पेरजागढ- एक रहस्य.... - २४

  • 10k
  • 4.3k

२४)काही प्रमाणात नक्षाचा खुलासा....अलगद बॅगेला बाजूला ठेवून रितू माझ्या शेजारी बसली.आई घरी नुकतीच जाण्यासाठी वाट बघत बसली होती.आणि तिला बघताच तिचीही चिंता मिटल्यागत झाली होती.डॉक्टरने सांगितलेल्या काही सूचना समजावून शेवटी आई तिथून निघून गेली.आणि एकटी रितू परत मला बघत माझ्यापाशी येऊन बसली.केव्हा उघडशील रे डोळे?तिच्या मनात असलेला सततचा प्रश्न अलगद चेहऱ्यावर वाचून घेता येईल, अशा पद्धतीने प्रगट होत होता.आणि डोळ्यात आसुसलेल्या प्रेमाची धगधगलेली प्रीती ओसंडून वाहत होती.अगदी हात धरून मला उठवण्यासाठी तिचे हात तरसत होते.आणि हात हातात घेऊन तो निर्जीव असल्यागत झालेला स्पर्श स्वतःच्या मनाला सांत्वनत होती. तिचं प्रेम अजूनही जिवंत आहे याची साक्ष करून घेत होती.कारण तिला आता रहस्य