लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रत्येक वर्षी आम्ही कुठेतरी फिरायला जायचो. जान्हवी २ वर्षाची असताना आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला गेलो होतो. आमची जान्हवी आणि आज्जीची मनाली तशी एकदम शांत आणि शहाणी. तिचा जन्म होताना मला अगदी ५ मिनिटच त्रास झाला आणि आमच्या गोड परीने जन्म घेतला! मला मुलगीच हवी होती आणि नवऱ्याला काहीही चालणार होते. शिवाय कुठलाही त्रास न होता बाळंतपण झाल्यामुळेतर आमच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जन्म झाल्यानंतरसुद्धा तिने कधीही त्रास दिला नाही. आम्ही तिघे महाबळेश्वरला गेलो. खूप खुश होतो आम्ही! सकाळी लवकर निघाल्याने महाबळेश्वरला लवकर पोहचलो. हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन पोटभर जेवून तृप्ततेचा ढेकर देऊन खरेतर एक ताणून द्यायचा