शाल्मली ची धांदल उडाली होती आज. हात एकीकडे भराभर कामं उरकत होते तर दुसरीकडे डोक्यातले विचार वायुवेगाने भ्रमण करत होते. एरव्हीची शांत शाल्मली आज मात्र जरा धास्तावली होती. आज श्रीश ला तिने आईकडेच सोडायचं ठरवलं. संध्याकाळच्या आधीच्या बॉसचा निवृत्ती समारंभ आणि नव्या बॉसचा स्वागतसमारंभ, असं ऑफिस ने एकदमच करायचं ठरवलं होतं. थोडा उशीर होणार होता. शिवाय तिच्यावर कार्यक्रमासाठी काही जबाबदाऱ्या ही सोपवण्यात आल्या होत्या. आधीच्या बॉसनी वडिलकीच्या नात्याने कालच तिला बऱ्याच गोष्टी समजावल्या होत्या. पण ते जाऊन नव्या माणसाबरोबर काम करावं लागणार, याचं नाही म्हटलं तरी तिच्या मनावर दडपण आलंच होतं. सगळी तयारी करून शेवटी ती निघाली. श्रीश ला जवळ घेऊन कुरवाळून