प्रायश्चित्त - 2

  • 8.6k
  • 4.3k

शाल्मली भराभर आवरत होती. एकीकडे दिवसभर ऑफिसमधे होणाऱ्या मिटींग्ज, त्यासाठीची तिची झालेली, राहीलेली तयारी, यांची मनातल्या मनात उजळणी सुरू होती, तर दुसरीकडे हात स्वैपाकघरात अत्यंत सराईतपणे चालत होते. दोन दिवसांच्या श्रीश ला घेऊन, वर्षभरापूर्वी शंतनू ला कायमचं सोडून जेव्हा ती आईबाबांबरोबर निघाली तेव्हा मनात प्रचंड काहूर होतं. भविष्यात काय लिहून ठेवलंय याचा अंदाज नव्हता. पदरी श्रुती नसलेलं दोन दिवसाचं बाळ, ना नोकरी ना पैसा. आईवडिलांचा आधार काही काळापुरताच घ्यायचा हे मात्र तिने तेव्हाही ठामपणे ठरवलं होतं. नाही म्हणायला शिक्षण मात्र होतं , उत्तम मार्कांची डिग्री होती. पण नोकरी मिळेल? राहायचं कुठे? आईवडिल ,भाऊवहिनी ,त्याची दोन मुलं यांना त्यांची जागा पुरत