Prayaschitta book and story is written by Mrs. Mrinmayee Shirgaonkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Prayaschitta is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
प्रायश्चित्त - कादंबरी
Mrs. Mrinmayee Shirgaonkar
द्वारा
मराठी फिक्शन कथा
हिरव्या रंगाची छोटीशी टुमदार कौलारू बंगली. अंगणात हिरवळ. कम्पाऊंड ला रंगीत फुलांच्या गुच्छांनी लगडलेल्या वेली. चारी दिशांना नजर जाईल तिथपर्यंत उंचच उंच वृक्षांची रांग. मधूनच जाणारी छोटीशी पायवाट. अगदी निसर्गचित्रात दाखवतात तसंच होतं सगळं. सुंदर, देखणं. तिथे राहणारे दोघेही तसेच. शंतनू, उंचापुरा, धारदार नाकाचा , पाणीदार डोळ्यांचा, आणि शाल्मली, गुलाबी गोरी, बदामाकृती चेहऱ्याची, अपऱ्या नाकाची. नाजूक जिवणीची. हसली की गालांवर इतक्या गोड खळ्या पडत की पहाणाऱ्याला विसरच पडावा सगळ्याचा.
दृष्ट लागावी असंच सगळं. शंतनू उच्चशिक्षित, बड्या कंपनीत मोठ्या हुद्दयाची नोकरी. शाल्मली ही उच्चशिक्षित पण नोकरी न करणारी. लग्न करताना त्याने तसं आधीच सांगितलं होतं. तिलाही त्यात काही वावगं वाटलं नव्हतं. शिवाय त्याच्या हुद्द्याला साजेशा पार्ट्या ऑरगनाईज करणे, उत्तम पद्धतीने पाहुण्याना एंटरटेन करणे, घरादाराची नीट काळजी घेणे, ही वरवर साधी वाटणारी पण त्याच्या स्वत:च्या आणि नोकरीच्या दृष्टीने लांबवर परिणाम करणारी कामे ती लिलया पार पाडत होती. त्याला तिचा , तिच्या सौंदर्याचा सार्थ अभिमान होता. कोणत्याही पार्टीत हे दोघे आले की सर्वांच्याच नजरा यांच्याकडे वळत आणि त्याची आधिचीच रूंद छाती अधिकच रुंदावे. सहकाऱ्यांच्या डोळ्यातील हेवा त्याला सुखावून जाई.
हिरव्या रंगाची छोटीशी टुमदार कौलारू बंगली. अंगणात हिरवळ. कम्पाऊंड ला रंगीत फुलांच्या गुच्छांनी लगडलेल्या वेली. चारी दिशांना नजर जाईल तिथपर्यंत उंचच उंच वृक्षांची रांग. मधूनच जाणारी छोटीशी पायवाट. अगदी निसर्गचित्रात दाखवतात तसंच होतं सगळं. सुंदर, देखणं. तिथे राहणारे ...अजून वाचातसेच. शंतनू, उंचापुरा, धारदार नाकाचा , पाणीदार डोळ्यांचा, आणि शाल्मली, गुलाबी गोरी, बदामाकृती चेहऱ्याची, अपऱ्या नाकाची. नाजूक जिवणीची. हसली की गालांवर इतक्या गोड खळ्या पडत की पहाणाऱ्याला विसरच पडावा सगळ्याचा. दृष्ट लागावी असंच सगळं. शंतनू उच्चशिक्षित, बड्या कंपनीत मोठ्या हुद्दयाची नोकरी. शाल्मली ही उच्चशिक्षित पण नोकरी न करणारी. लग्न करताना त्याने तसं आधीच सांगितलं होतं. तिलाही त्यात काही वावगं वाटलं नव्हतं.
शाल्मली भराभर आवरत होती. एकीकडे दिवसभर ऑफिसमधे होणाऱ्या मिटींग्ज, त्यासाठीची तिची झालेली, राहीलेली तयारी, यांची मनातल्या मनात उजळणी सुरू होती, तर दुसरीकडे हात स्वैपाकघरात अत्यंत सराईतपणे चालत होते. दोन दिवसांच्या श्रीश ला घेऊन, वर्षभरापूर्वी शंतनू ला कायमचं ...अजून वाचाजेव्हा ती आईबाबांबरोबर निघाली तेव्हा मनात प्रचंड काहूर होतं. भविष्यात काय लिहून ठेवलंय याचा अंदाज नव्हता. पदरी श्रुती नसलेलं दोन दिवसाचं बाळ, ना नोकरी ना पैसा. आईवडिलांचा आधार काही काळापुरताच घ्यायचा हे मात्र तिने तेव्हाही ठामपणे ठरवलं होतं. नाही म्हणायला शिक्षण मात्र होतं , उत्तम मार्कांची डिग्री होती. पण नोकरी मिळेल? राहायचं कुठे? आईवडिल ,भाऊवहिनी ,त्याची दोन मुलं यांना त्यांची जागा पुरत
शाल्मली ची धांदल उडाली होती आज. हात एकीकडे भराभर कामं उरकत होते तर दुसरीकडे डोक्यातले विचार वायुवेगाने भ्रमण करत होते. एरव्हीची शांत शाल्मली आज मात्र जरा धास्तावली होती. आज श्रीश ला तिने आईकडेच सोडायचं ठरवलं. संध्याकाळच्या आधीच्या बॉसचा निवृत्ती ...अजून वाचाआणि नव्या बॉसचा स्वागतसमारंभ, असं ऑफिस ने एकदमच करायचं ठरवलं होतं. थोडा उशीर होणार होता. शिवाय तिच्यावर कार्यक्रमासाठी काही जबाबदाऱ्या ही सोपवण्यात आल्या होत्या. आधीच्या बॉसनी वडिलकीच्या नात्याने कालच तिला बऱ्याच गोष्टी समजावल्या होत्या. पण ते जाऊन नव्या माणसाबरोबर काम करावं लागणार, याचं नाही म्हटलं तरी तिच्या मनावर दडपण आलंच होतं. सगळी तयारी करून शेवटी ती निघाली. श्रीश ला जवळ घेऊन कुरवाळून
शाल्मली उठली पहाटेसच आज. आज श्रीश झाला वर्षापूर्वी. आज ती आई झाली होती वर्षभरापूर्वी. जीवनातला परमोच्च आनंद दिला होता श्रीश ने तिला. तिने श्रीशला न्हाऊ माखू घातले. आईकडे गेल्यावर आजी, मामी ने त्याला ओवाळले. बच्चा पार्टीने केक ...अजून वाचाठेवला होता, तो दादाच्या मदतीने श्रीश ने कापला. सगळ्यांनी ‘हैप्पी बर्थ डे टु श्रीश’ म्हटलं. दोन्ही मुलांनी कडेवर घेऊन त्याला नाचवला. श्रीश प्रचंड खूश होता. शाल्मली च्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्या तिने हळूच पुसून घेतल्या. आज ऑफिसच्या पाळणाघरात वाटण्यासाठी शाल्मलीने कप केक्स, चॉकलेटस् घेतली होती. जवळच्या मूकबधीर मुलांच्या शाळेतही संध्याकाळी ती घेऊन जाणार होती श्रीश ला. आता सवय करायलाच हवी होती. ऑफिसमधे
शंतनू जसजसा तिच्या घराजवळ जाऊ लागला त्याचं अवसान गळू लागलं. “परत त्या तिरस्काराने भरलेल्या नजरेचा सामना करण्याची ताकद नाही तुझ्यात “मन बजाऊ लागलं. तो रस्त्याच्या कडेला थांबला. “काय करावं?” घालमेल होत होती जीवाची! मग तो गाडी ...अजून वाचालावून उतरला. मोकळा श्वास घेतल्यावर बरं वाटलं त्याला. समोरच मोठं खेळण्याचं दुकान दिसलं. तो आत गेला. समोरच एक मोठा टेडी होता. तो घेतला. कार्डवर लिहीलं “तुझ्या वेड्या बाबाकडून” मग शाल्मलीच्या माहेरचा पत्ता दिला. पोहचवायला सांगून तो परतीच्या वाटेला लागला. डोळे वहात होते. धूसर वाट होती पण निदान मार्ग मिळाला होता. प्रशांतने शाल्मली आणि श्रीश ला घराजवळ आणून सोडले. तिने वर बोलावले नाही. तो गाडी