : "येस.. ती पण.."
शौर्य : "काय यार पण ती बघितलस किती खुन्नस देत होती मला ते.. "
¶¶¶¶¶प्यार में कभी-कभी ऐसा हो जाता है
छोटी सी बात का फ़साना बन जाता है¶¶¶¶¶
वृषभ गाणं गातच शौर्यला गुदगुल्या करत चिडवु लागतो.)
शौर्य : "बस बस.."
वृषभ : "आता तरी खुश?"
शौर्य : "नाही...!"
"आता काय??" अस बोलत वृषभ शौर्यकडे बघतो..
शौर्य : "खुप खुप खुश.."
वृषभ : "चल मग जाऊयात खाली.."
शौर्य : "अरे मम्माला फोन करायचाय माझा मोबाईल स्विच ऑफ झाला.. तिला फेसबुक वरून व्हिडीओ कॉल करतोय पण ती उचलत नाहीय.. पण ती कधीही करेल फोन..मला इथेच थांबव लागेल.."
"ही तुझी मम्मा आहे का??", शौर्यला लॅपटॉपमध्ये बोट दाखवतच वृषभ त्याला विचारू लागला..
शौर्य : हम्मम..
वृषभ : "मला अस का वाटतंय मी ह्यांना कुठे तरी बघितलंय?? "
शौर्य : "आता ते मी कस सांगु शकतो..??"
तोच शौर्यला त्याची मम्मा फेसबुकवर फोन करते.. शौर्य वेळ न घालवता लगेच फोन उचलतो..
(अनिता शौर्यला काय महत्वाच्या गोष्टी सांगेल?? शौर्य समीराच्या प्रेमाला आता कोणतं नवीन वळण मिळेल?? भेटुयात पुढील भागात..)
क्रमशः
©भावना विनेश भुतल