प्रायश्चित्त - 1

  • 11.4k
  • 6.3k

हिरव्या रंगाची छोटीशी टुमदार कौलारू बंगली. अंगणात हिरवळ. कम्पाऊंड ला रंगीत फुलांच्या गुच्छांनी लगडलेल्या वेली. चारी दिशांना नजर जाईल तिथपर्यंत उंचच उंच वृक्षांची रांग. मधूनच जाणारी छोटीशी पायवाट. अगदी निसर्गचित्रात दाखवतात तसंच होतं सगळं. सुंदर, देखणं. तिथे राहणारे दोघेही तसेच. शंतनू, उंचापुरा, धारदार नाकाचा , पाणीदार डोळ्यांचा, आणि शाल्मली, गुलाबी गोरी, बदामाकृती चेहऱ्याची, अपऱ्या नाकाची. नाजूक जिवणीची. हसली की गालांवर इतक्या गोड खळ्या पडत की पहाणाऱ्याला विसरच पडावा सगळ्याचा. दृष्ट लागावी असंच सगळं. शंतनू उच्चशिक्षित, बड्या कंपनीत मोठ्या हुद्दयाची नोकरी. शाल्मली ही उच्चशिक्षित पण नोकरी न करणारी. लग्न करताना त्याने तसं आधीच सांगितलं होतं. तिलाही त्यात काही वावगं वाटलं नव्हतं.