पेरजागढ- एक रहस्य.... - २२

  • 7.1k
  • 2.8k

२२)हत्तीखोयाळ भ्रमंती...दोन दिवसांच्या अनुभवापोटी त्या धनगराची मला चांगलीच अनुभूती आली होती.ज्यामुळे आज तरी मला त्याला न्यावेसे वाटले नाही.कारण एकटा मधूमामा माझ्यासाठी प्राणदाता होता हे मी केव्हाच ओळखलं होतं.त्यामुळे आज आम्ही दोघेच निघायचं ठरवलं होतं. तसं पण जंगलाच्या आत तर जायचं नव्हतंच.गडाच्या मागच्या बाजूला पायथ्याशीच जायचं होतं.त्यामुळे आज सकाळी तयारी करून जरा गडाच्याच रस्त्याने निघालो होतो.तिथून अर्ध्या रस्त्यातून जंगलात प्रवेश केला.झुडूपी जंगलातून जाताना पायथ्याशी एक नाला लागला.ज्यात बऱ्याच प्रमाणात अभ्रकांची संख्या होती.सहज एक दगड उचलला आणि बॅगेत टाकला.आणि परत एकदा ते प्रवास शूरू झालं.. निशानांचे निरीक्षण करणे,विष्ठेचे परीक्षण करणे,कधी नागमोडी,तर कधी आडीमोडी अशा पद्धतीचे प्रवास चालू होते.चालताना मी कित्येकदा मागेच असायचो.मग